चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-४ - मी पाहिलेले देऊळ

Submitted by संयोजक on 22 September, 2023 - 04:04

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू..

आजचा विषय - मी पाहिलेले देऊळ

मंडळी, आपल्याला मनःशांती हवी असेल तर आपसूकच पावले देवळाकडे वळतात. मंदिर, मग ते कोणत्याही देवतेचे असले तरी तेथे जाऊन दर्शन घेतल्यावर मनाला वेगळेच समाधान लाभते. प्रत्येक देवळासोबत एक कथा किंवा वैशिष्ट्य निगडित असते. काहींची स्थापत्य शैली खास असते, तर काही देवळे तिथल्या दैवतासाठी प्रसिद्ध असतात. तुम्ही कोणते देऊळ पाहिले आहे? इथे प्रकाशचित्र द्या आणि सोबत त्याचे वैशिष्ट्य/माहिती लिहिलीत तर उत्तमच!

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@हर्पेन, धन्यवाद. हा उद्योग आम्ही पण हिमाचल मध्ये केलेला पण त्यामागचे कारण माहीत नव्हते. ते आज कळले.
@भरत, उतरती छपरे, त्या विशिष्ट खिडक्या आणि तावदान, यामुळे असेल कदाचित. १७ व्या शतकात बांधलं होतं म्हणून पोर्तुगिजांचा प्रभाव असेल कदाचित.

rr38 यु आर वेलकम!
अरे इकडे कोणी फिरकत का नाहीये.
माझ्याकडे आहेत अजून काही फोटो, कोणीतरी टाका फोटो म्हणजे मलाही टाकता येतील.

हर्पेन, हा घ्या सिंधुदुर्गात प्रवेश करताना असलेल्या हनुमान मंदिराचा फोटो. महाराजांनी बांधले होते असं वाटाड्याने सांगितल्याचे आठवते
Screenshot_20230926_201006_Gallery.jpg

सगळेच फोटो अप्रतिम.
शांतादुर्गेचं मंदिर पाहताना चर्चचा भास झाला. >>>+१
rr३८ पराशर तलाव अद्भुत. हर्पेन सुंदर फोटो.
हा धागा निवडक १० त .

धन्यवाद rr38.
धन्यवाद अस्मिता

पांचाळेश्वर मंदीर ( धरणातून पाणी सोडल्यामुळे आलेल्या पुरातले)
IMG_20190806_071445 (1) (1).jpg

ह्या फोटोकरता कोणी नाही तरी अमा मला नक्की धन्यवाद देतील.

धागाशंभरी करिता:

महाराष्ट्राच्या दैवताचे सुदूर आंध्रदेशी बांधलेले मंदिर !

हे बाहेरून 804b144b-3fe7-4093-a6b2-f982d8a01cba.jpeg

आणि हे आतून:

d73ba392-ce83-41c7-a3b4-f09ca35ae134.jpeg

भ्रमरांबेच्या चरणी शिवबांचे ध्यानमग्न रूप

मु. पो. श्रीशैलम, कुर्नूल, आंध्रप्रदेश.

अनिंद्य - येऊ देत अजून फोटो. तुमच्याकडे भरपूर असतील !

जोशीमठ येथील नृसिंह मंदीर (जीर्णोद्धारापुर्वीचे)
(सध्याचे नवीन मंदीर मागच्या पानावर आहे.)

DSC05668.JPG

अनिंद्य - फारच छान.
माझ्याकडून अजून एक हिमाचल प्रदेश मधील त्रिलोकिनाथ बाबा मंदिर Screenshot_20230926_202009_Gallery.jpg

वासोटा ट्रेक सम्पल्यावर हुश्श होतं हा पारावरचा मारुती दिसल्यावर आणि पलीकडचे प्राचीन शिवमंदिर. ही मंदिरे दिसायला छान नाहीत. पण वर चढून गेल्यावर खोल खोल दर्या बघून मंदिराजवळ मन शांतावतं.

Screenshot_20230927-172608_Gallery.jpg

--
Screenshot_20230927-172556_Gallery.jpg

कैलास मानस यात्रा मार्गावरील मालपा नावाचे पुर्ण गाव यात्रेकरूंच्या जथ्यासकट वाहून गेले होते. त्या ठिकाणी बांधण्यात आलेले हे स्मृती मंदीर.

IMG_20150803_093033_HDR.jpg

Pages