सकाळचा पहिला चहा

Submitted by very sane subodh on 9 June, 2009 - 05:36

ओठांनी वेलची लावावी तसे तुझे ओठ
भेटावेत ओठांना
मग ती उकलावी
हलकेच जिभेने साखर पेरत...
माझ्या बाहुपाशात तुझ्या सावळ्या दालचिनीची भुकटी व्हावी
मग मी राहावे पडून निपचित बराच वेळ
तुझ्या वक्षस्थळांवर माझे शहाणे डोके ठेवून
अगदी तुझ्या बाळासारखे....

गुलमोहर: 

सानेसाहेब, साष्टांग दंडवत. मी पण आता वरील प्रकार वाचून फेफरे आल्यामुळे राहातो पडून निपचित..बराच वेळ.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

ए हाकला रे याला....
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

कविता आवडली नाही म्हणून हिणकस प्रतिसाद कशाला?

आनन्द आनन्द आनन्द
कुठे लपावे कळत नाही

मी तीन वेळा वाचली सानेसाहेब. चहाचा व इतर बाबींचा नेमका संदर्भ कळला नाही. चहात वेलची व साखर कळली. दालचिनी... ?? डायबेटीसवाल्यांसाठी चांगली असं आयुर्वेद सांगते. शिर्षकाचा संबध कवितेत दिसला नाही, निदान मला तरी.

मग ती उकलावी ( ती उकलावी म्हणजे कोण ह्यात गडबडलोय.)
माझ्या बाहुपाशात तुझ्या सावळ्या दालचिनीची भुकटी व्हावी (इथे मी 'सावळा देह' या अर्थी विचार केल्यावर, ती त्याच्या बाहुपाशात असताना, तो वर डोके कसे ठेवेल ? कदाचित लिहीताना गोंधळ उडालाय किंवा मी नस्त्या visualisationच्या भानगडीत पडलोय.)
मग मी राहावे पडून निपचित बराच वेळ
तुझ्या वक्षस्थळांवर माझे शहाणे डोके ठेवून
अगदी तुझ्या बाळासारखे.... (आईच्या उराशी निवांत झालेल्या बाळाचा निवांतपणा व सुरक्षितपणाची भावना लाभावी ही कल्पना छान आहे. मांडणी सौम्य असावी अशी वाचकांची मागणी दिसतेय. शरीराच्या अवयवांचा सरळ उल्लेख आला की कविता भडक वाटणे साहजिकच आणि त्यातही तो स्त्री देहाचा.)
कवितेचे रसग्रहण आपण करावे ही इच्छा आहे. त्यामुळे कवितेचा आनंद घेता येईल.

.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

वक्षस्थळे आल्यामुळे ही कविता अस्पृश्य झाली की काय?

कौस्तुभ तुमचा आभारी आहे.
१. शीर्षकाचा संबंध लावून बघा. लागेल. इट्स पर्सनल.
२. ती = वेलची = ओठ
३. हे सगळे असताना नाही नंतर ...

प्रयत्न आणि कल्पना छान आहे. थोडी अजुन खुलवता आली असती. पुन्हा एकदा ह्याच कवितेवर प्रयत्न करायला हरकत नाही. आणि कौतुकचे काही points सांभाळा.
all the best !

...

सानेसाहेब, साष्टांग दंडवत. मी पण आता वरील प्रकार वाचून फेफरे आल्यामुळे राहातो पडून निपचित..बराच वेळ..................................हाहा

सानेसाहेब, साष्टांग दंडवत. मी पण आता वरील प्रकार वाचून फेफरे आल्यामुळे राहातो पडून निपचित..बराच वेळ..................................>>>>काय रत्नं आहे....आज सापडले!! Happy

"तुझ्या वक्षस्थळांवर माझे शहाणे डोके ठेवून
अगदी तुझ्या बाळासारखे...." ---> यात अश्लिलता खरच नाहीये.

प्रेम कुणावर करावंं?
प्रेम कुणावरही करावंं,
राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
.....................................................
हे जर का कुसुमाग्रजांच कवी म्हणून चालणार असेल
तर ते का नाही?
जस्ट बिकॉज ते 'कुसुमाग्रज ' होते आणि हा फक्त ' कवी ' आहे म्हणून?