विचित्रीकरण केलेली गाणी (उर्फ दिग्दर्शक काय विचार करत होता?)

Submitted by MazeMan on 6 November, 2023 - 04:01

ज़िहाले मस्कीन - फिल्मी बंजाऱ्यांची चार पाले पडलेली आहेत. सूर्य मावळलाही नाही पण शेकोटी पेटवलेली आहे. राजस्थानी पगडी घातलेला एक माणूस रबाब वाजवायला सुरुवात करतो. वाळवंटात काळे कपडे घातलेली एक बंजारन उठून मान आणि कंबर हलवणाऱ्या बाहुलीसारख्या स्टेप्स करत ख़ालिस उर्दूमध्ये मुखडा गाते. मध्येच ती कथ्थकच्या स्टेप्स करायला सुरुवात करते. आणि हिरॉईन लांब केस मोकळे सोडून बसच्या टपावरून प्रवास करते. नाचणारी बाई अंतरा सुरु झाल्यावर कथ्थक सोडून फ्री स्टाईल डान्स करायला लागते.

तुम्हालाही अशी काही (वि)चित्रित गाणी माहित असतील ना?

Group content visibility: 
Use group defaults

पुन्चिरी थनु कोंचीको - दाक्षिणात्य फिल्मी हिरोईनी चार घरंदाज बायकात बसलेली आहे, सकाळ आहे कि दुपार काही कळत नाही. अंगभरून कपडे आणि दागिने घातलेल्या डझनभर बायका कथ्थक कि कुचिपुडीच्या स्टेप्स करत आहेत, हिरव्यागार झुडुपातून काळे कपडे घातलेला एक माणूस मध्येच उगवतो.
अचानक हा सारा घरंदाजीं माहौल बदलतो आणि नदीत एक Vallam kali सारखी दिसणारी बोट आणि त्यावर तीच मगासची दाक्षिणात्य फिल्मी हिरोईनी आता अत्यंत तोकड्या कपड्यात आणि तितक्याच उघड्या तरुण पोरात मान आणि कंबर हलवणाऱ्या बाहुलीसारख्या स्टेप्स करत "पुन्चिरी थनु कोंचीको, मुन्थिरी मुत्थम चिन्थीको, मंचनी वर्ण सुंदरी वावे" असा खालीस मल्याळम मध्ये मुखडा गाते, मध्येच ती कथ्थक का कुचिपुडीच्या स्टेप्स करायला सुरुवात करते आणि लांब केस मोकळे सोडून बोटीच्या टपावरून प्रवास करते. आता नाचणाऱ्या सार्या बायका लाज-लज्जा सोडून केवळ पांढर्या लुंग्या आणि पोल्की घालून तिच्या सारखेच ककाकूच्या स्टेप्स करायला सुरुवात करतात, मगासचा काळ्या कपड्यातला हिरो त्या उघड्या वागड्या जमावाला लाज वाटेल म्हणून स्वतः ही उघडा होऊन त्या तोकड्या कपड्यातल्या दाक्षिणात्य फिल्मी हिरोईनीला कवळून "जिया जळे..जान जळे" असा ऍसिडिटी ची तक्रार करायला (नाचत??) सुरुवात करतो