उपक्रम २- NRI - मानव

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 September, 2023 - 22:38

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

ही तर बॅंकवाली. याच्याकडे लक्ष जाताच, दुसरीकडे बघु लागली आणि याला हसु आले.
आज सकाळी तो खाते सुरु करायला बॅंकेत गेला होता. प्युनला याने ओळख दिली ते ऎकुन ही लगबगीने पुढे आली.
याला वातानुकुलीत कक्षात बसवून मॅनेजरकडे जाउन सांगीतले "NRI आलाय खाते सुरु करायला.”
दोनच मिनिटाने याला मॅनेजरकडे घेउन गेली. मॅनेजरने अदबीने स्वागत केले, चहा बिस्कीटे आली.
“कीती दिवस मुक्काम आहे पुण्यात?”
“आता पुण्यातच असतो की, आजोबा आले इकडे नोकरीसाठी बंगालहुन.”
“पण आपण...”
“मला खातं सुरु करायचं आहे, माझं नाव एकनाथ नाभेंदु राय.
ए. ना. राय.”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

Pages