तुम्ही नाही जा! (हिंदी चित्रपटसंगीतातील आडवळणाने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीची उदाहरणे)

Submitted by स्वाती_आंबोळे on 24 October, 2023 - 12:44

काल फेसबुकावर बॉलीवुड ट्रिवियाच्या एका पेजने 'भली भलीसी इक सूरत' या गाण्याची आठवण करून दिली.
ही चित्रपटसंगीताची एक इन्टरेस्टिंग क्याटेगरी आहे, ज्यात आडवळणाने प्रेमाचा इजहार, किंवा 'कौन है वो दिलरुबा?' या प्रश्नाला 'तू नाही, दुसरंच कोणीतरी' अशा छापाचं उत्तर दिलेलं दिसतं.

अशी आणखी काही आठवलेली गाणी:
१. खूबसूरत हसीना, जाने जा जानेमन
२. कोई लडका मुझे कल रात सपने में मिला
३. तेरे हुस्न की क्या तारीफ करूँ, कुछ कहते हुए भी डरता हूँ
४. आप के कमरे में कोई रहता है

आणखी एक क्याटेगरी 'ना ना करते' टाइप - म्हणजे घरौंदामधल्या 'तुम्हें हो ना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुम से नहीं है'

तुम्हाला कुठली आठवतात का अजून अशी गाणी?
मराठी मला एकही नाही आठवलं. पण ते समजण्यासारखं आहे, मुळात प्रेमाचा इजहार इथेच गाडं अडत असणार. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक लडकी भिगी मधे इजहार नाहिये..

अगर मै कहूं मुझे तुमसे मुहोब्बत है..लक्ष्य. जर मी म्हटलं तर तू काय म्हणशील? म्हणजे तसं काही नाहिये पण तरी Lol

लक्ष्य चं गाणं म्हणजे फारच शत्रू चा अंदाज घेत घेत केलेल्या बातचीतीसारखं आहे Happy
बघ मी असं म्हटलं तर तू काय करशील?(म्हणजे, मी म्हटलेलं खरं असेलच असं नाही पण समजा असलं तर तू काय करशील?)

जा जा जा रे तुझे हम जान गये
कितने पानी मे हो पहचान गये

मैय्या यशोदा ये तेरा कन्हैया

गजब का है दिन सोचों जरा

घुंघट कि आड से दिलबर का
( शब्दश: आडपडदा)

पर्दा है पर्दा..
(किसी हसीं कि तरफ ये गुलाब फेकूंगा)

यूं शबनमी, पहले नही थी चांदनी

डोली मे बिठाके सितारों से सजाके
सांवरिया

कुछ ना कहो, कुछ भी ना कहो

अर्रे हो! 'ऐका दाजीबा' परफेक्ट आहे या कॅटेगरीत!

'पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले' हे अजून एक आठवलं.
आणि एबाबांनी 'व्हिक्टोरिया २०३'मधलं 'देखा मैंने देखा' एक सुचवलं काल.

>>> आडवळणाचा हमरस्ता
हम-तुम रस्ता! Lol

हम-तुम रस्ता Lol

पल भर के लिये सुचलं होतं पण सिच्युएशन बघता आडवळणाने इजहार म्हणवत नव्हता.
व्हिक्टोरिया चं हे गाणं आठवताना नेमकं थोडासा ठहरो आठवत राहिलं. Proud

आणखी एक क्याटेगरी 'ना ना करते' टाइप - म्हणजे घरौंदामधल्या 'तुम्हें हो ना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुम से नहीं है' >>> हो ती कॅटेगरी उलट्या प्रकारातील आहे. म्हणजे हे कोणाबद्दल चालले आहे यात काही कोडे नाही जे चालले आहे ते प्रेम आहे की नाही याबद्दल कोडे पडले आहे Happy

म्हणजे तुझ्यावर प्रेम नाही म्हणताना कडव्यांमधे जे सांगते ते सगळे प्रेमाचेच लक्षण आहे - "मगर मैने ये राज अबतक न जाना - के क्यों प्यारी लगती है बाते तुम्हारी, मे क्यों तुमसे मिलने का ढूँढू बहाना..." वगैरे. फक्त प्रेम आहे म्हणायचे नाही. बिरबल जसे पोपट मेला आहे हे स्पष्ट न सांगता घोळवून सांगतो तसे. किंवा टॅबू गेम सारखे.

जे वेड मजला लागले , तुजलाही ते लागेल का

रुपास भाळलो मी , भुललो तुझ्या गुणाला, मज वेड लावले तू , सांगू नको कुणाला

ही गाणी लिहिली त्या काळात वेड हा प्रेमाचा कोडवर्ड होता का ? मायबोलीवरच्या रेसिपींमधे ब्याडवर्ड घटक पदार्थ असतात तसे काही Happy

सैराट मधलं "आताच बया का बावरलं" हे गाणं बसेल यात. प्रत्यक्षात त्यात आर्चीच परश्यापेक्षा जास्त पुढाकार घेताना दाखवलेली असली तरी .

तुम अगर मुझको न चाहो, तो कोई बात नहीं,
तुम अगर दुष्मन को चाहोगी, तो मुष्कील होगी.

- राज कपूर, चित्रपट आठवत नाही

मला तर 'धडकन' सिनेमा वाटला. त्यात फार त्रास झाला सुनील शेट्टीला, मी तर रडलेच. Wink
ओ ते, 'तुम किसी को चाहो ये मै होने नहीं दुंगा' हे होतं.
एक पाऊल पुढे क्रिपी.
------
साधी भोळी राधा is haunting me... Lol

अस्मिता Lol "बंदिवान मी/गाऊ कशी अंगाई" थीम्ड हॅलोवीन Happy

तुम अगर मुझको मधे "दुश्मन" ही आहे पण तो नंतर कडव्यात येतो ("...किसी दुश्मन से निबाहोंगी, तो मुश्किल होगी"). गाण्याच्या पहिल्या दुसर्‍या ओळीत दुश्मन येउ लागले ते ७०ज मधे बच्चन बिच्चन च्या गाण्यांत Happy

लेके पहला पहला प्यार हा रस्त्यावरच्या गाणाऱ्यांच्या माध्यमातून केलेला आडवळणाचा इजहार म्हणू शकतो.

न जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ...हा पण एक स्वतःशीच केलेला इजहार

आणि हे ग्रेट..तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही..

मराठी काही
त्या चित्तचोरट्याला का आपुले म्हणू मी..
ते नयन बोलले काहीतरी, मी खुली हासले खुळ्यापरी..
कसं कुणाला सांगू बाई, मला माहेरी करमत नाही..
नकळत सारे घडले, मी वळता पाऊल अडले

प्रेमाचा इजहारच नव्हे, तर प्रेमभंग झाल्यावरही हिरॉइनच्या मंगनी वगैरेच्या पार्टीत जाऊन टोटल पार्टी पूपर गाणी गाणे हाही एक कॉमन पॅटर्न होता. आता तो कमी झालेला दिसतो. या लोकांना मधेच थांबवून बखोट धरून बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर पद्धतीने विचारायला हवे की तू हे नक्की कोणाबद्दल गातोयस आणि इथे याचा रिलेव्हन्स काय?
- जर या हिरॉइनबद्दल असेल तर सरळ सांग
- हिच्याबद्दल नसेल, तर ही आमची मंगनी/शादी आहे. इथे तुझे रडगाणे का आणतोयस? तू खुश असतानासुद्धा रडतोस ही फन फॅक्ट किंवा "जाणून घेउ या अश्रूंबद्दल" टाइप व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट सारखी वाटणारी माहिती इथे आम्ही आमच्या इतक्या महत्त्वाच्या दिवशी का म्हणून ऐकावी?

आत्ताच काही दिवसा पुर्वी एक गाणे ऐकले ते repeat लिस्ट मध्ये गेले होते - एक रात की है बात -

https://youtu.be/hH49CvEAIDk?si=UGd1X99CN1FRPytM

सुनील दत्त, पूर्वीची रेखा आणि आशा भोसले चा तुफानी आवाज. मस्त नटखट गाणे खूप आवडले. या आधी कधी ऐकले नव्हते. मुलगी मुलाला जरा jealous करायचा प्रयत्न करतेय आणि तो ही फसतो. नंतर चुकले वगैरे कबुली, तू जळवलेस तर मी ही करेन, मी आज की लडकी आहे असा ही ड्रामा आहे Lol

कश्ती का खामोश सफर है शाम भी है तनहाई भी
हे आठवत नाही मला ऐकल्याचं, ऐकते>>>>>

नितांतसुंदर गाणे.

https://youtu.be/PzaqgXpGjrs?feature=shared

रच्याकने, Newsonair अ‍ॅप धड चालत नसल्यामुळे कंटाळुन शोधाशोध करत असताना simple radio हे अ‍ॅप हाती लागले. त्यावर shripad radio, pune हे एक स्टेशन मिळाले. त्यावर मराठी भावगीते, श्लोक आणि ७० च्या आधिची हिन्दी चित्रपटगीते सोडुन बाकी इतर कसलीही बडबड नसते. कोणाला जुनी गाणी ऐकायची असल्यास लाभ घ्या. मी फ्रि वापरते म्हणुन जाहिरती असतात पण त्यांचा त्रास नसतो.

या लोकांना मधेच थांबवून बखोट धरून बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर पद्धतीने विचारायला हवे की तू हे नक्की कोणाबद्दल गातोयस आणि इथे याचा रिलेव्हन्स काय?>>> फारेंड लॉल Rofl
टू फन्नी असतय ते आणि इतर लोक त्यांना काहिही देणं घेणं नसल्या सारखे पेय पीत उभे असतात..

Pages