गझल तिची तिच्यासाठी.........

Submitted by श्रीराम_देशपांडे on 14 January, 2024 - 13:06

तुझे मन जिंकणारी मीच होते
जगाशी भांडणारी मीच होते

शहाण्यांनी केले उपदेश जेव्हां
तेव्हा समजावणारी मीच होते

माझे मन शांत झाले की तुझ्यावर
........परत संतापणारी मीच होते

मुलांची झोप व्हावी पूर्ण म्हणुनी
अवेळी जागणारी मीच होते

'थोडे खाऊन जरा आराम कर तू'
......मला हे सांगणारी मीच होते

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वृत्त - मृगाक्षी

ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
म ला वा टा य चे ये शी ल सु द्धा
१ २ २ २ १ २ २ २ १ २ २ = १९ मात्रा

या वृत्तात हि गझल बांधण्याचा प्रयास केला आहे.
कृपया स्पष्ट प्रतिसाद द्या. धन्यवाद.