Submitted by चामुंडराय on 7 April, 2024 - 09:04
डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । माबोमंडळी ।।१।।
डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।
मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।
वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।
सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी माबोलोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।
प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू ।
अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
(No subject)
मस्त कविता! कोणत्या डूआयडी ला
मस्त कविता! कोणत्या डूआयडी ला समर्पित?
कविता भारीच की.2024 ची कविता
कविता भारीच की.2024 ची कविता.

पण काही जण तर मूळ आयडीने हे सर्व धंदे करतात
स्वतःचे जुने लेख उकरून काढणे, त्यावर मनासारखे प्रतिसाद आले कि त्याला उत्तर देणे, मनाविरुद्ध आले कि आयडी खरा की खोटा बऱ्या बोलाने सांग म्हणून दटावणे आणि नाईलाज झाला कि मग अमेरिकेच्या आडून इस्त्राएल बॉंब टाकतो तसे... म्हणजे काय ते आलं ना लक्षात
>>>> मस्त कविता! कोणत्या
>>>> >>>> मस्त कविता! कोणत्या डूआयडी ला समर्पित? >>>>
घाटपांडेसर, एकमेवाद्वितीय आयडी आहे माझा.
कित्येकदा मी माझा हा आयडी वापरून माझ्या धाग्यांवर आलेल्या प्रतिसादांना उत्तर देखील देत नाही तर डुआयडी काय वापरणार? कप्पाळ ...