बहुरुपी

Submitted by सामो on 10 March, 2024 - 03:49

कधीकधी वरवर सभ्यपणाचा आव आणुन
प्रेम येतं. अगदी दारावर टकटक करत
आपण म्हणतो "आत्ता वेळ नाही..... मग ये!"
.
"अरे काही काळ-वेळेचं भान? चालता हो!"
.
"लायकी नाही माझी. निघून जा."
.
पण हे बेटं! सभ्यपणाचा बुरखा टाकून,
धटिंगणासारखं आतच घुसतं.
आपलच घर असल्यासारखं,
ताणुन देतं.
खनपटीलाच बसतं
पूर्ण घराची उलथापालथ करुन,
जाताना मात्र, गर्भश्रीमंत करुन जातं.
--------------------------------
तर कधी प्रेम भिजलेल्या मांजराच्या
पिल्लासारखं,
वळचणीला सापडतं.
आपण आत घेतो
आणि हे लळा लावतं
आणि मारे एके दिवशी शेपूट वर करुन चालतं होतं,
परत न येण्याकरता.
-------------------------------
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
आपण आसरा देतो आणि
आपला अरब कधी बनला
कळतही नाही.
-------------------------------------
कधीकधी तर पाऊस बनून अवेळी गाठतं.
पार भिजवुन टाकतं.
.
काय करावं या बहुरुप्याला
एक रुप असेल तर शपथ!
माणसाने आपला बचाव तरी कसा करायचा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
२ states मधलं गाणं आठवलं - लोचा ए उलफत हो गया

अगं अरब उंट कथा.
प्रेमच व्यापुन रहातं, आपलं 'स्व' गळून पडतं. किंवा ज्याला जो लागेल तो अर्थ.

>>>>>>>>>Taken for granted.
शर्मिला खरच असेही असू शकते की.

पण Taken for granted. - मला खटकत नाही. एखाद्या (प्रिय व जवळच्या) व्यक्तीच्या जीवनातील विश्वासार्ह भाग बनणं, ही मला उच्च कॉम्प्लिमेन्ट वाटते.

प्रेम उंटही असतं हं कधीकधी
आपण आसरा देतो आणि
आपला अरब कधी बनला
कळतही नाही.>> खरंय! >>>> मला
जुन्या झालेल्या नात्यात जोडीदार manipulative किंवा abusive kinva possessive झाला/झाली तर अस काहीसं वाटलं

समो छान लिहिलयस!

Fifty Shades of Love Happy Happy Happy