असा मी, तसा मी, नक्की कसा मी ?

Submitted by विक्रम मोहिते on 21 December, 2023 - 01:15

मनाच्या पेटार्यात बराच वेळ काहीतरी शोधत असलेल्या तिसऱ्या 'मी'ला पाहून पहिल्या 'मी'ने दुसऱ्या 'मी'ला विचारलं, "काय रे, नक्की काय शोधतोय हा?" दुसरा मी म्हणाला," काही नाही रे, त्याला वाटतं आपण सगळे 'मी' आहोत ना, ते खोटे आहोत, खरा 'मी' कुठेतरी हरवलाय खूप आधी, आणि आपण फक्त थोडेफार त्याच्यासारखे आहोत, तो 'मी' नाही" पहिला 'मी' खो खो हसत म्हणालं," अरे वेडा आहे का हा, पहिला 'मी' राहिला नाही म्हणून तर आपण आलो ना, आधी मी वाला 'मी', मग तू वाला मी, नंतर हा वाला 'मी', आधी मला पण असं वाटायचं, पण त्या खऱ्या 'मी' ला शोधायचा कमी प्रयत्न केला का आपण? स्वतःची आणि त्याची तुलना केली कित्येक वेळा, मी वाला 'मी' आणि खरा वाला 'मी' खूप सारखे आहेत, पण एकसारखे नाही, आणि तसे असू पण शकत नाही, मग एक दिवस मलाच कळलं, की आपण पण तितकेच खरे 'मी' आहोत... बस, त्या दिवशी शोध संपला!" दुसरा 'मी' फक्त हुंकारला, कारण या अवस्थेतून एके काळी तो स्वतः गेला होता आणि नव्याने जन्माला येणारा प्रत्येक 'मी' जाणार होता, प्रश्न हाच होता- की त्यातला एक तरी 'मी' खऱ्या 'मी' सारखा असणार आहे का!
-विक्रम मोहिते

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults