लेखन उपक्रम २ - अगतिक-आशिका

Submitted by आशिका on 22 September, 2023 - 09:34

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

ती....भकास चेहर्‍याने शुन्यात नजर लावून बसली होती. रडून सुजलेले डोळे, अंगावरच्या कपड्यांची, विस्कटलेल्या केसांची शुद्धच नव्हती तिला.... याआधी अशा अगतिक अवस्थेत त्याने तिला कधीच पाहिलं नव्हतं. त्याला तिच्याकडे पाहवेना. उठलाच तो तिरिमिरीत.... तिला समजवायला.... "उठ गं, नीट तयार हो, अशी काय बसलीस?". एक ना दोन.. तिच्याकडून कसलाच प्रतिसाद नाही. हे काय होतंय तिला? माझ्या एका शब्दानिशी खुलणारी ती आज का अशी म्लान बरं?
हळूहळू बाकीचे येऊ लागले. गाडी येण्याची वेळ झाली म्हणे, हॉर्न वाजला. सारे वळले त्या दिशेने. ही कोण अनोळखी माणसं माझ्या घरात काय घेऊन येतायत? तिने हंबरडा फोडला, त्या लोकांनी शुभ्र चादरीत गुंडाळलेलं शरीर खाली ठेवलं.......त्याचं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे बापरे Sad
माझ्या दृष्टीने हि एक नंबर शशक... अगदी फिट्ट जमली आहे दिलेल्या ओळींसाठी. धक्कातंत्र जबरी! खूप खूप छान