वीकेंडची सुरुवात, कोसळणारा पाऊस, समोर गरमागरम चहा, कांदा भजी आणि कानावर पडणारी रेडिओवरची गाणी.. मस्त वाटलं ना? पण मी मात्र वैतागलो होतो. कोपऱ्यावरच्या त्या कळकट टपरीवरची तेलकट भजी घशाखाली ढकलतांना काय मस्त वाटणार हो! तुम्हीच सांगा..
तसा मुंबैतला पाऊस मला नवीन नाही, पण हवामान खात्याने पुढचे दोन दिवस रेड अलर्ट आहे असे घसा खरवडून सांगितले असतांना आणि सगळं जग घरात बसलं असतांना कामावर बोलावण्यात काय शहाणपण..
सकाळी चरफडतच ऑफिसला पोहचलो. म्हटलं आज जागाच सोडायची नाही काय वाट्टेल ते होऊ दे.
पण कसलं काय, मस्त डबा खाऊन सगळा रागरंग बघुन ऑफिस मधुन सटकण्याच्या विचारात असतांनाच बरोबर एक वाजता कृपाशरण बोलवायला आला, तोंडातला पानाचा तोबरा सांभाळत लांबूनच सांगितलं, "बुलाया है"
मी त्या गावचाच नाही या थाटात इकडे तिकडे बघायला लागलो.
"आपको बुलाया है रेड्डीसरने. इधर उधर काहे देखते हो"
चिकनच्या दुकानात कसायाने पिंजर्यात हात घालून पकडलेल्या कोंबडीच्या भावना काय असू शकतील ते आज मला समजलं.
" अरे राघव, अंधेरीमे एक क्लायंटसे मिलना है. मै लोकेशन और नंबर सेंड करता हुँ."
" आज जाना है सर?" मी रेड्डीच्या मागच्या खिडकीतून दिसणारा पाऊस बघत शक्य तितक्या नम्रपणे विचारले.
" अब्बी के अब्बी निकलो. तुमारा वेस्टन लाईन चालू है. चाहे तो कल रिपोर्ट करना मुझे" रेड्डी कॉम्प्युटर वरची नजरही न हटवता चिरकला. कितीही संताप आला तरी या रेड्डीच्या केबीनमध्ये मी मांजर का बनतो हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
साला.. नेहमी मीच सापडतो याला.. जसा वेस्टर्न लाईनवर एकटा मीच राहतो. भरलेला डबा पुन्हा बॅगेत ठेवताना कॅबीन मधल्या मांजराचा वाघ झाला होता.
... तर या शर्माला भेटायला मी इकडे आलो होतो आणि चांगली साडेसात वाजता माझी सुटका झाली होती. आजचा सगळा दिवसच बेक्कार होता. पण जेव्हा एखादा खराब दिवसच तुमच्या वाट्याला येतो तेव्हा त्याला शांतपणे समोर जाण्यातच शहाणपण असतं. मीही आता तेच करत होतो.
...कामातून सुटका झाल्यावर जाणीव झाली ती भुकेची आणि म्हणून या भज्या पोटात ढकलत होतो. खाऊन झाल्यावर पुढचा प्रश्न घरी कसे जायचे हा होता. कारण अंधेरी स्टेशन वरून रात्री आठ नऊ वाजता विरार लोकल पकडायला लागणारी ताकद आतातरी माझ्यात नव्हती, म्हणून सरळ मोबाईलवरून कॅब बुक करून तीची वाट बघत होतो.
.. तो माझ्या शेजारीच आपली सायकल सांभाळत उभा होता. सायकलवर शिस्तीत अडकवून ठेवलेली खेळणी.
"कैसे दिया?" वास्ताविक मी त्याच्याकडून काही विकत घेणार नव्हतो पण उगीच आपला वेळ घालवायचा म्हणून विचारले.
" कोई भी लेलो सौ रुपया. एकदम सॉलीड चिजे है साब. चायना मेड कुछ भी नही. दुकान मे जाओगे तो ढाईसो से कम नही मिलेगा." त्याच्यातला विक्रेता जागा झाला होता.
" जादा बोल रहा है तु. पन्नास देईल फक्त." माझा त्याला झटकण्याचा प्रयत्न.
" चलो ले लो साब. सुबह से कुछ भी नही बिका. कम से कम भजीपाव तो लेके जाऊंगा घर पे. बच्चे राह देख रहे होंगे." त्याचा कोविलवाणा सूर.
" हे घे, आणि उरलेले पैसे राहू दे तुला." मी शंभराची नोट त्याच्या हातात ठेवली.
तो फारच खुष झाल्यासारखा वाटला. लगाबगीने एक छानशी टॉयकार शोधून दिली त्याने...म्हटलं चला आपला दिवस खराब झाला पण त्याचा दिवस चांगला बनवला आपण.
.. एव्हाना ड्रायव्हरचा फोन आला. जवळच्या एका कॉर्नरवर येऊन थांबला होता. मलाच तिकडे बोलावत होता.
"माजलेत सगळे. समजतात कोण स्वतःला.." मी चरफडतच निघालो. न जाणो मी इकडे यायचा आग्रह धरला आणि त्याने द्रीप कॅन्सल केली तर.. या पावसात दुसरा कोणी यायला तयार होईल की नाही हा पण प्रश्नच. पाय ओढत त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहचलो. "चल बाबा लवकर. आधीच खुप उशीर झालाय" मागच्या सीटवर बॅग फेकून त्याच्या शेजारी बसत म्हणालो. पण कसलं काय, मुंगीच्या गतीने सरकणाऱ्या रहदारीतुन मार्ग काढत दहिसरपर्यंत पोहचलो तेव्हा चांगले साडेदहा वाजले होते.
स्वच्छ गाडी, नावापुरताच नसलेला एसी आणि गाडीत टांगलेला मोगऱ्याचा गजरा, माझी चिडचिड कधीच गायब झाली होती.
शक्यतोवर मला ड्रायव्हर शेजारी गप्प बसून रहायला आवडत नाही. या लोकांजवळ अफाट किस्से असतात, प्रत्येक गोष्टीवर स्वत:च असं एक ठाम मत असतं, मजा येते यांच्याशी गप्पा मारायला.
नोटबदी, कोरोना असे विषय काढायचे, ही मंडळी सुसाट निघते.
" लॉकडाऊन मे वाट लग गया था सबका" मी विषय काढायचा म्हणून बोललो. पण तो गप्पच..
कदाचित काही अप्रिय आठवणी जाग्या झाल्या असतील. मी उगीचच विषय काढला.
"नही सर. मैने बहोत पैसा कमाया." रस्त्यावरची नजर न हटवता तो बऱ्याच वेळाने बोलला.
" त्या दिवसांमध्ये मी रात्र बघत नव्हतो की दिवस. कुणाला दवाखान्यात जायचे असायचे."
मधून मधून पावसाची सर झोडपून जात होती इतकी जोरदार की हेडलाईटच्या प्रखर प्रकाशझोतातही पाचसात फुटांपलीकडचे दिसत नव्हते.
"लोक पाहिजे ते भाडं द्यायला तयार असायचे." तो सावधपणे गाडी चालवत स्वतःशीच बोलल्या सारखं बोलत होता. "काहीजण तर दवाखान्यात नेत असतांनाच गेले. तो पाचसहा वर्षाचा, शेवटच्या क्षणापर्यंत किती बडबड करत होता."
या गाडीत गेले! आणि मी त्याच गाडीतून प्रवास करतोय...!! काटाच आला अंगावर.
साला.. कुठून याच्यासमोर हा विषय काढला. मीच माझ्यावर चरफडलो.
"साहेब पैसेतर कमावले पण रात्रीची झोप गमवली." तो मधुनच एखादं वाक्य बोलत होता. कदाचित काही गोष्टी आठवत असतील किंवा मन मोकळं करायचं असेल..
"रात्री पॅसेंजर सोडल्यावर मी तिथेच कुठेतरी पार्क करून गाडीतच झोपतो. रिकामं परत जायला परवडत नाही. सकाळी एखादं भाडं भेटू शकतं." आता माझी उत्सुकता ताणली जात होती.
" झोपल्यावर बऱ्याच वेळा गाडीत कोणीतरी आहे असं जाणवायचं. कोणीतरी 'घर जाना है, मम्मी पापा के पास" म्हणत रडत आहे आहे असं वाटायचं.
" शेवटी गावच्या गुरुजींचा सल्ला घेऊन ती गाडी विकली आणि ही दुसरी विकत घेतली."
" ज्याला विकली त्यालापण काही अनुभव आले का?" आता मी सावरलो होतो.
" नाही सर, नंतर त्याने मला काही सांगितलं नाही आणि मी पण चौकशी केली नाही."
...घरी पोहचेपर्यंत साडे अकरा वाजले होते. त्याचे पैसे देऊन माझी बॅग घ्यायला मागच्या सीटकडे वळलो तर संध्याकाळी विकत घेतलेली ती खेळण्यातली कार खाली पडली होती.
" अरेच्या! ही बॅगेतून बाहेर कशी आली?" असं स्वतःशीच पुटपुटत उचलायला हात पुढे केला आणि चटका बसावा तसा हात मागे घेतला.
" काय झाले साहेब?" माझ्या चेहर्याकडे बघत त्याने शंकेने विचारलं.
"अरे काही नाही. आज दिवसभर पावसात खुपच धावपळ झाली त्यामुळे थकलोय जरा."
माझ्या उत्तराने त्याचं समाधान झालं असावं. त्याचा निरोप घेत चालायला सुरुवात केली. त्याला कसं सांगणार होतो की, मी जेव्हा टॉयकार घ्यायला हात पुढे केला तेव्हा ती झटकन कोपऱ्यात खेचली गेली होती म्हणून...
पाऊस
Submitted by वीरु on 28 October, 2023 - 23:53
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच..
मस्तच..
अगदी शेवटच्या वाक्याला धक्का
अगदी शेवटच्या वाक्याला धक्का !
जबरदस्त ताणला आहे सस्पेन्स. आवडली कथा.
( सर इकडे आले तर मायबोली लेखकांना मौलिक मार्गदर्शन होईल )
भारी जमलीय कथा..
भारी जमलीय कथा..
मस्तच जमली आहे. शॉक तर
मस्तच जमली आहे. शॉक तर जबरदस्त!
जबरदस्त ! भारीच लिहिली आहे.
जबरदस्त ! भारीच लिहिली आहे.
बाब्बो! भारीच जमलेय!
बाब्बो! भारीच जमलेय!
विरुपाजी आख़री बॉल पे लगा दिया
विरुपाजी आख़री बॉल पे लगा दिया सिक्सर !! लय भारी !!
Twist in the tale … मस्तच…
Twist in the tale … मस्तच…
मस्त!!
मस्त!!
निरूसर, आचार्यजी, धनवंतीजी,
निरूसर, आचार्यजी, धनवंतीजी, अमितसर, मीराजी, स्वातीजी, अज्ञासर, च्रप्स जी, स्वातीजी, ऋन्मेषजी आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.
हायला.. चरकलो क्षणभर कडक !
हायला.. चरकलो क्षणभर
कडक !
फारच सॉलिड कथा.अजून लिहिते
फारच सॉलिड कथा.अजून लिहिते व्हा.
छान आहे . जवळजवळ मतकरी स्टाइल
छान आहे . जवळजवळ मतकरी स्टाइल एन्डिंग .. त्यांची एक कथा आहे ज्याचा शेवट तिच्या गळ्यावरचा तो व्रण मी ओळखला होता हे मी त्याला कसं सांगणार .. असा काहीसा होता , ती कथा आठवली - घराची जुनी मालकीण , अपघातात गेलेली - घराचा उपभोग घेण्यासाठी याच्या मित्राशी लग्न करते , ती स्टोरी , नाव आठवत नाही .
पण तो जीव नवीन गाडीतही का यावा असा प्रश्न पडला .. कदाचित टॅक्सीवाला ओळखीचा झाल्यामुळे असेल ..
मस्त कथा. येऊ द्यात. पुलेशु.
मस्त कथा. येऊ द्यात. पुलेशु.
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
जबरी!
जबरी!
मस्त ट्विस्ट!
मस्त ट्विस्ट!
बाबो,... जमलीय. सर्रकन काटा
बाबो,... जमलीय. सर्रकन काटा आला शेवटी.
लिहित रहा, शुभेच्छा
मस्त! भारी!
मस्त! भारी!
जबराट! आवडली आहे कथा.
जबराट! आवडली आहे कथा.
जबरदस्त. ….. जमली आहे
जबरदस्त. …..
जमली आहे
भन्नाट !
भन्नाट !
मस्त जमलीय कथा !
मस्त जमलीय कथा !
पण तो जीव नवीन गाडीतही का यावा असा प्रश्न पडला .. कदाचित टॅक्सीवाला ओळखीचा झाल्यामुळे असेल .> या टॅक्सीवाल्याने जी टॅक्सी विकत घेतली त्या टॅक्सीमध्ये हि अश्याच घटना घडल्या असणार त्यामुळे त्या टॅक्सीवाल्याने हि टॅक्सी विकली असणार.
अरे, तुम्ही लोक्स आत्मे जी पी
अरे, तुम्ही लोक्स आत्मे जी पी एस लावून किंवा गाडी मॉडेल आणि लायसन्स प्लेट बघून काम करत नाहीत हे विसरताय का?
मेमरी त्या माणसाबद्दल आहे, त्या बंधाने आला असावा.
दोन्ही
दोन्ही शक्यता असू शकतात.
आत्म्यांचे नियम कोणाला माहीत
मस्त जमलीयं कथा..!
मस्त जमलीयं कथा..!
फार काळाने लिहिली कथा तुम्ही विरूजी..!
लिहित रहा..!
खूप छान उत्कंठावर्धक कथा.
खूप छान उत्कंठावर्धक कथा. शेवट मला नीट समजला नाही. काही सस्पेन्स असेल तर.
प्रका- तो मुलगा त्या गाडीत
प्रका- तो मुलगा त्या गाडीत चोरून राहतोय… सिट खाली लपून..
(No subject)
उत्तरार्ध शेवटच्या ट्विस्ट
उत्तरार्ध शेवटच्या ट्विस्ट सकट मस्त जमलाय. पूर्वाधाचे निरुपण नि शीर्षक दिशाभूल करते
Pages