उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् - नजरभेट - छन्दिफन्दि

Submitted by छन्दिफन्दि on 19 September, 2023 - 09:44

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."

आजचा सलग तिसरा दिवस, आधीच बोलके डोळे, मैत्रिणीशी बोलताना अजूनच घायाळ करत होते. तेव्ढ्यात पम्याच्या मागोमाग बसही आली.
ती त्या गर्दीत दिसेनाशी झाली तसा तोही नेहेमीच्या शिताफीने बसमध्ये चढला.
समोर बघतोय तर साक्षात ती.
आता त्याच्या लक्षात आलेलं, डोळ्याच्या कोपऱ्यातून तीही त्याच्याकडेच कटाक्ष टाकत्ये.
चलाख पम्याने संधी साधून त्याला हटकले, "तुझा नवा नंबर ९८३३ ६४३४१२ आहे ना ?"
तीक्ष्ण कानांनी हिनेही नंबर टिपून घेतलेला ह्याच्या डोळ्यांनीही टिपला.
खुशीत शीळ घालत स्टॉपवर उतराला
इकडे हिची घालमेल, आजचा कोर्सचा शेवटचा दिवस, नेहेमीचा तिचा घोळ झालेला ६४३४१२ की ३४६४२१ की ६४३४२१ की ... ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!! पण तिला त्याचा उपस्थिती/हजेरी क्रमांक का हवा होता? रजिस्टरमध्ये, नाव पहायचं होतं का?

लास्ट डे आहे मग नंतर कॉन्टेक्ट कसे होईल म्हणून मोबाइल नंबर होता तो ( रजिस्टर नंबर नाही ) धांदरटपणामुळे नेहमीची गल्लत झाली बिचारीची !! घोर कंफ्यूझन !! ह्यातूनसुद्धा उपाय होताच ट्रू कॉलर वरती सर्व कॉम्बिनेशन बघत नाव ओळखीचे येईपर्यन्त ट्राय करत राहणे Light 1

अर्रे खूपच छान आहे .
आई ग्ग!!! भेटेल का ती त्याला परत? सिक्वेल लिहा प्लीज.

Lol
म्हणुन मी लोकांना सांगत असतो नंबर थोडा इंग्रजीत आणि थोडा मातृभाषेत सांगा व लक्षात ठेवा.
Nine eight double three चौसष्ट चौतीस बारा.
नसता का लक्षात राहिला?
वाजवलेना बारा!

मस्त ... जुने दिवस आठवले Proud
बसच्या रांगेत मागे उभे राहायचे आणि मित्राला खोटा कॉल करून आपले सारे डिटेल पास करायचे..

उपस्थिती/हजेरी क्रमांक का हवा होता? रजिस्टरमध्ये, नाव पहायचं होतं का?
>>>>
तुम्हाला खरेच असे वाटले का सामो? की गंमतीने लिहिले आहे..

चौसष्ट चौतीस बारा. >>>> लॅडलाईन काळात सात आकडी नंबर असेच लक्षात ठेवले जायचे. सात अंकाचे ३-३-२ आकडी मराठी अंक बनवून. पुढे मोबाईल आले आणि फोन नंबर पाठ करायची पद्धत लोप पावली.

लास्ट डे आहे मग नंतर कॉन्टेक्ट कसे होईल म्हणून मोबाइल नंबर होता तो ( रजिस्टर नंबर नाही ) धांदरटपणामुळे नेहमीची गल्लत झाली बिचारीची !! घोर कंफ्यूझन !! ह्यातूनसुद्धा उपाय होताच ट्रू कॉलर वरती सर्व कॉम्बिनेशन बघत नाव ओळखीचे येईपर्यन्त ट्राय करत राहणे Light 1

Submitted by अज्ञानी on 1>>>> धन्यवाद!

मातृभाषेत सांगा व लक्षात ठेवा.
Nine eight double three चौसष्ट चौतीस बारा.
नसता का लक्षात राहिला?
वाजवलेना बारा!

Submitted by मानव पृथ्वीकर on 19 September, 2023 ->>> मराठीत जास्त चांगले लक्षात राहते.. एवढं खर आहे Happy Happy Happy :स्मित

मराठी नाही छंदीफंदी, अर्धमराठी अर्धांग्ल - असे नीट लक्षात रहाते.
मानव अगदी १००% खरे बोललात. Happy

बसच्या रांगेत मागे उभे राहायचे आणि मित्राला खोटा कॉल करून आपले सारे डिटेल पास करायचे.>>> कधी उपयोग झाला का त्याचा? Bw

खरच वाटले. जुन्या काळची आठवण आली. म्हटलं कोर्स संपताना.
- रजिस्टरमध्ये नाव पहायचे होते की काय>>> reg number कोणी का मागेल... मला लिंक लागत नव्हती..

Course Cha शेवटचा दिवस तिचा होता... बस सार्वजनिक होती

अमोल पालेकरचा चित्रपट आठवा. >>> Bw

नाही छंदीफंदी, अर्धमराठी अर्धांग्ल - असे नीट लक्षात रहाते.
मानव अगदी १००% खरे बोललात.>> मी पण बघते प्रयत्न करून ... मराठीत गल्लत होत नाही... असा माझा अनुभव (?)

अन्जु, आबा, देवकी धन्यवाद!

दोन्ही नंबर ट्राय करून पाहायचे... हाकानाका>>> तेही खरेच Lol Lol Lol :हाहा

तेही फोन करे करे पर्यंत फिरवून टाकले असतील