जसं आहे तसं स्वतःला स्वीकारलं तर मनात चालणारं विचारांच तांडव बऱ्याच अंशी कमी होतं.
मी असाच का ? मी असा का नाही ?
या असल्या प्रश्नांना उत्तरंच नसतं मुळात.
मला अमुक व्यक्तीसारखं व्हायचंय हा विचार करणं म्हणजे जणू निसर्गाची प्रतारणा करण्यासारखंच.
माणसामाणसातील वेगळेपणा हि ईश्वराने माणसाला दिलेली देणगीच.
स्वभावातील, विचारातील, हसण्यातील, दिसण्यातील वैविध्यपणा प्रत्येकाला गूढ बनवतो .
अगदी आनंदाच्या परिभाषा ही प्रत्येकाच्या वेगवेगळया असतात उदाहरणच द्यायचं झालं तर,
हेच बघाना काहींना पावसात भिजायला खूप आवडत,
तर काहींना तोच पाऊस घराच्या खिडकीतून पाहायला खूप आवडतो.
तर काही माणसं विश्वदर्शनासाठी घराबाहेर पडतात तर
काही माणसं आपल्या लेखणीतून विश्वदर्शन घडवून आणतात .
जेंव्हा माणूस स्वतःला एका विशिष्ट नियमांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो
तेंव्हा त्याच्या जगण्यातील, विचारातील वेगळेपणा नाहिसा होतो एवढं नक्की...
पण परिस्थिती माणसाला त्या विशिष्ट नियमांच्या चौकटीत स्वतःला बसवायला भाग पाडते का ?
-अ.प्र.जोशी
स्वीकृती
Submitted by अ.प्र.जोशी on 28 December, 2023 - 03:19
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
छान विचारप्रवण कविता.
छान विचारप्रवण कविता. (विचारप्रवण या शब्दाचा, वाक्यातील उपयोग बरोबर आहे का?)