12थ फेल आणि राजकारण

Submitted by WallE on 13 January, 2024 - 02:37

मायबोली वर "१२थ फेल" या चिरत्रपटावर भरपूर चर्चा झाली. याच चित्रपटात एक सवांद आहे, ज्यात मनोज शर्मा मुलाखतीच्या वेळी एक वाक्य बोलतो कि जर लोक शिक्षित झाले तर राजकारणी लोकांना त्रास होईल आणि त्यांना राजकारण करता येणार नाही.
या अवस्थेचा काँग्रेस सारख्या मोठ्या राजनैतिक पक्षाने पुरेपूर उपयोग करून घेतला. विशेष म्हणजे काँग्रेस मधील सर्वोच्च नेत्यांनी शहरी भागातून निवडणूक न लढवता, ग्रामीण भागाला प्राधान्य दिले. त्यांना शक्य असून शहरी मतदार संघाची निवड न करता ग्रामीण मतदार संघाची निवड केली. त्यांनी असे का केले असावे.

संदर्भासाठी सर्वोच्च नेत्यांच्या लोकसभा मतदार संघाची सूची सोबतीला दिली आहे.
जवाहरलाल नेहरू - फुलपुर
फिरोज गांधी - रायबरेली
इंदिरा गांधी - मेडक, चिकमंगळूर, रायबरेली
राजीव गांधी - अमेठी
संजय गांधी - अमेठी
सोनिया गांधी - रायबरेली, अमेठी
राहुल गांधी - अमेठी, वायनाड

शिक्षण, साक्षरता, प्रगल्भता, राजकारण यावर विचार करा आणि आपले विचार इथे मांडा. सगळे मिळून साधक चर्चा करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहकार क्षेत्राच जाळ काँग्रेसने ग्रामीण भागात रूजवल त्याद्वारे काँग्रेसची मुळही ग्रामीण भागात रुजलीयाच उत्तम उदाहरण महाराष्ट्रात पहायलि मिळते आजही शहरी मतदार व ग्रामीण मतदार असे दोन वर्ग आढळतात त्यामुळेच काँग्रेस पक्ष निवडणुकीत ग्रामीण भागात जास्त भर देत आला आहे.