लहान मुलांच्या बर्थ डे पार्टीला तुम्ही कोणते खेळ खेळता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 March, 2024 - 20:23

लहान मुलांच्या बर्थ डे पार्टीला तुम्ही कोणते खेळ खेळता?

सर्वांनी एकमेकांकडील गेम आणि आयड्या ईथे शेअर करूया आणि सर्व ज्युनिअर मायबोलीकरांची पार्टी रॉकिंग आणि त्यांचे आयुष्य आनंदी करूया!

ईथे मोठ्यांचे फॅमिली गेम्स आले तर ते सुद्धा चालतील. शेवटी अश्या पार्टीजना मोठ्यांनीही लहान बनूनच एंजॉय करायचे असते.

--------------

आमच्याकडे आजवर खेळले गेलेले खेळ.
(आमच्या सोसायटीत मुलांची कमी नसल्याने अगदी ऐन परीक्षेत वाढदिवस आला तरी २५-३० मुले सहज जमतात. त्यामुळे काहीही खेळले तरी दंगा हमखास असतो. उलट दंगा अति होऊ नये याची काळजी घेऊन खेळ निवडावे लागतात)

१) पासिंग द पार्सल - तोच आपला हम आपके है कौन माधुरीवाला. उशी पास करायची आणि ज्यावर राज्य येईल त्याला काहीतरी मनोरंजक आयटम सादर करायला लावायचे.

२) एक मिनिट गेम्स - यात बरेच काही खेळलो आहे. जसे की,
ग्लासवर ग्लास रचणे.
फुगे दोन काड्यांनी उचलून इथून तिथे नेणे,
बादलीत बॉल टाकणे,
जोडी बनवून कॅच कॅच खेळणे,
आठवेल तशी भर टाकतो.

३) रिंगमधून किंवा दोरी खालून बॉडी टच न करता पास होणे. (यात आमची पोरगी बारीक आणि लवचिक असल्याने बरेचदा जिंकायची. म्हणून घरच्या वढदिवसाला कधी खेळलो नाही)

४) रॅम्प वॉक - फॅशन शो - हौस असते लहान मुलामुलींना

५) स्टॅच्यू - नाचता नाचता नाचता म्युजिक थांबली की लगेच आपणही थांबायचे. ज्या खेळात नाच असतो तिथे मजा येतेच.

६) उड्या मारता मारता म्युजिक थांबताच खाली बसायचे. जो शेवटी बसेल तो बाद. अश्या खेळात जजगिरी फार करावी लागते त्यामुळे पुन्हा खेळायचा नाही हा अनुभव घेतला. तरी एक बरे मी विडिओ काढायचो त्यामुळे बरेच गोष्टी दूध का पाणी करता यायच्या.

७) म्युजिक लाऊन नाचायचे, किंवा सर्कल करून गोल गोल फिरायचे आणि जो नंबर पुकारला जाईल तितक्या मुलांचा आपसात ग्रूप बनवायचा. फार लफडे होतात पोरांचे. आपले खरे खोटे मित्र समजून जातात.

८) शिवाजी म्हणाला.. सायमन से.. जुनाच खेळ आहे पण आपल्या मनाने एक दोन उलट सुलट रुल टाकायचे आणि फास्ट खेळायचा..

९) Chinese Whispers - हा गेम खेळायला फारच धमाल आलेली. सगळ्यांनी रांगेत पाठमोरे उभे करायचे. पहिल्याला मग समोर बघायला लाऊन काहीतरी अ‍ॅक्शन करून दाखवायची. ती त्याने त्याच्या मागच्याला, मागच्याने त्याच्या मागच्याला ... असे एकेकाला पलटत ती अ‍ॅक्शन पुढे पास करत जायची. शेवटच्या मुलापर्यंत पोहोचेस्तोवर मूळ अ‍ॅक्शनचे बारा वाजलेले असतात. मुले फार एंजॉय करतात. पुर्ण वेळ हसणे चालूच राहते. याचा छान विडिओ सुद्धा काढायचा.

१०) एखाद्या वस्तूचे नाव घ्यायचे, जसे की दोन रुमाल, दहा रुपयाची नोट, लाल हेअर बॅण्ड... आणि ती वस्तू जो पहिला आणेल त्याला तिथल्या तिथे एक चॉकलेट

११) चित्र बघा शब्द ओळखा - हा खेळ आम्ही फॅमिलीसोबत खेळलो आहे. सध्या मुलगी आणि तिच्या मैत्रीणी मोठ्या झाल्याने यंदाच्या वाढदिवसाला खेळणार आहोत.
यावर ईथे धागा काढलेला. - https://www.maayboli.com/node/80918
सोसायटीतील मुलांचीच नावे, त्यांच्या मध्ये फेमस असलेले कॅरेक्टर, शब्द ठेवले तर त्यांना मजा येईल असे वाटतेय.

१२) एक मछली... पाणी मे गयी.. छप्पाक - अधिक माहितीसाठी रील बघा याच्या. सोसायटीमधील मुलांमध्ये सुद्धा ट्रेण्डिग असल्याने हा सुद्धा सध्या खेळायचा विचार आहे. याचा विडिओ सुद्धा मजेशीर बनेल, जो त्यांनाच बघायला आवडेल.

१३) Who knows Birthday boy/girl better - यात ज्याचा वाढदिवस आहे तो आपल्याबद्दल काही प्रश्न विचारणार.. जसे की माझा फेवरेट हिरो. कार्टून, रंग... वगैरे वगैरे... आणि जो कर्रेक्ट उत्तर देणार त्याला तिथल्या तिथे चॉकलेट. हा आम्ही फॅमिलीमध्ये खेळलो आहोत. मजा येते. यावेळी वाढदिवसाला हा खेळ खेळायचा विचार आहे.

१४) संगीत स्टेशन - माझ्या काही फारसा आवडीचा गेम नाही. पण साधा सोपा सहज आहे. मुलांना नाचायला आणि कोणाची चिट्टी येत कोण बाद झाला हे बघायला मजा येते.

१५) एक चटई असते. ज्यावर उलटे सुलटे हातापायाचे निशाण असतात. त्यावर त्यानुसार आपले हातपाय चिकटवत उड्या मरत इथून तिथे जायचे असते. मागच्या एका वाढदिवसाला ट्रेंडिंग असल्याने हे खेळलो होतो. आमची चटई असल्याने आमच्या घरच्या मुलांनीच पटापट उड्या मारल्या. म्हणून त्यांना बक्षीस दिले नाही.

चटचट आठवले, ज्यांचा स्वानुभव आहे ते पटपट लिहिले.. अजून ईतरांच्या बर्थ डे पार्टीत पाहिलेले आठवून प्रतिसादात भर टाकत जाईन.. जगभरात असे शेकडो खेळ खेळले जात असतील.. येऊ द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा भारी. Wednesday Adams माहीत नव्हतं. बरंच साम्य आहे. Adam - Kadam हे पण भारी आहे. मुलांची डोकी काय चालतील!

परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
आमच्याकडे पोरं कुठलाही गेम खेळण्याच्या मुड मध्ये नसतात.. गोंगाट असतो नुसता.. पोरी बिचाऱ्या शांत बसतात.

अरे व्वा मस्त सेलिब्रेशन. भिंतीवर "कागद, फोटो आणि सगळ्यांच्या विशेस "ही आयडिया आवडली. सॉलिड डोकी चालतात मुलांची.

मानव, धनुडी, रुपाली धन्यवाद Happy

रूपाली हो, गोंगाट तर आमच्याकडेही फार असतो. तोच उत्साह जरा कंट्रोलमध्ये ठेवायला बघायचे. आमच्याकडे गेम खेळताना पोरगी माईक वापरून बोलत होती. घरातल्या घरात माईक कश्याला असे वाटेल. पण ते फायद्याचे ठरते. आणि मजाही येते..

उद्या गरज आणि आज धागा वर काढत आहे
पण घराचे काम काढले त्यातच बीजी होतो...
काही नवीन गेम्स किंवा ट्रेंड मार्केटमध्ये??
मला कळतील तसे मी शेअर करतो...

मोठ्या लेकीचा..
छोट्या बाळाच्या वेळी टेन्शन नसते. त्याच्या मित्रांना घेऊन सुचेल ते खेळ खेळायचे आणि मग गाणी लाऊन नाचायला लावायचे. मनसोक्त दंगा घालू द्यायचे जे त्यांना त्यांचे आईबाप त्यांच्या घरी घालू देत नाही.. की ते तेवढ्यातच खुश

बरेच गेम्स आहेत की.

शब्द ओळखा - नुसते लेटर्स द्यायचे व सांगायचे
वस्तुंवरून गाणं ओळखा - वेगवेगळ्या वस्तु ठेवून गाणं ओळखायचं
डार्ट आहे
डंबशराड आहे
नेमाबाजी. - टेबलावर कप्स ठेवायचे आणि बॉल फेकायचा.
टाईम बॉउन्ड गेम हे खालील गेम खेळु शकता :
५ मिनिटात चित्र काढा वगैरे.
फाईंड त स्पॉट - एखादी बहुली काढली की तिला टिकली काढायची डोळ्यावर पट्टी बांधून.
किंग आणि क्वीन आहे - एकाला राजा आणि एकीला राणी बनवायचे. फक्त हिंट्स द्यायच्या की राजाने कपडे घातलेत त्यात पिवळा रंग आहे. नाकात बोलतो, चश्मा आहे. तुम्ही पाहिजे त्या हिंट्स ठरवा आणि द्या. बेसीकली ह्या गेममध्ये मुलांचा आत्मविश्वास वाढतो की राजा काय कोणीही होवु शकतो. ::)

मृणाली, किल्ली धन्यवाद Happy

झंपी धन्यवाद आणि तुम्ही सुचवलेल्या या एका खेळाच्या जवळ जाणारा एक खेळ ट्रेडिंग आहे आणि तो एक फायनल केला आहे.

<<<<<< वस्तुंवरून गाणं ओळखा - वेगवेगळ्या वस्तु ठेवून गाणं ओळखायचं >>>>>

फरक असा की गाण्यात असलेल्या वस्तू टेबलवर मांडून ठेवायच्या. गाणे वाजवायचे आणि त्यात जसे शब्द येतील तशा वस्तू ओळखून उचलायच्या. टीम बनवून हा गेम खेळणार आहोत. टीम गेममध्ये मुले जास्त एन्जॉय करतात हा अनुभव.. आता घरात वस्तू कुठल्या आहेत हे बघून गाणी शोधायला घेतो Happy

धन्यवाद माझेमन Happy

काल दोन खेळ खेळलो. एक वर उल्लेखलेला. गाणी ऐकून वस्तू उचला.
मजा आली. अजून गाणी ठेवायला आवडले असते. पण वेळ नव्हता तितकी गाणी शोधायला. तरी आम्ही ठेवलेली गाणी ही होती,

१) धूम थीम साँग - बाईक (खेळण्यातली)

२) एक दोन तीन, माधुरी, तेजाब - कॅलेंडर

३) नगाडा बजा, जब वुई मेट - ढोल (खेळण्यातला)

४) परी हू में - लेकीचा फोटो असलेली उशी

५) आयपीएल थीम म्युजिक - बॅट

६) कुछ तो बता, फोन का नंबर घर का पता (फिर भी दिल है हिंदुस्तानी) - visiting कार्ड

७) अपनी छत्री तुमको दे दे कभी जो बरसे पानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी टायटल ट्रॅक - छत्री

८) चलाओ ना नैनो से बान रे, जान लेलो ना जान रे - धनुष्यबाण

९) चड्डी पहन के फूल खिला है, जंगल बुक - फूल
(मला चड्डी ठेवायची होती पण घरच्यांनी आय मीन बायकापोरांनी विरोध केला Proud )

१०) क्यू पैसा पैसा करती है, तू पैसे पे क्यू मरती है - पैश्याचे पाकीट

११) आओ सुनाऊ प्यार की एक कहाणी (क्रिश) - स्टोरी बुक

१२) संदेसे आते है (बॉर्डर) - पत्र नव्हते घरात म्हणून एक invitation card ठेवले.

१३) जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा - महाराजांची मूर्ती

दुसरा खेळ -
पाण्याचे ग्लास भरायचे पण पाणी सांडवायचे नाही.
एक पाण्याचा ग्लास टेबलावर काठोकाठ भरून ठेवायचा. आलटून पालटून दोन्ही टीम मधील एकेक जण येऊन बाटलीतून एखादा थेंब पाणी टाकत जाणार. ज्याच्या थेंबाला ग्लासातले पाणी ओव्हरफ्लो होत घरंगळणार ते हरले आणि समोरच्या टीमला पॉइंट.

Pages