चित्रावरून लिखाण - मुखवटा

Submitted by सामो on 1 March, 2024 - 13:52

प्रेरणा - https://www.maayboli.com/node/84725
छन्दिफन्दी ही घे, चित्रावरुन कथा Happy माझाही प्रयत्न.
_____________________________
--------------------------------------
https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczORP0Q1LmWvVfTFrG0ACZcEqZ0Gld7oiL2lThVxRo3VVQBTwaNlq9fnDRhFgRhVcbFto6IJaK8z-qDqvepS-TFfaRkn5K-Ab8z1Rfptmh9wBsTCIYkW9TebdHP0jBd5JZCVf8f188zNPtajAk0iQoodFw=w684-h608-s-no-gm?authuser=0

'सिंगल मिंगल' या कार्यक्रमात, हर्षदला खरं तर भाग घ्यायची तितकीशी इच्छा नव्हती पण मित्राच्या आग्रहावरुन तो तयार झाला. त्याचे सिलेक्शनही झाले आणि आज तो मुख्य दिवस होता जेव्हा, त्याला कोणीतरी मैत्रिण भेटण्याची संधी होती. म्हणजे असे समजू नका की त्याला मैत्रिणी नव्हत्या पण अगदी घट्ट अशी मैत्री कोणाशीच झालेली नव्हती. डेटा अ‍ॅनॅलिस्ट म्हणुन काम करताना, अनेक सहकारी तरुणी त्याच्या वर्तुळात होत्या पण शुक्रवारी घरच्या घरी हॉट डॉग, पॉपकॉर्न, पिझ्झा खात एखादीबरोबर सिनेमा पहाण्याइतकी त्याची सलगी नव्हती. आणि तसं पाहता जंक फुडच्याही बाबतीत त्याचा कटाक्ष होता - नाही म्हणजे नाही. आणि ग्रीन टी पित, सॅलड खात शुक्रवारी सिनेमा पहाण्यात कोण्याही मुलीला तसाही रस असण्याची शक्यता निगेटिव्हच होती. मिस्टर परफेक्शनिस्ट हा खिताब त्याला सहज सूट झाला असता.

केसांना पोमेड लावुन, पर्फ्युम स्प्रे करुन (हलका बरं का, ओव्हरपॉवरिंग नाही) सुटाबुटात तो जायला सज्ज झाला. पांढरा शर्ट व रॉयल ब्लू चमकदार ब्रॉकेडीश डिझाईन असलेला टाय आणि काळी पँट. खूप देखणा दिसत होताच. खरं तर मुली त्याच्यावर सहज लट्टू होउ शकल्या असत्या. पण हाच अति चोखंदळ आण अतिवर्कोहोलिक असल्याने तसे काही झालेले नव्हते. त्याचे करीअरशीच लग्न झालेले होते म्हटल्यास वावगे ठरले नसते.

एक सुंदर सजविलेले स्टेज होते आणि त्या स्टेजच्या एका बाजूला वीस एक पुरुष जमलेले होते काही कॅज्युअल अटायरमध्ये तर बरेच जण फॉर्मल अटायरमध्ये. दुसर्‍या बाजूला बंद खोलीत त्या कार्यक्रमात सिलेक्ट झालेल्या वीस मुली. होस्टने आवाहन केले की प्रत्येकाने आवडेल तो मुखवटा घालावा. आणि आपापल्या लव्ह सीट/सोफ्यावर स्थानापन्न व्हावे. थोड्याच वेळात मुलीही मुखवटा घालून येतील व मुखवट्याची जोडी जमेल त्या त्या जोडीने खेळ खेळावेत. अं हं मुखवटा न काढता. पार्टी गेम्स अरेंज केलेले होते, डान्सेस होते. खेळ खेळता खेळता एका विविक्षित क्षणी मुखवटे गळून पडणार होते आणि तदुपरान्त, वाटल्यास आपल्याला आपला जोडीदार स्वॉप (स्वॅप) करता येणार होता. पण परस्परसंमतीने. डीजेज इंग्रजी व हिंदी गाणी वाजवत होते. एक मुखवटा, हर्षदलाही मिळाला व तो स्थानापन्न होउन, आतुरतेने त्याच्या जोडीदाराची वाट पाहू लागला.

डीजेंनी अगदी स्लो सुरावटीत, 'माना हो तुम बेहद हंसी ...' रिमिक्स सुरु केले आणि स्टेजच्या दुसर्‍या बाजूने मुलींची एन्ट्री झाली. सर्वांच्या चेहर्‍यावरती मुखवटे होते. हर्षदच्या शेजारी तसाच मुखवटा घातलेली एक तरुणी येउन म्हणाली "मे आय सिट हियर?" आणि हर्षदने "ऑफ कोर्स" म्हणत तिला जागा करुन दिली.

एकेक खेळ सुरु झाले जसे - आईस ब्रेकर होता, दुसरा गेम होता - प्रत्येकाने स्वतःबद्दल, तीन पॉइन्टस सांगायचे - २ फॅक्टस आणि १ फिक्शन(खोटे.) आणि जोडीदाराने एकंदर आतापर्यंतच्या संभाषणावरुन जज करुन, ते एक खोटे पकडायचे. आतापर्यंत हर्षदला एवढेच कळलेले होते की तिचे नाव आहे प्रमिता आणि ती एका रिटायर्ड ज्येनांच्या कम्युनिटीकरता काम करते. तिचे जॉब प्रोफाईल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असून, तिला चित्रपट/नाटके/पुस्तके आवडत. ती एक्ट्रोव्हर्ट वाटत असून, कदाचित त्याच्यासारखीच परफेक्शनिस्टही होती. आवाज किनरा नव्हता पण गोड व नाजूक होता. पुढे ट्रुथ ऑर डेअर वगैरे टाइप खेळही झाले. नंतर काही वेळाने इंग्रजी-हिंदी गाण्यांवरती एकत्र नाचण्याची संधी होती. डिस्को बॉल, खाण्या पिण्याची रेलचेल , संगीतमय आणि सुगंधी असे एकंदर heady माहौल होता. खरे तर हर्षदला तिचा सहवास आवडला होता कारण बोलताना मृदू असली तरी शी वॉज इन्टेलेक्च्युअल व ठाम मते असलेली होती. तिची विचारपद्धती सॉर्टेड होतीच पण एकंदर ती ब्रॉड माईंडेडही होती. सर्व खेळांच्या तसेच कार्यक्रमाच्या शेवटी, जोड्यांनी मुखवटे काढणे, फोन नंबर्स देणे, व पुढे जुळुन यावे असे काहीसे अपेक्षित असलेला हा कार्यक्रम 'क्ष' चॅनलवरती २ आठवड्यात, टेलिकास्ट होणार होता. आणि पुढे १ महीन्यानंतर याच सर्व जोड्यांचे रियुनिअनही असणार होते. एका क्षणी मुखवटे गळून पडले आणि - हर्षदला ती प्रथम भेटीतच आवडून गेली. तरतरीत नाक आणि चेहर्‍यावरची बुद्धीमत्तेची चमक. थोड्याच वेळात, त्यांनी एकमेकांना आडनाव सांगीतले मात्र आपल्या देखण्या हिरोचा चेहरा एका बेसावध क्षणाकरता पडला, फिकुटला. तिने तो क्षण बरोब्बर झेलला आणि कदाचित कॅमेर्‍यानेही. आणि तिला विलक्षण हसू आले. हर्षद सावरुन म्हणालाही "हासतेस का?" आणि ती म्हणाली "नाही!! कळलं मला. गरज नाही फोन नंबर्स देण्याघेण्याची" हर्षद क्षीण आवाजात, म्हणणार "अगं पण का?..." आणि ती म्हणाली "अरे मुखवटा गळून पडला ना? आता सांगण्या-विचारण्यासारखं उरलच काय असो तुला गुड लक. यु विल नीड इट." आणि ती सहजच हर्षदचा हात सोडून ग्रुपमध्ये मिसळून गेली.
आणि हर्षद काढलेल्या मुखवट्याकडे पहात विचार करत राहीला, आज जे झाले ते त्याला नक्की किती काळ हाँट करणार होते - कदाचित आयुष्यभर!...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिली आहे..
त्यांनी एकमेकांना आडनाव सांगीतले मात्र आपल्या देखण्या हिरोचा चेहरा एका बेसावध क्षणाकरता पडला, फिकुटला.>> म्हणजे जात -पात वगैरे का??
मग तो नंतर दुःखी का झाला??
हर्षद क्षीण आवाजात>>>

सामो उपक्रमात सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद!!

रीया धन्यवाद.
@छंदीफंदी - अगं पितळ उघडं पडल्याची, लाज वाटतेच ना म्हणुन त्याने गिल्टी व क्षीण आवाजात विचारले.

मलाही खूप आवडली..
पण शेवट नाही माझ्या मनाजोगता झाला.
कारण माणसाचा स्वभाव बदलत नाही असे म्हणतात. जे खरेही असेल. पण विचार बदलतात माणसाचे.. आणि प्रेमात पडणे हे तर एक मोठे कारण असू शकते त्या बदलांचे.. म्हणून प्रत्येक जण किमान एक तरी संधी डीजर्व्ह करतोच.. हार्ड लक!

पण काहीजण मैत्रीतही जात बघत असावेत.
>>>

जातीपातीचे बाळकडू घरून असतात.. पुढे जाऊन विचार बदलू शकतात किंवा आपले असे स्वतःचे तयार होऊ शकतात.

असो.. दुसऱ्या धाग्यावरील चर्चेच्या अनुषंगाने मी या बाबतचे माझे विचार आणि स्वानुभव उद्या परवा वेळ मिळताच लिहीणार होतोच. त्यात झाल्यास या मुद्द्याला सुद्धा स्पर्श होईल..
तूर्तास झोप आली.. शुभ रात्री Happy

@छंदीफंदी - अगं पितळ उघडं पडल्याची, लाज वाटतेच ना>> hmm

मला गंमत वाटली की कथा छान चाललेली.. मास्क काढल्यावर काहीतरी ट्विस्ट येणार माहिती होत पण एकदम जात वगैरे अनपेक्षित होत..

**
लेखासंदर्भात नाही पण
आजकाल पुढे जायच्या ऐवजी मागे मागे जायला लागलो आहोत असे वाटते कधी कधी वाटते ..

चांगली लिहिली.
बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणी बाबत असं घडलं होतं. (आताच्या काळात खोटं वाटू शकतं )
ती एकाच्या प्रेमात पडली होती. त्यांच आडनाव तिला हवं ते (म्हणजे उच्चवर्णीय ) होतं.
पण काही दिवसांनी तिला कळलं, ते आडनाव इतर जातीतही असतं, आणि तो तिला नको त्या जातीचा होता.

पुढे काही कारणांनी त्यांचं फिसकटच.

वा, कथानायकाची वृत्ती काय अचूक टिपली आहे, सामो, बढीया!
जो सद्गृहस्थ ठरवून जंकफूड टाळतो, त्याला शुक्रवारी रात्रीही ग्रीन टी आणि सॅलड लागतं, त्याच्या स्वभावाशी अतिशय सुसंगत हा 'बेसावध' क्षण आहे. अशा एखाद्याच्या आपल्या सहचारिणीबाबतच्या संकल्पना पक्क्या असणं शक्य आहे, नव्हे आवश्यक आहे! एक तडजोड म्हणून तो असल्या मॉड फॅड गोष्टींमध्ये सहभागी होत असेलही. वाघ्याचा पाग्या झाला असेलही, पण म्हणून त्याचा येळकोट जाईल याची खात्री काय? खरं तर ही मोमेंट ऑफ एपिफनी आहे. आपलं वाकडं शेपूट सरळ होणार नाही याची त्याला जाणीव झाली ना! हे समजणंच महत्त्वाचे. त्याचं दुःख होणं हेही स्वाभाविक आहे.
बाकी ज्यात्या वाचकाची आपापली कल्पनादुःखे! Happy

स्वाती, शर्मिला, अबुवा तुम्हाला धन्यवाद.
अबुवा क्या बात है! अचूक विश्लेषण आहे की. पण 'मोमेंट ऑफ एपिफनी' हा वाक्प्रचार पहील्यांदा ऐकला. नाही कळला. वेळ मिळाल्यास अर्थ जरुर सांगावा.

माझ्या गेल्या वेळेची रुममेट प्रेमात पडलेली होती. ती त्याच्याबरोबर लिव इन सुद्धा होती. आणि नंतर माझी रुममेट बनली अर्थात. पण ती होती तेलुगु सोनार आणि तो ही तेलुगुच होता पण खालच्या जातीतला आहे असे तिचे म्हणणे होते. नंतर तिने काही मुले पाहीली व सरतेशेवटी याच्याशीच विवाह केला. आता सुखात आहे.

पण 'मोमेंट ऑफ एपिफनी' हा वाक्प्रचार पहील्यांदा ऐकला. >> माझ्या मते आत्मज्ञानाचा क्षण.

मी बदललो आहे असं समजत होतो. पण या क्षणी मी कमी पडलो. माझा त्या मुखवट्याच्या आतला मुखवटाच निघाला! तोही गळून पडला. आता ज्या चेहेऱ्याचा मी धनी आहे, त्याच्याशी झगडायचं आयुष्यभर? का जे अपरिवर्तनीय आहे त्याला संभाळून जगायचं?

हे जर कथानायकाला उमजलं तर... झालंच म्हणायचं की हो - आत्मज्ञान Lol

सुंदर!!

अवांतर - हे असा एक क्षण सुद्धा हाँट करतो. हा अनुभव आहे.

परफेक्ट.
बेसावधपणे गळून पडलेला मास्क…..

अबुवांचा प्रतिसाद आवडला.
त्याचा मास्क गळून पडला, पण त्यानंतर आपल्या मास्कमागच्या खर्‍या चेहर्‍याची जाणीव होऊन त्याला दु:ख झालं यामुळे कथा वेगळ्या उंचीवर गेली.

खुप छान कथा!

अबुवा यांचे प्रतिसाद पण छानच!!

.