डंकी - बात मेरे मन की (चित्रपट परीक्षण)

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2023 - 02:15

डंकी - बात मेरे मन की

डंकी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा त्यात ठळक अक्षरात एक फलक होता,
From the director of
Munna Bhai
3 Idiots
PK

मला देखील चित्रपट बघायची उत्सुकता याचसाठी होती की वरील सर्व चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिराणी आता काय नवीन घेऊन येतोय.
आणि उत्सुकता यासाठी दुप्पट होती की यावेळी तो शाहरुखसोबत येत होता.

चित्रपट बघितला. आवडला. आणि शाहरुखबाबत काय म्हणावे... इतकेच म्हणू शकतो की जाहीरातीत अजून एक फलक हवा होता,
From the actor of
DDLJ
Chak De
My Name Is Khan
Dear Zindagi
Chennai Express
Jawan...
कारण या सर्व चित्रपटात दिसणारी त्याची रुपे या चित्रपटात दिसून आली, वापरली गेली.

चित्रपटाचे परीक्षण द्यायचे झाल्यास त्याचे ढळढळीतपणे दोन तुकडे करू शकतो.
मनोरंजक पहिला भाग
इमोशनल करणारा दुसरा भाग

फर्स्ट हाफ -

पहिल्या भागातील बरेच सीन ट्रेलर आणि गाण्यांमधून उघड झाले होते. पण ते पाहून वाटले होते की खरेच असे काही जग असते का? की हि निव्वळ सिनेमॅटीक लिबर्टी घेतली आहे?
पण मग शाहरूख आणि राजकुमार हिराणी यांची चित्रपटावरील चर्चा युट्यूब वर पाहीली. त्यात त्यांनी काही रिअल व्हिडिओ दाखवले होते.

उदाहरणार्थ …
ट्रेलर मध्ये जे बोमन इराणी नाच गात इंग्लिश शिकवताना दाखवला आहे ते जगाच्या या भागात खरेच तसे शिकवले जाते. आणि त्याहीपेक्षा फनी स्टाईलने शिकवले जाते..
प्रत्यक्षात एक गुरुद्वारा आहे त्याचे नावच व्हिसा गुरुद्वारा आहे जिथे हजारो लोकं येऊन देवाला खेळण्यातले विमान अर्पण करतात..
ज्या घरातील कोणी परदेशात जातात ते घराच्या गच्चीवर खरोखरच टेचात विमानाची प्रतिकृती बनवतात.

म्हणजे खरोखर एक सिली जाग अस्तित्वात आहे, किंवा चित्रपट ज्या काळात घडतो तेव्हा तरी होते..
आणि मग तिथे लीगल तसेच ईल्लीगल पद्धतीने परदेशात जायच्या जाहिराती देणारे एजंट... त्यातून होणारी फसवणूक.. आणि सरतेशेवटी सगळीकडे तोंड पोळले की मग डंकी मार्गाचा वापर.. हे सगळेच खरे होते. खरे आहे.

त्यामुळे चित्रपट बघायला जाताना आपण काही दिग्दर्शकाचा कल्पनाविलास बघायला आलेलो नाहीये, तर हे सत्य परीस्थितीचेच राजकुमार हिराणी स्टाईल ड्रामाटायझेशन आहे ईतके डोक्यात पक्के होते.

असो,
तर पिक्चर सुरू होतो ते थ्री ईडियट्सची आठवण करून देणार्‍या एका सीन ने.. आणि पहिल्या अर्ध्या पाऊण तासात अजून दोनचार सीन आपल्याला त्या मास्टरपीसची आठवण करून देतात. यामुळे जर रसभंग होऊ दिला नाही तर चित्रपट आपले पुरेसे मनोरंजन करत पुढे सरकतो. पण जर आपण खूप जास्तीच्या अपेक्षा ठेवून गेलो असू तर आपल्याला सतत काहीतरी मिसिंग आहे असे वाटण्याची पुरेपूर शक्यता आहे. माझे तरी सुरुवातीला असे होत होते.

आजूबाजूची पब्लिक एंजॉय करत होती. त्यात मुंबईची पब्लिक जरा धमालच असते. वयस्कर आणि जवान अश्या शाहरुखच्या दोन्ही एंट्रीना टाळ्या शिट्ट्या आरोळ्या आल्या. पण तरी हे बघायला मी आज ईथे आलो नाही असे मला वाटत होते. कारण हे माझे जवान मध्ये एंजॉय करून झाले होते.

पण हळूहळू थ्री ईडियट्सच्या प्रभावाबाहेर येत काही ओरिजिनल सीन येऊ लागले आणि मजा वाढू लागली. पण तितक्यात एका इमोशनल सीनवर पहिल्या भागाचा द एण्ड झाला. ईटरव्हलची पाटी झळकली.

यात एक नमूद करावे लागेल, चित्रपट जेव्हा शाहरुखचा असतो तेव्हा तो शाहरुखचाच असतो. त्याचे आमीरसारखे नसते, जसे की सब के साथ, अपना विकास. यात पडदा व्यापून शाहरुखच असतो. पण तरी विकी कौशल आपली छाप पाडून जातो. हे चित्रपट बघायला जायच्या आधीही मी ऐकून गेलो होतो की त्याचे काम खूप छान झाले आहे. आणि खरेच कमाल आहे तो माणूस. त्याने वाढलेल्या अपेक्षा सुद्धा पुर्ण केल्या.

बोमन इराणीला मुन्नाभाईमधील डॉ. अस्थाना आणि थ्री ईडियट्स मधील वायरस या भुमिकांनी ज्या चबुतर्‍यावर नेऊन बसवले आहे की आता त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याशी तुलना होऊन मला त्याचे या पठडीतील नवीन काम किंचित खुजेच वाटते. पंण यात त्याचा दोष नाही, त्याने आपले काम चोख बजावले आहे. त्याला मोजकेच प्रसंग आहेत, पण त्याने पाडलेली छाप लक्षात राहते.

अजून एक नमूद करायचे म्हणजे ट्रेलरमध्ये शाहरूखचा लूक बघून त्याला जे फॅन चित्रपटातून उचलून आणल्यासारखे वाटत होते ते चित्रपटात कुठेच तसे वाटले नाही. फॅन मी पाहिला आहे. त्यात तो एक दिल्लीचा सडाफटिंग लौंडा दाखवला होता. यात तो आर्मी ऑफिसर दाखवला आहे. आणि त्याचा आब राखणारेच त्याचे बेअरींग आहे.

पण त्या लाल शर्टचा सीन काही समजला नाही. जवान चित्रपटातील गाण्यात सुद्धा ते होते. यातही आहे. सेमच आहे का कल्पना नाही. पण अगदी डोळ्यात बदाम बदाम बदाम लेडी किलर लूक आहे. एखादे मी सुद्धा घ्यायचा विचार करतोय. पण सावळ्या रंगाकडे पाहून स्वताला आवरलेय.

तर ते एक असो,
दुसरा भाग मात्र हळूहळू चित्रपटाला वेगळ्या ऊंचीवर नेऊ लागतो.
गैरमार्गाने ईंग्लडला जाण्यासाठी जीव धोक्यात, महिला असेल तर जीवासोबत अब्रू धोक्यात, कधी किळस वाटावी तर कधी गुदमरून जावे अश्या परीस्थितीत घडणारा प्रवास, जो बघताना आपल्या अंगावर कधी शिसारी यावी तर कधी शहारा..
आणि ईतके सारे करून जे मिळवणार आहोत ते खरेच आपल्या मनाजोगते आहे का याची खात्री नसणे...
नसल्यास परतीचे सारे मार्ग बंद!

ईथे एका क्षणाला मला सैराट आठवला. एका मोठ्या घरातली मुलगी एका छोट्या घरातील मुलाच्या प्रेमात पडते. राजाराणीच्या गुलाबी संसाराची स्वप्ने बघत त्यासोबत पळून जाते आणि झोपडपट्टीत राहायची वेळ येते तेव्हा सत्य परीस्थितीचे भान येते... पण तो चित्रपट पुढे वेगळ्या अंगाने गेला, हा मात्र जिथून सुरू झाला तिथेच पुन्हा येऊन संपला. एक वर्तुळ पुर्ण झाले. कसे ते चित्रपटातच बघा.
पण एक नक्की, हा चित्रपट जो बघेल तो अश्याप्रकारे आपला देश सोडून जाताना शंभर नाही तर हजार वेळ विचार करेल.

पहिल्या भागात तापसी पन्नूला पाहून इथे आपली नेहमीची काजोल चालली असती, शाहरुखसोबत छान केमिस्ट्री जमली असती असे वाटून गेले. पण दुसर्‍या भागात तापसीने छान काम केले आहे. आणि क्लायमॅक्सला एखादी काजोल, प्रिती, राणी, करीना असती तर उगाच पुन्हा आपले ते वीरझारा झाले असते म्हणून मग तापसीच बरी असेही वाटले.

शाहरुख डोळ्यांनी छान अभिनय करतो असे मला आपले लहानपणापासून उगीचच वाटत आलेय. यात एका तापसीबरोबरच्या द्रुश्यात मात्र त्याने खरेच कमाल केली आहे. तापसी त्याच्याकडे प्रेमाने धावत येताना त्याच्या डोळ्यात उमलणारी आनंदाश्रूंची फुले, आणि क्षणात तो गैरसमज दूर होताच त्या फुलांचे होणारे काटे.. निव्वळ लाजवाब! मी राजाबाबू असतो तर थिएटरमध्ये तो सीन रिवाईंड करून बघितला असता.

पहिल्या भागातील ईंग्लिशच्या परीक्षा आणि दुसर्‍या भागातील कोर्टकचेरी हे छान जमलेले सीन.
पण पिक्चर त्याची ऊंची क्लायमॅक्सला गाठतो.

आपल्या मातृभुमीशी ज्याची नाळ जोडली गेली नाही अशी व्यक्ती अपवादानेच. सोबत सोनूचा आवाज. त्यात जिथे रोमान्सची वेळ येते तेव्हा तरुण शाहरूखला मागे टाकत म्हातारपणाचा शाहरूख सहज बाजी मारतो. पुर्ण चित्रपटातून साधला जाणारा परीणाम एकत्रितपणे क्लायमॅक्सला आपले काम चोख बजावतो. आणि आपल्याला खुर्ची सोडताना विचार करायला भाग पाडतो.. डंकीचा जो अर्थ शेवटी शाहरूखने तापसीला सांगताना दाखवले आहे तो या चित्रपटाचे सार ठरतो.
जे मी सुरुवातीपासून मिस करत होतो ते अखेरीस अचानक गवसल्यासारखे झाले. अन्यथा हे परीक्षण सुद्धा माझ्याकडून लिहिणे झाले नसते.

पिक्चर आवडल्यावर भारावलेल्या स्थितीत घरी येऊन त्यातील गाणी ऐकायची एक पद्धत असते. भले चित्रपट बघण्याआधी आवडलेले गाणे कुठलेही असो, पण जे गाणे चित्रपटाचा आत्मा असते ते चित्रपट बघून आल्यावर पुन्हा पुन्हा ऐकले जाते. थ्री ईडियट्स वेळी चित्रपट बघण्याआधी ऑल इज वेल आवडलेले. पण घरी आल्यावर मात्र "Give me some sunshine, Give me some rain" हेच शब्द सारखे गुणगुणत होतो. यावेळी आधी "लुटपुट गया" हे गाणे आवडले होते. पण चित्रपट बघून आल्यावर तो मान "निकले थे कभी हम घर से" या गाण्याने पटकावला. ते गाणे आधीही ऐकताना असे वाटले होते की याची खरी मजा चित्रपटातच येईल. आणि तसेच झाले. शब्द न शब्द ऊतरत जातात. आणि त्या गाण्याची शेवटची ओळ आपल्याला सुन्न करून जाते. का ते चित्रपट बघितल्यावरच समजेल. आता स्पॉईलर ठरेल..

हे गाणे ऐकून मन भरल्यावर "चल वे वतना" हे गाणे रीपीट मोडवर लावले गेले.. आणि आता ते आत उतरायला सुरुवात झाली आहे. पुन्हा चित्रपटातील ती द्रुश्ये आठवायला लागली आहेत.

खरे तर डंकीची गाणी जमली नाही असा एक सूर होता. मी सुद्धा त्यात सामील होतो. पण चित्रपट बघितल्यावर मत पुर्णपणे बदलले आहे. शब्द आणि सूर, दोन्हीही चित्रपटाचे इमोशन्स पकडून येतात. मै तेरा रस्ता देखूंगा हे गाणे सुद्धा सुटे ऐकायला तितके भारी वाटत नसले तरी चित्रपटात हेच काम करते.

या वर्षी शाहरुखचे तीन चित्रपट आले. तिन्ही ब्लॉकबस्टर झाले. मला तिन्ही चढत्या क्रमाने आवडले. तिन्ही मी पहिल्याच आठवड्यात थिएटरला पाहिले. तिन्हींचे परीक्षण मी सिनेमागल्लीवर लिहिले. आणि तिन्ही पोस्टना भरघोस प्रतिसाद मिळाला, म्हणजे मिळेल आता... तर आणखी काय पाहिजे आयुष्यात, आणि नवीन वर्षात प्रवेश करताना Happy

अरे हो, परीक्षण संपले इथे. पण मला एक प्रश्न पडला आहे,
शाहरूखला जेव्हा कुठल्या चित्रपटात म्हातारा दाखवतात तेव्हा त्याचे केस पिकलेले आणि तो स्वतः पाठीत वाकलेला का बरे दाखवतात? आताही प्रत्यक्षात तो त्याच वयाचा आहे ना, आणि कुठे आहे तसा? Happy

बाकी तुम्हाला सुद्धा एक प्रश्न पडला असेल,
रिव्यू डंकीचा आहे तर फोटोमध्ये अ‍ॅनिमलचा पोस्टरबॉय का?
तर ज्यांनी पुर्ण पोस्ट वाचली त्यांनाच आता शेवटी याचे उत्तर मिळेल Happy

त्याचे झाले असे, की मला शाहरूखसोबत फोटो काढून घ्यायला थिएटरबाहेर कुठे डंकीचा पोस्टरच सापडेना. मग या संजूबाबाचा, सॉरी रणबीर कपूरचा पोस्टर दिसला तर आठवणीसाठी म्हणून यासोबतच फोटो काढून घेतला.
ता.क. - अ‍ॅनिमल चित्रपट पाहिला नाहीये, तर अ‍ॅनिमल टिकाकारांनी प्लीज टारगेट करू नये Happy
पण तरीही हा फोटो या रिव्यू सोबत टाकायचा खोडसाळपणा केला याचे कारण एवढेच, की शाहरूखचा चित्रपट असला की त्याला एक्स्ट्रा स्क्रीन मिळतात असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते... पण कुठचे काय, त्याच्या साध्या पोस्टरला सुद्धा जागा मिळत नाही ईतकेच दाखवून द्यायचे होते Happy

dunki poster resize.jpg

डंकी ईतकाच जमलाय वाटते रिव्ह्यू.. राजकुमार हिराणीला असिस्ट करायला सुरुवात करतो मी पुढच्यावेळी...
असे मला आपले उगाचच वाटतेय Happy

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो तरीही सिनेमा नाहीच आवडला. त्याच्यातल्या अढळ स्टारपदाच्या लालसेने त्याच्यातल्या अभिनेत्याला तुडवून मागे टाकले आहे. सर्व सिनेमा, अभिनय, ते गाव, पटकथा सगळं बेगडी वाटत होतं. बोमन इराणी मला ओव्हररेटेड वाटतो, रिजिड देहबोली आणि मर्यादित हावभाव दाखवणारा चेहरा आहे. सूक्ष्म ॲटिट्यूड दिसत राहतो. पण इथे सगळे त्याच लेव्हलला उतरले आहेत. तापसी त्यातल्या त्यात प्रयत्न करत होती. सपोर्टिंग स्टाफ मोठ्या स्क्रीनवर काम मिळाले याच समाधानात 'ओव्हर' करत होता. शाहरुख अगदी भावनिक क्षणी सुद्धा उत्तेजीत वाटत होता, म्हणजे भांगड्याची एनर्जी दुःखद क्षणी दाखवत होता. त्याचे खांदे, हात ,पाय, चेहरा सगळं भांगड्याच्या तयारीत वाटलं. त्याने गमावलेला अभिनय एनर्जीने भरून काढायचा प्रयत्न केला आहे पण तेच नको होतं.

अभिनयाची रेंज पूर्वीसारखी राहिली नाही फक्त हाईट आहे. आताच्या बेगडीपणात तो मोल्ड करतोय स्वतःला, जी त्याची USP नाही. सनबर्न झालेल्या स्किनवर डिस्टेंपर फासल्यासारखा दिसतोय ते वेगळंच. फारच फेक वाटला सिनेमा, वाईट एवढ्यासाठी वाटतं की त्यांनी खरं वाटावं असे प्रयत्न केलेत असं सुद्धा वाटत नाही. आऊटडेटेड वाटला सिनेमा. कशाकशाविषयीच आस्था नसणाऱ्या लोकांची कलाकृती पोचत नाही. Failed to deliver...!

डंकी पाहीला. आवडला असता परंतु त्या कंटेनरमधल्या शिट्टी सिनने इतकी घाण वाटली की अजिबात आवडला नाही असे म्हणेन. त्या हिरानीला इतकं एक्स्प्लिसिट दाखवायची काय गरज होती? Sad

या विषयावर इतके दर्जेदार चित्रपट बघितले आहेत त्यामुळे हा चित्रपट अगदीच सुमार वाटतो.
उदाहरणादाखल "The Swimmers" .. बहुतेक नेटफ्लिक्स वरच् आहे..

The Swimmers - त्यांची परिस्थिती वेगळी होती. डंकी फ्लाइट घेणार्‍यांशी त्याची तुलना करता येणार नाही.

डंकी आवडला नाही. सर्व सिनेमा, अभिनय, ते गाव, पटकथा सगळं बेगडी वाटत होतं. +++
सुरुवातीचा अर्धा सिनेमा अगदी वाया घालवला आहे...
इंग्लिश शिकण्यातल्या मजा ' जबान संभालके' मध्ये खूपच बाघितल्या आहेत, अर्धा पाऊण तास घालवून दाखवाव असं काही नव्हतं.
त्यापेक्षा तो प्रवास जास्त दाखवला असता आणि मध्ये मध्ये जरा tp दाखवला असता तरी चाललं असतं..
शाहरुख फौजी असण्याचा तसा काहीच संबंध नाही. फौजी दाखवल्यामुळे खूपच गोष्टी पटत नाहीत..

Swimmers वेगळा असला तरी त्यांचा प्रवास आणि प्रवासाची जिद्द भिडते.

The Swimmers - त्यांची परिस्थिती वेगळी होती >> +७८६

Swimmers वेगळा असला तरी त्यांचा प्रवास आणि प्रवासाची जिद्द भिडते.>> +७८६

शाहरुख फौजी असण्याचा तसा काहीच संबंध नाही. फौजी दाखवल्यामुळे खूपच गोष्टी पटत नाहीत..>>>> कोर्टातला सीन मात्र त्यामुळेच पटतो.

स्विमर्स मधल्या त्या जलतरणपटूंची पार्श्वभूमी जरी वेगळी असली तरी आत्ताचा चर्चेचा विषय काय आहे त्या अनुषंगाने मी बोलत आहे. आपण या विषयाच्या अनुषंगाने बनवलेल्या सिनेमाबद्दल बोलत आहोत . त्याचे चित्रीकरण, त्याचं स्टोरी टेलिंग हे किती चांगलं असू शकतं याबद्दल बोलत आहोत..

Swimmer सारखा बनवला असता तर आपल्याकडे किती जणांनी तो थिएटरला जाऊन पाहिला असता शंका वाटते.

म्हणजेच चित्रपट चांगला बनवणे हे उद्दिष्टच नाहीये, हे लक्षात घ्या !
त्यामुळे चित्रपट चांगला आहे हा डंका थांबवा!

म्हणजेच चित्रपट चांगला बनवणे हे उद्दिष्टच नाहीये..
>>>>

असा त्याचा अर्थ होत नाही..
कमर्शियल बाजू सांभाळून चांगला पिक्चर बनवता येतच नाही का?
किंवा जशी स्विमरला ट्रीटमेंट दिली ती एकच पद्धत आहे का चांगला चित्रपट बनवायची?
माझे म्हणणे आहे की ती पद्धत वापरून फक्त चांगला चित्रपट बनेल, पण भारतीय प्रेक्षक थिएटरला बघायला जाणार नाही.
त्यामुळे पैसे कमवायचे असतील तर प्रेक्षकांना सुद्धा थिएटर मध्ये खेचेल अश्या वेगळ्या पद्धतीने चांगला चित्रपट बनवावा लागणार.

अगदीच टाकाऊ आहे.
बोमन इराणीचा इंग्रजी क्लास आणि ते जोक्स म्हणजे गरिबीची परमावधी आहेत. ते ८०-९०च्या दशकांत ठीक वाटले असते जोक. आजही त्याच काही तरी टुकार बोलण्याला जोक म्हणून हसा ही अपेक्षा असेल तर कीव आहे!
थोडाफार बघितला आणि बंद केला.
पशुपत, नका नादी लागू!

बोमन इराणीचा इंग्रजी क्लास आणि ते जोक्स म्हणजे गरिबीची परमावधी आहेत. ते ८०-९०च्या दशकांत ठीक वाटले असते जोक. आजही त्याच काही तरी टुकार बोलण्याला जोक म्हणून हसा ही अपेक्षा असेल तर कीव आहे! >>> +१००

एखाद्याने "आज" आयटी सपोर्ट वाल्याने "अहो त्याने मशीन ऑनच केले नव्हते" टाइप विनोद सांगितल्यासारखे आहे.

Both , हो ना.
म्हणून मी म्हटलं की आउटडेटेड आहे. कालबाह्य विनोद करणाऱ्या फिल्ममेकर्सना इलॉनला सांगून मंगळावर पाठवावे. सगळ्या पृथ्वीच्या विनोदाची सरासरी घसरते त्याने. #चिंता करतो (विनोदी) विश्वाची.... Wink

८०-९० च्या दशकातील कैक चित्रपट आजही बघताना हसायला येते. मला तर साठच्या दशकातील हाल्फ तिकीट आणि पडोसन चित्रपट सुद्धा आजही हसवतात. त्यामुळे हा मुद्दा काही पटला नाही.

याउपर चित्रपट नव्वदीच्या दशकातच घडत होता. म्हणजे काळाला साजेसे विनोद होते असेही म्हणू शकतो.

मी गेलेलो तेव्हा थिएटरमध्ये मात्र बरेच लोकं हसत होते. स्पेशली इंग्लिश परीक्षांच्या सीनला..

पण हो, Dunki बघताना नकळत तीन इडियट आणि मुन्नाभाई शी तुलना होते. आणि तो तितका मनोरंजक वाटत नाही हे सुद्धा खरे आहे. रिपीट व्हॅल्यू असलेले सीन अगदी मोजकेच आहेत.

तू बरोबरच आहेस.
लॉजिकली ज्यांच्याशी बोलता येतं त्यांच्याशी बोलणं झालं. बाकी जो जे वांछिल तो हे लाहो! जय हरी विठ्ठल!

अगदीच टाकाऊ आहे.
बोमन इराणीचा इंग्रजी क्लास आणि ते जोक्स म्हणजे गरिबीची परमावधी आहेत. ते ८०-९०च्या दशकांत ठीक वाटले असते जोक. आजही त्याच काही तरी टुकार बोलण्याला जोक म्हणून हसा ही अपेक्षा असेल तर कीव आहे! >> +७८६, हास्यास्पद प्रयत्न आहे सेंसीबल नि गंभीर विषयाचा. पहिलीत असताना 'देवा मला पाव, देवा मला पाव नको, बिस्कीट ' वगैरे लेव्हलचे विनोद पण ह्यापेक्षा जास्त क्वालिटी चे होते असे मी म्हणेन Wink अ अँड येस, हे फार्सिकल , आचरट वगैरे सुद्धा प्रकारत धरण्यासारखे नव्हते.

बोमन इराणीचा इंग्रजी क्लास आणि ते जोक्स म्हणजे गरिबीची परमावधी आहेत. ते ८०-९०च्या दशकांत ठीक वाटले असते जोक. आजही त्याच काही तरी टुकार बोलण्याला जोक म्हणून हसा ही अपेक्षा असेल तर कीव आहे! >> सिरीयसली.

बोमन इराणीचा इंग्रजी क्लास आणि ते जोक्स म्हणजे गरिबीची परमावधी आहेत. ते ८०-९०च्या दशकांत ठीक वाटले असते जोक. आजही त्याच काही तरी टुकार बोलण्याला जोक म्हणून हसा ही अपेक्षा असेल तर कीव आहे! >> +१

फा, तू अमितच्या या वाक्याला तीन तासांच्या अवधीत दोनदा 'दुजोरा' दिल्याने आता तो (दीपक?) 'तिजोरा' की कायसा झाला आहे.

मी हा चित्रपट बघायला सुरुवात केली आणि अर्धा तास सहन केला. बहुधा थोडा जास्तच बघितला असेल. पण फारच कंटाळा आला.

फा, तू अमितच्या या वाक्याला तीन तासांच्या अवधीत दोनदा 'दुजोरा' दिल्याने आता तो (दीपक?) 'तिजोरा' की कायसा झाला आहे. >>> Lol

डंकीचा डंका वाजवुन झाला असेल तर आता डन (म्हणायचं) का? Happy
>>>>

नाही इतक्यात नको
चित्रपट न आवडलेले प्रतिसाद धाग्यावर जेव्हा जास्त आणि हिरीरीने येतात तेव्हा चित्रपट आवडलेले लिहायचे टाळतात असे एका निरीक्षणं आहे. त्यामुळे काही काळ वाट बघूया Happy

काहींनी चिकवा धाग्यावर सुद्धा यावर लिहायला सुरुवात केली त्यामुळे सगळी गडबड झाली. अश्याने मग जिथे तिथे तेच होते.
रघू आचार्य आणि अतुल यांनीही Dunki चित्रपटावर धागे काढले होते. म्हणजे लोकांना चित्रपटावर चर्चा करायची आहे. फक्त सगळीकडे तेच नको..

मी माझ्या धाग्यावर शंभरपैकी नव्याण्णव्व प्रतिसाद स्वताच देऊन त्यावर कौतुकाने बॅट ऊंचावू शकतो ईतका निर्ढावलेला आहे, त्यामुळे चिंता नसावी Happy

बाकी कोणी मला हलकेच घ्या म्हटले, की वाईट वाटते. कारण ते माझ्यासोबत बाय डिफॉल्ट आले पाहिजे असे वाटते Happy

येनीवेज,
डंकी वरील चर्चा संपली असे मी घोषित करतो. आणि आता यावर प्रतिसाद देऊ नये असे मायबोलीकरांना विनंती करतो.
तरी कोणी बोअर झाले असेल तर अवांतर चर्चा करायला हा धागा वापरू शकता...

माझ्या मुलांना डंकी फार आवडलाय..आणि गाणी पण..
मुलीची रस्ता देखूंगा, लुटपुट,माही गाणी पाठ झालीत..
बोमन इरानीचं ते वाक्य आय वॉन्ट टु गो टु... सुरात बडबडत असते Lol

फालतू

Pages