लेखन स्पर्धा-१ - स्त्री असणं म्हणजे ... - छन्दिफन्दि

Submitted by मीस्वच्छंदी on 19 September, 2023 - 09:58

असं असेल का एखाद्या पिडीत, दबावाखाली वावरावं लागणाऱ्या, बोर्डमिटिंग मध्ये डावललेल्या, अग्निदिव्य करावं लागणाऱ्या किंवा एखाद्या
वस्तूसारखं जिचं स्त्रीत्व पणाला लावलाय तिचं मनोगत ...

मी लक्ष्मी, अन्नपूर्णा, किंवा इतरही कोणती देवी नाही
मला देव्हाऱ्यात बसवू नका,
मी हरायला, लुटायला, पणाला लावायला एखादी वस्तू नाही
उपभोग करून फेकू नका,
माझं स्त्रीत्व म्हणजे ना कुणा एकाची मक्तेदारी की कुटुंबाची मानमर्यादा,
काचेचं भांड समजून फोडायला जाऊ नका,
मी आहे हाडामासाची, धडकणाऱ्या हृदयाची, तळपत्या बुद्धीची एक जिवंत माणूस,
मला माणसा सारख जगू द्या, मोकळा श्वास घेऊ द्या!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Reuse केली .

प्रतिसादा बद्दल धन्यवाद!