पाककृती स्पर्धा क्र. २ - दूधीची सात्विक भाजी- ओजस

Submitted by ओजस on 25 September, 2023 - 06:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य -
एक लहान दुधी, फोडणीचे साहित्य, तेल, ३-४ हिरव्या मिरच्या, दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे, मुठभर कोथिंबीर, दोन चमचे तीळ, दोन चमचे खोबऱ्याचा कीस, कढीपत्ता,चवीपुरते मीठ गुळ .

क्रमवार पाककृती: 

१. दुधीचे साल काढून दुधी चोपर (Chopper) मध्ये बारीक करून घ्यावा.
२. भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
३. कढईमध्ये जरा जास्तच तेल घेऊन, तेल तापल्यावर मोहरी, हिंग ,हळद घालून जाडसर वाटलेला ठेचा , तीळ,कढीपत्ता घालावा.
४. वाटण नीट परतले गेले की दुधी घालावा.
५. मीठ घालून झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ द्यावी.
६. चवीनुसार गूळ घालून नीट हलवून घ्यावे.
७. गॅस बंद करून, वरून खोबऱ्याचा किस पेरावा.
८. गरमागरम भाजी तयार!!
WhatsApp Image 2023-09-25 at 15.31.27.jpegWhatsApp Image 2023-09-25 at 15.31.27_0.jpegWhatsApp Image 2023-09-25 at 15.31.28.jpegWhatsApp Image 2023-09-25 at 15.31.28 (1).jpeg

वाढणी/प्रमाण: 
३ - ४ जणांसाठी.
अधिक टिपा: 

१. मिरच्या, भाजलेले दाणे आणि कोथिंबीर किंचित तेल घालून जरा परतून घेवून मिक्सरमध्ये ठेचा केल्यास वाटण करताना पाणी घालायची गरज पडणार नाही.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! मी पहिल्यांदाच बघितली अशी भाजी दूधीची.
साहित्य, कृती आणि फोटोवरून मस्तच लागत असेल हे लक्षात येते.

ही भाजी दोनदा करून झाली Happy फारच आवडलेली आहे रेसिपी! दुसर्‍या वेळी करताना यात आले पण घातले. फार मस्त फ्लेवर आला.

काल ह्या पद्धतीने दुधीची भाजी केली. मस्त चव आणि सोपीही आहे एकदम. फार मसाले वगैरे नाहीत. पुन्हा नक्की करणार.
बायदवे, ओजस, तुम्ही फोडणीत तीळ घालायचे हे लिहायला विसरला आहात, फोटोत दिसतं आहे. पण बघा अ‍ॅड करता येतंय का.

छान झाली ही भाजी. आज केली.
वाटणात थोडं पाणी घालावं लागलं कारण नुसते कोरडे दाणे, कोथिंबीर, मिरच्या मिक्सरमधे वाटल्या जाईनात. पाणी सुटलं भाजीला. तुमची जेवढी कोरडी दिसतेय तेवढी नाही झाली माझी. पण वेगळी चव आलीये. आवडली.

आज या पद्धतीने दुधीची भाजी करुन बघितली. मस्त झालेली. दुधीला नाक मुरडण्याऱ्या मंडळीनी पण खाऊन छान झालीये भाजी , याच पद्धतीने कर अशी दाद दिली .
१० मिनिटात भाजी होते. वेगळी चव मस्त लागते .

आज मुहूर्त लागला या भाजीला!

IMG_0219.jpeg

मी दुधी किसून घेतला, आणि गिचका व्हायच्या भीतीने कीस पिळून फोडणीवर घातला. मग तेच पाणी लागेल तसं थोडं थोडं घालत वाफवला. किंचित लिंबू पिळलं. गूळ नाही घातला.

नुसता वाटीत घेऊन खावा इतकी सुंदर चव आली आहे!
याचीच बटाट्याच्या किसासारखी तूप-जिऱ्याच्या फोडणीतली आवृतीही मस्त लागेल!

अभिनंदन ओजस !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

पाककृती स्पर्धा क्र २ - ...ार-प्रथम क्रमांक - ओजस.jpg

Pages