देव्हारा घेण्यासाठी चांगले दुकान सुचवा

Submitted by प्रज्ञा९ on 29 March, 2024 - 10:18

मला सागवानी देव्हारा घ्यायचा आहे. मी पुण्यात बाजीराव रोडवरची दुकानं, शास्त्री रोडवरचं 'देवघर' हे दुकान आणि कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळचं दुकान बघून आलेय. निलायम पुलाखालची दुकानं बघणार आहे या आठवड्यात.
ओट्यावर ठेवता येईल असा छोटासाच, 1 फुटाच्या आसपास उंच असा घ्यायचाय. मुख्य शंका अशी, की अशा देव्हार्याची साधारण किंमत काय असेल?
3000-4000 इतकी कमी असेल का? मला वाटत नाही. ऑनलाईन बघितल्यावर कन्फ्युजन वाढलंय. 3-4 k ते पार 20-25k रेंज दिसतेय.
या मापाचा चांगला देव्हारा 10000-12000 ला असेल असं वाटतंय.
दुकानाचे पर्याय आणि किमतीचा अंदाज हवा आहे.

Group content visibility: 
Use group defaults

मटेरियल वर आहे.पार्टीकल बोर्ड लाकडी, mdf चे असतील तर स्वस्त असतात.
यांच्याकडे पण एकदा जाऊन बघ.रिव्ह्यू चांगला आहे.
Screenshot_2024-03-29-20-00-48-615_com.android.chrome.jpgScreenshot_2024-03-29-20-00-56-197_com.android.chrome.jpg

फेसबुक वर एक घे भरारी नावाचा ग्रुप आहे. तिथे आधीच्या पोस्टी सापडतील देव्हार्‍याबद्दल. उद्योजक आणि ग्राहक यांच्याकरताच आहे तो ग्रुप.

कसला योग्य वेळेला धागा आलाय. मला घ्यायचाच आहे.
पण अगं असेल एवढी किंमत. कदाचित जास्त पण असेल. मी साधारण ५ वर्षांपूर्वी एक छोटासा देव्हारा घेतला होता तेंव्हा त्याची किंमत साडे तीन हजार होती. देवघर मधूनच घेतलेला.

The query is, sagwan is not so cheap that it will cost 3-4k. But for small unit, it won't even go around 20-25k. So what would be the approximate cost...
My budget is around 12k.
35k onwards is for sisam wood.

Again, we can't even find out which wood is really used. आपण फसलो तरी कळणार नाही कारण त्यातले तज्ञ नसतो आपण. म्हणून जरा माहिती घेतल्याशिवाय खरेदी करू नये असं ठरलं. सागवानीच घेणार नक्की.

आम्ही शास्त्री रोडवरच्या 'देवघर' या दुकानातुन घेतलाय..... मिडियम साईझ आहे..... ८-१० हजाराच्या आसपास घेतलाय!
निलायम पुलाखाली सेम तश्याच डिझाईनचा किंबहुना त्यापेक्षा मोठा ४-५ हजाराच्या आसपास मिळतो पण क्वालिटीत फरक आहे.

I will recommend to get it from देवघर!!

आम्ही कुलकर्णी पेट्रोलपंपाजवळच्या दुकानातून आणला आहे. किंमत आठवत नाही कारण आई बाबा घेऊन आले होते. आम्हाला हवा होता तसा लहान आणि मुख्य म्हणजे लाकडी मिळाला. स्टील किंवा धातूचा शक्यतो नको होता. त्या दुकानात बरीच व्हरायटी होती असं आई तेव्हा म्हणाल्याचं आठवतय.

चिंचवड च्या हेमंत मधून घेतला आहे ( वर मी अनु ह्यांनी स्क्रीन शॉट टाकलाय त्यापैकी )
मोठा होता त्यामुळे किंमतही दणदणीत होती.
पण इतका आवडलेला की किंमतीचा विचार तेव्हाही नाही आणि आताही नाही वाटत.
Worth it. कारण संपूर्ण सागवानी लाकूड आणि छान कोरीवकाम.
पुण्यातले फार माहीत नाहीत.
पण मध्यंतरी युट्युब वर मंडई जवळील सागवानी देवघर बनवणारे आणि विकणारे असा एक व्हिडिओ पाहिलेला. मराठी व्हिडीओ होता. नाव आता लक्षात नाही. शोधून सापडले तर सांगतो नक्की.

Btw online घेताना त्याच्या क्वालिटी, खात्रीचे लाकूड ह्याविषयी मला तरी शंका वाटेल म्हणून online नव्हता घेतला.

थँक्स झकासराव.
'हेमंत' मधे नक्कीच जाणार. घेतला की कळवते इथे. लेकीची परीक्षा आहे, 12 तारखेपर्यंत. मग घेऊ.
(तसा काही संबंध नाही दोन गोष्टींचा, पण तरी एक आपलं म्हणायचं Wink )

मी साधारण ६-८ महिन्यांपूर्वी निलायम पुलाजवळच्या दुकानांमध्ये गेले होते. तिथे बर्मा टीक लाकूड वापरतात, असं सांगितलं. आकारा बरोबरच नक्षी कामावर किंमत ठरते.

मी मार्गशीर्ष महिन्यात देव्हारा घेतला फायनली. हेमंत मधेच घेतला. मुख्य फ्रेम शिसवी आहे. ड्रॉवर, मागची वॉल हे शिसवी फिनिशचं प्लाय आहे. पंचकोनी देव्हारा आहे, बघितला आणि लगेच आवडला. नंतर त्याच दुकानात बाकीचेही बघितले पण एकदा हा आवडल्यावर बाकी काही आवडेना. मग घेतला.
नैवेद्य वगैरे ठेवायला छोटी अटेचमेंट आहे ड्रॉवर च्या वर.

WhatsApp Image 2025-11-23 at 7.09.41 PM (2).jpegWhatsApp Image 2025-11-23 at 7.09.41 PM.jpeg

छान आहे देव्हारा...
तुला आवडला हे महत्त्वाचे..
कितीला मिळाला ?

15 हजार च्या आसपास आहे.
पूर्ण शिसवी नाहिये, तसा केला तर 30 हजार रुपयांपर्यंत जाते किंमत. मी मुद्दाम विचारलंसुद्धा, की हा नक्की शिसवीच आहे कशावरून? तेव्हा दुकानदार म्हणाले अर्धा प्लाय आहे. मग कुठला पार्ट प्लाय आणि कुठला शिसवी तेही सांगितलं. "साधा असेल तर तसंच सांगून तशीच कमी किंमत लावतो आम्ही" असंही सांगितलं. मग शिसवी पॉलिश चा साधा बघितल्यावर मला तो (चक्क) साधा आहे हे ओळखू आलं. माझ्या माहेरी शिसवीच होता त्यामुळे अगदीच अनोळखी नव्हतं मला हे.
( आणि मग मी मनातच देवाला म्हटलं, तुला या घरात यायचं असावं म्हणून आम्हा दोघांनाही बघताक्षणीच आवडलंय हे. अधिक चिकित्सकपणे न करता मनापासून घेते, तुझा आशीर्वाद असूदेत.)

सुंदर आहे देव्हारा
असेच होते
एक आवडला की दुसरा आवडत नाही.
आमचे सेम झाले होते.
जो आवडला तो तेव्हा बजेट च्या बाहेर वाटला होता पण तोच घेतला.

आमच्या एका शेजाऱ्यांना घ्यायचा होता.
त्यानाही हेमंत विषयी सांगितले होते.
त्यांनी शिसवी घेतलाय.
तू म्हणतेय तसा 30 K पर्यन्त गेली किमंत.
त्यांना शिसवी आवडला सागवानी नव्हता आवडला.
त्यांनी तोच घेतला मग.

मला परदेशात नेण्यासाठी देव्हारा हवा होता, मी नाशिक ला घेतला. यात समजलेले काही मुद्दे असे :
ताजे सागवानी लाकूड हे खूपच महाग आहे. त्याला ओले लाकूड म्हणतात (?). कालांतराने या फळीला वक्रता येऊ शकते, परिणामी crack संभवतात. काही वर्षे seasoning झाल्यानंतरच हे कामासाठी योग्य असते.
कोणते लाकूड आहे हे आपल्याला ओळखता येणं अवघड आहे, त्यात जर ऑलरेडी पॉलिश्ड देव्हारा असेल तर सामान्य व्यक्तीला लाकूड ओळखणे अशक्यच. शहरालगत काही वखारी असतात , तिथे किंवा त्या लगत राजस्थानी कारागीर सापडतील. जुने वाडे, इमारतींचे वासे इत्यादी अस्सल सागवान वापरून सुंदर देव्हारा बनवितात . मूळ लाकूड आपण तपासू शकतो. आपल्याला हवी तशी नक्षी त्यांना सांगू शकतो.
readymade देव्हाऱ्यात ड्रॉवर खाली हमखास plywood असते, पण ऑर्डर देऊन बनवून घेतल्यास चांगला जड , मजबूत आणि सुंदर देव्हारा घरी येऊ शकतो.
आणि हे सर्व अतिशय वाजवी दरात. अडीच फुटी साधारण ४-५ हजार .

सिसम च्या लाकडात पितळेचे नक्षीकाम केलेले देव्हारे खूप सुंदर दिसतात . घराचे इंटिरियर कसे आहे, तुमची आवड , आणि बजेट यावर किती मोठा, कोणत्या रंगाचा (लाकडाचा ) हे अवलंबून आहे . झकपक लाईट असलेले PVC देवघर सुध्दा हल्ली बाजारात आले आहेत.