स्पिरिट ऑफ फ्रायडे!!!

Submitted by अश्विनीमामी on 5 February, 2024 - 05:48

काम थोडे कमी असले की मी कधी कधी आरामात आवरून जिवाचे मुलुं ड - पाच रस्ताच खरेतर - करुन हपिसात अवतार घेत असते. नडलेल्यांचे फोन कमी येतात. सुकून हा मुंबईत कधीही न मिळणारा पदार्थ १०० ग्राम चाखा यला मिळतो. तर परवाच्या
शुक्रवारी एक गम्मत घडली. मी अशीच घरातुन निघून पाच रस्त्यात मेडिकल शॉप मध्ये धडपडत आले. तिथे ही गर्दी म्हातार्‍यांचीच. मग नेहमीचा शिरस्ता असा की दवा घ्यायची. मग रस्ता क्रॉस करुन कीर्ति महल मध्ये जायचे. निवांत उपमा ,वडा नाहीतर ऑनिअन उत्तपम खायचे व आटो करुन हपीसात जायचे.

औषधे घेउन, उपमा खाउन मी बाहेर पडले. आता आटो करायची. हा वेस्ट साइडने स्टेशनला जाणारा मेन रस्ता आहे त्यामुळे आटो मिळणे अंमळ अवघड आहे. इकडे तिकडे थोडे चालत जावे लागते. पण समोर एक थांबलेली आटो दिसली. रोड क्रॉस करुन गेले तर आटोवाला बसतो त्या शिटेवर एक बारके खार्‍या दाण्यांचे पाकीट दिसले. असेल काही च्याउ म्याउ म्हणून त्याला आतैं क्या विचारले.

आटो वाला महत्वाचे काम करत होता पक्षी. समोर एक बारीक खबदाड सारखे पण फुल्ली स्टॉक्ड वाइन शॉप आहे. हे मला तेव्हाच लक्षात आले. मला बसायला सांगून त्याने त्या दुकानातून एक क्लि अर लिक्विड, पक्षी जिन/ व्हॉडका टाइप काहीतरी घेतले. तुमचा काही कार्यक्रम आसेल तर मी दुसर्‍या आटोने जाईन म्हणून मी उठलेच पण नै नै चलो म्हणून तो निघालाच.

इतकेच नव्हे तर त्याने तो पव्वा आपली पाण्याची प्लास्टिकची बाटली असते, ती ही छोटी दहा रुपयाची. त्यात ओतला व सारखे करुन झाकण लावले. व रिक्षा चालवता चालवता आधी त्या शेंगदाण्याचा बकाणा भरला. व एक मोठा घोट रिचवला !! हे फुल ट्राफिक मध्ये ४० स्पीडला!!

टर्न घेइपरेन्त माझी तंतरलेली होती. अरे देवा. आय डोंट सपोर्ट ड्रंक ड्रायविंग अ‍ॅट ऑल. झिरो टॉलरन्स. पण उतरता ही येइना.
नशीबाने पुढच्या टर्नला मोठा सिग्नल लागला. मी भर्रकन त्याच्या अंगावर पैसे टाकले व उतरुन घेतले. मला इथेच एक काम आहे सांगून.
तसे ते होते ही. मग ही दारुडी- बेवडी रिक्षा आली तशीच सिग्नल मध्ये भुर्र कन निघून गेली. बाटली अर्धी पेक्षा जास्त खाली करुन. पुढे काय झाले कोण जाणे. मी फुटपाथ वर उतरुन एक मोठा श्वास घेतला व कामाच्या दुकानात गेले. खुर्ची वर बसून दम खाल्ला व दुकानदाराला ही मज्जा सांगितली. पुढचे काम करुन दुसरी रिक्षा घेउन डेस्क वर आले. पण तरी मन धडधडत होते. साठ वर्शातला बेवड्या आटो चा हा पहिलाच अनुभव व शेवटचा ही. मुंबईत काही ही केव्हाही घडू शकते हे परत एकदा जाणवले!!!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली,
तू बहुतेक कनेक्टेड व्हेइकल प्लॅटफॉर्म सिस्टीम विषयी सांगत आहेस का? IoT बेस्ड आहे ही.
IBM CVI, AWS IoT FleetWise, and Google GCP Vertex AI for Vehicles इत्यादी इम्प्लिमेंटेशन्स दिसत आहेत.

इंटरेस्टिंग काहीतरी सांगितलेस. थँक्स.

हो अतुल iot च.
कम्पनी मध्ये in house develop केलीये for our fleet

अंधेरी हा मुंबईचा भाग नाही? उपनगर हा मुंबईचा भाग नाही? की लिहायला एखादी ओळ जास्त मिळते म्हणून काहीही ठोकून देणार?

उ बो, तुम्ही चूक म्हणून दिलेल्या लिंकमध्येच मला अपेक्षित बरोबर विभागणी आहे Happy
पण हा मुद्दा नुसता तेवढ्यापुरता नाही, यात कोणाला चूक कोणाला बरोबर ठरवण्यात मला स्वारस्य नाही. यामागे काही भावनिक पदर आहेत, ते सुद्धा उलगडणे गरजेचे. सध्या बिजी आहे, थोडा वेळ द्या. स्वतंत्र धाग्यात हलवूया ही चर्चा Happy

काहिही काय? गिरे तो भी टांग उप्पर..
त्या लिंक मधे मुंबई ची बॉर्डर & झूम केल्यास मुंबई मधील सर्व भागांची नावे आहेत. मुंबई सायन माहिम पर्यंत च आहे ही तुझी माहिती एकदम चूक आहे तू मान्य कर अथवा नको.

पुलंनी म्हटले त्याचे अजून मायक्रोस्कोपीक करून:
कलानगर मधील माणसाने धारावीला जाऊन येताना घरी "मी मुंबईला जाऊन येतोय" असे सांगावे.

ऋन्मेष बरोबर बोलतोय. मुंबई शहर हे माहिमपर्यंतच (आणि सेंट्रलला बहुतेक सायनपर्यंत)
पुढचा दहिसर व मुलुंडपर्यतचा एरीआ हा अधिकृतरित्या मुंबई उपनगरे. नंतर ठाणे जिल्हा आणि हे सगळं मिळून मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एम एम आर डी ए)
त्यात परत साधारण गिरगावच्या पुढले उच्चभ्रू एरीयातील टाऊनी/सोबो हे वेगळे अनऑफिशिअल स्टेटस. तिथल्या मित्रांच्या बोलण्यात टाऊनला जातोय वगैरे सर्रास उल्लेख असायचा.
मुंबई महानगर पालिका ही मुंबई शहर व उपनगरे गव्हर्न करते. ऑफिशिअल डॉक्युमेंटसवर मुंबई मनपा क्षेत्रातील किंवा मुंबई शहर व उपनगरे यांतील असा उल्लेख असतो.

Pages