बिगबॉस हिन्दी : सिझन १७

Submitted by दीपांजली on 15 October, 2023 - 16:33

बिगबॉस हिन्दी सिझन १७ वर गप्पा मारायला हा धागा :
या सिझनची हाइप कमी केली असली तरी बरीच इंट्रेस्टिंग मोठी नावं आहेत ..
सर्वात चर्चित नाव मुनव्वर फारुकी !
मुनव्वर स्टँडप्कॉमेडियन आहे , याच्या एका नावावर हा अख्खा सिझन चालेल असे एक्स्पर्ट क्रिटिक्सचे म्हणणे आहे !
तो लॉक अप सिझन १ चा विनर आहे , जबरदस्तं मास अपिल आहे त्याच्याकडे, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि अर्थात सेन्स ऑफ ह्युमर !
साधासुधा फॅनबेस नसून फॅन आर्मी आहे त्याची, अर्थात हेटर्स पण आहेत कारण हिन्दू देवदेवतांचा रेफरन्स वापरून त्याने केलेले काही स्टँडप्स वादात अडकले होते, युट्युबने डिलिट केले होते , त्याच्यावर केसेस झाल्या होत्या आणि जाहिर माफीही मागावी लागली होती पण टी आर पी खेचण्यात नं १ फॉर शुअर !
युके रायडर ०७हा अजुन एक सोशल मिडिया इन्फ्लुअन्सर पण मोठ्ठा फॅनबेस घेऊन येणार आहे म्हणे, मी त्याच्या विषयी काही वाचले नाही पण स्टॅन सारखा छपरी स्टार आहे असं ऐकलय !
अन्किता लोखंडे तिच्या नवर्‍या सोबत येणार आहे, सर्वात हाय्येस्ट पेड या सिझन मधे , अर्थात बहुतेक हय्येस्ट पेड लोक इमेज कॉन्शस होतात आणि कन्टेन्ट देत नाहीत असं दिसलय !
जिग्ना व्होरा काँट्रोव्हर्शिअल पत्रकार जिच्या आयुष्यावर नेटफ्लिक्स सिरीज ‘स्कुप’ बनली आहे.

या खेरीज ऐश्वर्या शर्मा ,निल भट्ट, जुन्या स्वाभिमान मधली रिंकु धवन असे टि.व्ही कलाकरही आहेत .
बघुया कसा रंगतो हा सिझन, लेट्स गो !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठी मोठी नावं दिसतायेत. काही जणांना ओळखत नाही.

अंकीता आवडते. नील आवडायचा, ऐश्वर्या नाही आवडत, तिसरी आयेशा नाहीका जी नीलची हिरॉईन होती गुम है मधे. त्यांचं म्हणजे नील आणि आयेशाचं अफेअर वगैरे अजिबात नव्हतं पण ऐश्वर्या आणि आयेशामधे कोल्ड वॉर होतं असं ऐकलेलं.

रिंकु धवन म्हणजे किरण करमरकरची एक्स वाईफ का.

हो स्वाभिमानमधे होती, तीच ती. नंतर कहानी घर घरकी मधे किरणची बहीण होती, तिथेच ओळख झाली आणि लग्न झालं.

ऐश्वर्या खतरोके खिलाडीमधे होती बहुतेक, त्यामुळे कलर्सवाले तिला पुढे नेतील. नीलला नाही न्यायचे फार.

प्रिमिअर पाहिला , परफॉर्मान्स आणि इतर टिपी फॉरवर्ड केला.
मुनव्वर फुल्ल तयारीने आलाय, एकही चान्स एकही सेकन्द सोडत नाही वन लायनर मारायचा, फुटेज घ्यायचा , अ‍ॅज इफ त्याला आपण टॉप २ मधे आहोत माहित आहे !
मला युके रायडर, महाशेट्टी , जिग्ना सुद्धा आवडले !
टि.व्ही अ‍ॅक्टर्स मधे सर्वात शेवटी आलेला अभिषेक भरपूर फुटेजच्या तयारीने आलाय , दिसाय्॑लाही क्युट आहे !
त्याच्या बरोबरची ईषा नाही आवडली , त्या दोघांची भांडाभांडी तर स्टेजवरच सुरु झाली , सलमानचा विकेन्डचा मिनि वार उपदेशही झाला तिथेच !
इतर टि.व्ही अ‍ॅक्टर्स , लग्नाळु रेडी टु मिंगल बायकाही नाही आवडल्या, त्यातल्या त्यात रिंकु बरी आहे.
अन्किता लोखन्डे मेंगळट आणि नाटकी वाटली, तिच्या पेक्शा तिचा नवरा विकी जैन जास्तं शार्प वाटला !
सर्वात अनॉयिंग ती चोप्रा बाई आणि ऐश्वर्या शर्मा , नुसत्या लाउड, लाडात बोलणार्‍या नाटकी बायका !
ओव्हरॉल सिझन इन्टरेस्टिंग वाटतोय सध्या तरी .

ऐश्वर्या शर्मा , नुसत्या लाउड, लाडात बोलणार्‍या नाटकी बायका ! >>> हे ध्यान तसंच आहे, जाम डोक्यात जायची माझ्या त्यामुळे नील आयेशा जोडी आवडत असून हिच्यामुळे सिरीयल सोडली. फुटेज घ्यायला पुढे असेल ही.

अन्किता लोखन्डे मेंगळट आणि नाटकी वाटली, तिच्या पेक्शा तिचा नवरा विकी जैन जास्तं शार्प वाटला ! >>> ओहह, मग हिच पुढे जाईल, बिग बॉसला असलेच आवडतात, त्यामुळे ही, ती ऐश्वर्या जातील पुढे.

एक सीन बघितला त्यात ती जिग्ना मुन्नवरला म्हणत होती आपल्यात कनेक्शन आहे, आपण दोघे जेलमधे होतो आणि डोंगरी कनेक्शन. जिग्ना वेगळी दिसते, पुर्वी गाजलेली तेव्हाचा चेहेरा आठवतो, मुन्नवरला मी ओळखत नाही पण ती ऐश्वर्या जाम पुढे पुढे करत होती त्याच्या. एक सीन बघितला.

बरेच जण माहीती नाहीयेत, युट्युबवर छोटे सीन्स बघेन. पुर्ण एपिसोड बघायचा कंटाळा येतो. लिहीत रहा डीजे, बघण्यापेक्षा तुझा गोषवारा वाचायला आवडेल.

कोणी बघत नाहीये का?
तो अभिषेक आल्यापासून फेक फाइट्स करतोय आणि बिबॉ त्याला लपेट लपेटके मारत होते !
मनारा पहिल्या दिवशी पेक्षा काल बरी वाटली, अन्कितापेक्षा तिच्या नवर्‍याचा प्रेझेन्स हॅपनिंग आहे , बराच कन्टेन्ट दिला त्यानी, मुनव्वर तर आहेच बिबॉचा फेवरेट !
हिन्दी बिगबॉसचा आवाज, भाषा, ह्युमर, टोमणे आणि स्वॅग अनदर लेव्हल आहे, मराठी बिबॉ बिचारे अजुन शिकाऊ आहेत Proud

मी बघतेय. मला तो अभिषेक आणि त्याच्यासोबत ची ती इशा यांचे सगळे फेक वाटले. प्रेम, व्हायलन्ट पास्ट, अजूनही ती त्याला आवडणे वगैरे सगळा खोटा, पीआर ने सांगितलेला नॅरेटिव वाटतो.
अंकिता मेक अप काढल्यावर ओळखू येईना. Happy तिचा नवरा स्मार्ट वाटला.

खरच तो अभिषेक खुपच फुटेज घ्यायला बघतोय.. नुसता आरडा-ओरडा केला म्हणजे बिग बॉस जिंकेल अस वाटतं का त्याला?
मला मनारा आवडली सगळ्यात.. फेक नाहि वाटत.. तिला वाईट वाटणं साहजिक होतं.. का नकोय ती त्यांना त्या रुम मध्ये.. तिथुन त्या अंकिताच्या नवर्‍याने जावे. त्याचे मित्र सगळे दिमाग च्या रुम मध्ये आहेत.
खानजादि चं रॅप मस्त होतं काल. मुनव्वर हि छान दो लाईन्स म्हणतो...
खरचं बिग बॉसचा काय आवाज आहे मस्त... काल अंकिता त्या स्पेशल रुम मध्ये असताना बिग बॉस जे बोलत होते तो आवाज ..मस्तच वाटला.. असेच बोलत राहतिल तर तंद्रि लागेल नक्कीच.. Happy सेन्स ऑफ ह्युमर खुप आहे त्यांचा.

मनारा सरप्रायजिंगली चांगली वाटतेय, मला फक्तं तो लव्ह अ‍ॅन्गल नकोय तिचा आणि मुनव्वरचा Uhoh
हैदराबादी अरुण इंटरेस्टिंग आणि एन्टरटेनिंग आहे , त्याने अजुन थोडं फुटेज घ्यावं, लिड घ्यावा Happy
रायडर सुद्धा अजुन थोडा व्होकल , मुद्देसूद बोलला तर मजा येईल, खूप मोठ्ठा फॅनबेस आहे त्याचा पण मुनव्वरशी वाद घालताना नीट मुद्दे नाही मांडता आले त्याला !

आज जिग्नाच्या प्रेस कॉन्फरन्स मधे अजुनही ती मिडियावर आणि मिडिया तिच्यावर खार खाऊन आहेत असे दिसत होते, जिग्नाचा अ‍ॅटिट्युड बिन्धास्त बेफिकिर होता पण काही प्रश्नांना तिने कन्व्हिनियन्ट्ली 'पास्ट' म्हणून उत्तरं टाळली , काही गोष्टी पास्ट बद्दल प्राउड्ली सांगितल्या , ओव्हरॉल भरपूर फुटेज मिळालं तिला !
अन्किता किती फेक , किरकिरी वाटतेय ऑलरेडी , नाटकी नं १ !
खानजादी मला आवडतेय Happy

हो बिग बॉस खुपच फुटेज देत आहेत अंकिताला.. विकी अन तिच्यात दुरावा आणनार.. विकी सुनता नहि बोलुन Proud
खानजादी बरोबर टफ देतेय सगळ्यांना.. बरोबर होती ती.. ती नवं काहितरी बनवतेय तर सांगायचं ना तिला.. तिच्या पद्धतीने बनवले पोहे तिने Happy तिची फ्रेंड लॉयल नाहिय तिच्याबरोबर..

मला स्वयपाकाची टिपिकल भांडणे बोअर होतात. सध्या तरी मुनव्वर पण त्याचा फोर्टे सोडून भलतेच काहीतरी करतो आहे ते रडणे, फ्लर्टिंग हे कशाला ?? Uhoh

काही प्रश्नांना तिने कन्व्हिनियन्ट्ली 'पास्ट' म्हणून उत्तरं टाळली >>मलापण तिच्या बॉडी language वरुन आणि बोलण्यावरून ती पूर्णपणे निर्दोष आहे असे नाही वाटले....

होना, मला सध्या तरी एकही कॉन्टेस्टन्ट आवडत नाहीये आणि तो रायडर युके०७ तर काहीही करत नाहीये तरी बाहेर सोशल मिडियाने त्याला टॉप कॉन्टेस्टम्ट ऑफ द विक घोषित केलय Uhoh
आजकाल पब्लिक आधीच ठरवतात कोणाला सपोर्ट करायचे, भले ते बिबॉ घरात दगडासारखे ठप्प बसून राहोत !
मुनव्वर आणि युके रायडरचे इतके सपोर्टर्स आहेत कि त्यांनी ठरवलय कि हेच टॉप २ Uhoh
त्यात फॅन्स मधे अग्ली फाइट हिन्दु सपोर्टर्स वि मुस्लिम सपोर्टर्स !
आय रिअली होप कोणी भलतीच व्यक्ती जिंको हा सिझन!

I've opted to discontinue viewing this current season. The contestants, regrettably, appear to exhibit a certain shallowness, and the discernible absence of that elusive spark has left me with a sense of disillusionment. I posit that it may be prudent for all of us to collectively abstain from further viewership, given the prevailing trajectory that portends a potential calamity and threatens to squander our precious time.

घीसापीटा चालु आहे हा सिझन, कोणीही आवडत नाहीये .. कोण जास्त अनॉयिंग अनॉयिंग स्पर्धा आहे , अन्किता त्यात निर्विवादपणे टॉप वर.. आवाज पण किती हॉरीबल आहे तिचा !
एन्टरटेनिंग कोणी नाही, त्यातल्या त्यात खानजादी जरा टाइमपास आहे !

अरे कुणीच पाहत नाहि का हा सिझन? नुसता कल्ला चालु आहे सध्या..सगळी मनसोक्त भांडुन घेत आहेत..

मला इच्छा असून बघायला मिळत नाहीय. इथे कोणीतरी लिहा न रोज काय घडते..
अंकिता आणि नवरा ठार वेडे आहेत... मी इंस्टा वर रील पाहिले. डोक्यावर पडलेत का दोघे????

सगळं खोटं , प्लॅन्ड ड्रामा वाटतोय या सिझनला.. ती इशा, एक्स लव्हर आणि करन्ट बॉयफ्रेन्ड ही स्टोरी तर प्रिप्लॅन्ड कळतेय.. दोन्ही लव्हर्स कॅमेराच्या जवळ जाऊन मग खोटं भांडतात !
तो एक्स अभिषेक रिअल लाइफ सायको अब्युजर आहे , त्यानी किती वेळा हिंसक भांडणं केली, मारहाण केली तरी इथे इशा त्याच्याशी गोड वागते Uhoh
अन्किता विक्की भांडणं पण फुटेजसाठी प्लॅन्ड आहेत असं काल तो नील म्हणत होता, म्हणजे घरात इतर कोणाशी भांडण नाही झालं तर ते एकमेकांशी भांडतात आणि कॅमेराज स्वतःकडे ठेवतात !
मुनव्वर आणि त्याची शायरी पण आता महाबोरींग , नील पण बोरींग आणि ऐश्वर्य सायको !
तो अनुराग्,तहलका आणि अरुण म्हणजे डंब डंबर डंबेस्ट आहेत !
रिंकु आणि जिग्ना फक्तं स्वयंपाकाच्या बायका आहेत !
थोडक्यात एकही कॉन्टेस्टन्ट नाही आवडते , कोणीही रिअल वाटत नाहीये.. मागच्या सिझन मधे मजा आली होती !
त्यातल्या त्यात ती सना सेन्सिबल वाटते पण तिला काही फॅन फॉलॉइंग नाहीये .
अंकिताला जिंकवून ट्रॉफी द्यायचा प्लॅन दिसतोय सध्या मेकर्सचा !

मी त्या ईशाचा करन्ट बॉफ्रे आला तो भाग थोडा फार पाहिला. अगदीच ऑब्व्हियस ड्रामा. प्री प्लॅन्ड नक्कीच. तो अभिषेक असा काय हंबरडे फोडून रडत होता Uhoh अंकिता आणि नवराही अगदी खोटारडे. अजिबात लाइकेबल नाहीत.

उडारीयाच्या टिमचे नक्कीच प्रमोशनल प्लॅन्स आहेत हे, मागच्या वर्षी प्रियंका अंकित आणि या वर्षी हा फेक लव्ह ट्रायन्गल.. उडारीया इज रेड फ्लॅग !

मी हा सिझन पाहते आहे. कोणीच ओळखीचं नाही, म्हणून सगळ्यांना गुगल केलं. सगळेच नमुने आहेत. अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या या दोन्ही टीव्ही बायका डोक्यात जातात. ईशाला मेजर counseling ची गरज आहे. तिचे आजी आणि माजी दोघेही मठ्ठ आहेत.

अंकिता लोखंडे बोलताना जबडा अती विचित्र हलवत बोलते. ही मला काही तरी abnormal वाटते (दिसण आणि वागणं दोन्हीही)

गेम्स ठेवतच नाहि आजकल... नुसती भांडणच... काल सना ने जाणुन बुजुन निर्णय दिला.
दम वाले सगळा दम झोपुनच घालवतात.. सगळे नमुने आहेत यावेळचे..

निल आणि ऐश्वर्या नवरा बायको आहेत का? किरण करमरकर येणार असे वाचले काल कुठेतरी. ईशा आणि तिची स्टोरी पकाऊ आहे.

Pages