Submitted by पॅडी on 17 March, 2024 - 23:23
माझ्या आत
वाजतेय रामधून
चिरंतन…
माझ्या आत
उठतो कल्होळ
असीम…
माझ्या आत
हलडुलते डहाळी
नवथर…
माझ्या आत
कूस बदलते स्वप्न
गोजिरे…
माझ्या आत
झेपावतात पक्षी
अमर्याद…
माझ्या आत निखळतो तारा
माझ्या आत अतर्क्य पसारा
... बाहेर चिमुकली पावलं लयबद्ध
माझ्या आत –
दुडूदुडू धावतात शब्द....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह... खूप सुंदर
वाह... खूप सुंदर
माझ्या आत निखळतो तारा
माझ्या आत अतर्क्य पसारा...
फक्त कल्लोळ हवं का कल्ल्होळच्या जागी ?
छान आहे
छान आहे
शेवटची दोन कडवीही त्याच फॉर्म मधे आली असती तर अधिक आवडली असती
दत्तात्रय जी - ' कल्होळ ' असा
दत्तात्रय जी - ' कल्होळ ' असा शब्दप्रयोग असायला हवा होता असे वाटते... " कल्लोळ " माफ करा पण I am not very sure... प्रतिसादासाठी आणि चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार...!
अवल- प्रतिसादासाठी खूप खूप आभार...! समारोप करायला शेवटची शब्दरचना मला जास्त भावली...( I mean to signify sum total of all the emotions spread throughout the poem....) Thank you again...!
वाह वाह!!!
वाह वाह!!!
>>>>माझ्या आत
हलडुलते डहाळी
नवथर…
हे कडवे वेड्यासारखे आवडले.
>>>>माझ्या आत
कूस बदलते स्वप्न
गोजिरे…
अहाहा!!!
हो हो, पॅडी. आपली कविता आपला
हो हो, पॅडी. आपली कविता आपला फॉर्मॅट
मी आपली माझी आवड नोंदवली इतकच. कारण वाचताना एक छान लय आलेली , शेवटी अडथळायला झालं. पण अर्थाने आवडलीच. लिहित रहा
सामो- मन:पूर्वक आभार आपले
सामो- मन:पूर्वक आभार आपले प्रतिसादासाठी...!!
अवल - आपली आवड समजली... प्रोत्साहनासाठी खूप खूप आभार...
वाह सुंदर!!
वाह सुंदर!!
'माझ्या आत अतर्क्य पसारा' आवडले
माझ्या आत –
माझ्या आत –
दुडूदुडू धावतात शब्द.... >>> मस्तच...
स्वरूप, पुरंदरे शशांक -
स्वरूप, पुरंदरे शशांक - प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार आपले...!!
एक सांगू...

" माझ्या आत –
दुडूदुडू धावतात शब्द.... " च्या नुसत्या कल्पनेनेच माझी ब्रह्मनंदी टाळी लागते- प्रत्येकवेळा