घराचे कंप्लीशन सर्टिफिकिट / occupancy सर्टिफिकेट

Submitted by पियू on 13 April, 2024 - 09:33

- रिसेल चा फ्लॅट विकत घेताना त्या घराचे / बिल्डिंगचे कंप्लीशन सर्टिफिकेट / ऑक्यूपन्सी सर्टिफिकेट नसेल तर काय अडचणी येऊ शकतात?

- फ्लॅट ओनर कडे पार्शियल कंप्लीशन सर्टिफिकट असेल तर त्याने काय / कितीसा फरक पडतो?

- असे घर घ्यावे की घेऊ नये?

- असे घर कमी किमतीत का उपलब्ध असते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Disclaimer : हे मी माझ्या मर्यादित ज्ञानानुसार सांगते आहे. अधिकारी माणसाकडून खात्री करून घ्यावी, ही विनंती.

कम्प्लिशन / ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे मराठीत भोगवटा पात्र. ही जागा आता सर्वार्थाने वापरण्यासाठी योग्य आहे, असे सांगणारा दाखला. मंजूर नकाशाप्रमाणे काम झालं आहे ना? ह्याची खात्री बांधकाम विभागाचे इंजिनियर जागेवर करतात. पाणी, ड्रेनेज, अतिक्रमण, कर, लिफ्ट, अग्निशमन अशा अनेक खात्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतं. पूर्वी बिल्डर लोक ‘पार्ट कम्प्लिशन’ अशी पळवाट काढायचे. जेवढी इमारत बांधली असेल, त्यातला एखादा फ्लॅट वगळून बाकीच्या भागाचं ‘पार्ट कम्प्लिशन’ घेत असत. त्यात मग लिफ्ट इन्स्टॉल न करता ‘पूर्ण कम्प्लिशनला बसवणार आहे’ असं सांगणे आणि कधीच न बसवणे वगैरे प्रकार व्हायचे. म्हणून आता मनपा ‘पार्ट कम्प्लिशन’ झालं तरी पाणी जोडून देत नाही. शेवटच्या भोगवटा पत्रानंतरच कार्पोरेशनचं पाणी मिळतं.

कम्प्लिशन झाल्यानंतर महापालिकेचा मालमत्ता कर लागू होतो. पद्धत अशी आहे की कम्प्लिशनसाठी ड्रॉईंग देताना दोन प्रती जास्तीच्या द्याव्या लागतात. कम्प्लिशन झालं. सह्या वगैरे होऊन, आउटवर्ड नंबर पडला की तिकडूनच ‘कर विभागाला’ हे नकाशे जातात. लगेच जागेची पाहणी होऊन कर लागू होतो. जर एखाद्या जागेचं कम्प्लिशन नसेल, तर ही प्रक्रिया होणार नाही. म्हणजे तुम्ही कर न भरता या जागेत राहात आहात, असं महानगरपालिका म्हणणार. त्यांची कर वसुली मोहीम किंवा पुनर्विकास किंवा विक्री करताना ही गोष्ट अडचणीची ठरू शकते.

पुण्यात पेठ भागात अश्या असंख्य सोसायट्या आहेत जिथे बिल्डर पैसे घेऊन पळून गेला आणि लोकांनी स्वतः च्या पैश्यांनी भर घालून बांधकाम पूर्ण केले. सोसायटी फॉर्म केली. २५-३० वर्षे मनपा चे पाणी सुद्धा आहे सोसायटीला.

अशा दोन तीन वेगवेगळ्या सोसायटीतील वेगवेगळ्या घरांच्या केसेस बघितल्या. सोसायटी वेगळी, पेठ वेगळी पण सर्टिफिकेट स्टेटस सेम असे लक्षात आल्याने चकित होऊन पट्कन इथे शॉर्ट पोस्ट टाकली.

मित्राच्या बिल्डिंगला बिल्डर ने CIDCO चे काही लाख रुपये थकवल्यामुळे अजून OC नाही मिळाले. घर घेऊन आता ११ वर्ष होतील. त्याला घर विकायचे आहे पण OC नसल्यामुळे कोणी घ्यायला मागत नाहीं. पाणी लाईट कनेक्शन्स काही करुन मिळवलेत.

मित्र फर्स्ट ओनर आहे.

Thanks सगळ्यांना. रिदेव्हलपमेंटला जाताना अपॉइंट करावी लागणारी एजन्सी या सर्टिफिकेटची पूर्तता करून घेते असे ऐकले आहे.

अमितव Lol
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
पण भोगवटा प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पाडत असलेली जमीन तुमची नसून मनपा ची आहे आणि म्हणून तुम्ही ती पाडू शकत नाही असं होतं ना?

Correct me if I am wrong.

जमिनीच्या (फ्लॅटच्या नाही, तो बांधलेल्या जमिनीच्या) मालकीसाठी कन्वेअन्स लागतो ना?
भोगवटा म्हणजे जागा रहाण्यायोग्य आहे, त्याने मला वाटतं जागेवरील हक्क प्रस्थापित होत नसावा.
हे खरं असेल तर आम्ही फक्त रहाण्यायोग्य जागाच पाडू असा काहीसा अर्थ होतो. Lol अर्थात त्याला कर भरलेला आहे, इ. इ. कारणं असू शकतील ही.