मायबोली गणेशोत्सव २०२३ - समारोप आणि संयोजकांचे मनोगत

Submitted by संयोजक on 28 September, 2023 - 07:34

आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मनोगत लिहिण्याचे काम चालू असतानाच चुकीने धागा ठरलेल्या वेळेआधीच प्रकाशित झाला. आम्ही आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार मानतो आणि आमच्या मनोगतासह धागा पुन्हा प्रकाशित करत आहोत.

मायबोलीकरांनो, नेहमीसारखा या वर्षीही तुम्ही सर्वांनी मायबोली गणेशोत्सव २०२३ उत्सवाला भरघोस प्रतिसाद दिला.
उत्सवाची घोषणा झाल्यापासून उपक्रम आणि स्पर्धांचे धागे योग्य वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी पूर्ण संयोजक समिती प्रयत्न करत होती. सगळ्यांनी सुचवलेल्या उपक्रमातील तुम्हा सर्वाना आवडतील, सोपे होतील असे उपक्रम निवडले गेले. वेळेअभावी काही उपक्रम रद्द केले गेले. तुम्हा सर्वांच्या तयारीसाठी उपक्रम आणि स्पर्धांची घोषणा उत्सव सुरु होण्याच्या काही दिवस आधीच केली गेली. त्यात मुद्रित तपासणीचे काम अपुरे राहिले होते. मातृभाषेच्या प्रेमापोटी तुम्ही ते लक्षात आणून दिले त्याबद्दल संयोजक समिती आपले आभारी आहोत. चुकलं माकलं सांभाळून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद.
उत्सव सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून प्रवेशिका येण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे उत्साही वातावरण तयार झाले. लेखन विभाग, पाककला विभाग, हस्तकला, चित्रकला विभाग आणि खेळ या सर्वांमध्ये तुमचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्सव यशस्वी होण्यासाठी तुम्हा सर्वांचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे.
सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या छोट्या मंडळींचे आम्ही आभार मानतो. उपक्रमात भाग घेण्यासाठीच तुमचा उत्साह आणि तुम्हाला होणारा आनंद बघूनच संयोजन समितीला समाधान मिळते. मायबोली admin / वेमा यांनी आम्हाला संयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा खूप आभारी आहोत.
धन्यवाद,
- मायबोली गणेशोत्सव २०२३ संयोजन समिती (गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, Ashwini_९९९, बोकिमाउ)

गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता,
रागाचा प्रश्नच नाही उलट मीच दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाल्याबद्दल. आज मतदानाचे धागे प्रकाशीत होतील.

Pages