कोसल्याबाहेर.

Submitted by अश्विनीमामी on 9 June, 2009 - 23:31

होते आमचे ही घरटे
ज्याला नजर लागली म्रुत्युची.
धडपड्ताहेत आमचीही पिल्ले
वडीलां वाचून उडायची.

नसेल तुमच्या हळदीकुन्कवात आम्हाला स्थान.
आता घेऊ वाढून आमचे आम्हिच पान.

नाहित आमच्यापाशी सध्या मजेचे प्रसन्ग.
जगताना आडवे येताहेत आठवणींचे तुरुन्ग.

करायचे आहे आता आपलेच मनगट बळकट.
उभारायचा आहे बाळाभवती अस्तित्वाचा कोट.

पण आहे आमचा दर्वाजा दुखीकश्टीतानना उघडा
तेथे आम्ही त्याना देउ प्रेम, शान्तता आणी समजुतदारपणा थोडा.

गुलमोहर: 

फार हृद्य आहे.
पुढील भवितव्यास्आठी अनेक शुभेच्छा.
शब्द रचना फार प्रभावी आहे .
अन्तरीचा निग्रह व वेदना शब्दोशब्दी व्यक्त होतात.
विशेषतः
"होते आमचे ही घरटे
ज्याला नजर लागली मृत्युची
धडपड्ताहेत आमचीही पिल्ले
वडीलान्वाचुन उडायची."

अश्विनिमामी,
मला कवितेतलं फार कळत नाही, पण एका विधवेची आंतरिक अवस्था तुम्ही चांगली वर्णन केली आहे.
थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दिलंत तर आशय अजून दृढ होईल.

पुलेशु! Happy

अश्विनिमामी,
छान जमलयं .. शुद्धलेखन आतापासुनच सांभाळा

व्यथेतूनही स्वतःला सावरून झुंजण्याचं बळ देणारी आणि अस्तित्वाला बळकटी देणारी कविता खूप आवडली!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

होते आमचे ही घरटे
ज्याला नजर लागली म्रुत्युची.
धडपड्ताहेत आमचीही पिल्ले
वडीलान्वाचुन उडायची.

शत्रुवर सुद्घा असा प्रसंग येऊ नये हिच प्रार्‍थना............

अश्विनिमामी,
कविता सुंदर आहे..शुध्दलेखणाकडे थोडे लक्ष द्या.

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

>>शुध्दलेखणाकडे >> मोकाट Lol काय हे? तुम्हीच अशुद्ध लिहीलंय. चुकुन झालंय की मुद्दाम केलं?

हा हा! दक्षिणा, चुकुन झालंय ते!!..:हाहा:

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

होते आमचे ही घरटे
ज्याला नजर लागली मृत्युची.
धडपडताहेत आमचीही पिल्ले
वडीलांवाचुन उडायची.

नसेल तुमच्या हळदीकुंवात आम्हाला स्थान.
आता घेऊ भरून आमचे आम्हीच पान.

नाहीत आमच्यापाशी सध्या मजेचे प्रसंग.
जगताना आडवे येताहेत आठवणींचे तुरूंग..
करायचे आहे आता आपलेच मनगट बळकट.
उभारायचा आहे बाळाभोवती अस्तित्वाचा कोट.

पण आहे आमचा दरवाजा दु:खीकष्टींना उघडा
तेथे आम्ही त्याना देऊ प्रेम, शांतता आणी समजुतदारपणा थोडा.

घ्या अन कॉपी पेस्ट करा.. Happy
भरपूर वेळ घेऊन शुध्दलेखनाकडे चांगलच लक्ष दिलत तर रसभंग होणार नाही..
मायबोलीवर मराठी टाईप करणे मुळीच अवघड नाही.. कृपया सराव करावा ही नम्र विनंती.. Happy

कणा नावाची
भिंत खचली कलथुन खांब गेला
सहावी का सातवी मधे वाचलेली कवीता आठवली
खुप आवडली कोसल्या बाहेर

ओह ! छानच आश्विनी(मामी)

ह्म्म्म. हृदयस्पर्शी.
पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.

धन्यवाद. शुद्ध्लेखन नक्की सुधारणार. पोस्टायची घाई दुसरे काय.मला दहावीत चान्ग्ले गुण होते आपल्या
मायबोलीत. तुम्ही सर्व खूप चान्ग्ले आहात. एक मैत्री दुवा. ज्याची अतोनात गरज भासत होती. इथे
स्रीमुक्तिवादी विचार कोणाचे आहेत. मी गौरी देशपान्डे ना spiritual mother मानते.

----------------------
सुविचार तळयापाशी उगवणारी एक निरुपद्रवी वनस्पती. Happy

अना Thanks a lot. I will write free copy for you anytime.

छान आहे कविता. आवडली.

ही आपली life story आहे कां?

स्त्री मुक्तिवादी विचार कशासाठी हवेत? लक्षात नाही आले.

एक नवी विचारधारा सुरू करायचा मानस आहे. बा.फ.

छान कविता...
काही प्रसंग आयुष्य घडवणारे असतात...ते खुप रुक्ष असले तरी...
तुमच्या बछड्यांच्या पंजातलं बळ या प्रसंगाने वाढावं अशी मनापासुन शुभेच्छा!!

अश्विनीमामी तुमची कविता आवडली असे नाही म्हणू शकत (अशी कविता लिहिण्याची वेळ कुणावरही येवू नये.) पण तिने डोळे नक्कीच ओले केले. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला अश्या प्रसंगातून हल्लीच जावे लागले.
तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला अन कुटुंबियाना अनेक शुभेच्छा. मी तुम्हाला पाहिले नाही पण वेगवेगळ्या बाफ वर तुमच्या कमेंट्स वाचल्या आहेत. रोमात असले तरी मी तुम्हाला आयडी ने ओळखते. या कवितेतून तुमचे उलगडलेले रूप खूप वेगळे आहे.
काळजी घ्या.
- सारिका