मनमोहक ते रूप || अर्पितो तुज मनोभावे नैवैद्य ||

Submitted by संयोजक on 19 September, 2023 - 05:06

भक्तगणांनो, गणेशोत्सव तर सुरु झालाय. मन प्रसन्न करणाऱ्या गणेशमूर्ती घराघरात आणि सार्वजनिक मंडपात स्थानापन्न झाल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीकडे बघूनच मन आनंदित होते आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच बाप्पाला अर्पण करणारा प्रसाद आणि नैवैद्य यामुळे वातावरणातील गोडवा द्विगुणित झाला आहे. इतर मायबोलीकरांनासुद्धा तुमच्या घरातील बाप्पाचे दर्शन व्हावे आणि त्यांनासुद्धा नैवैद्याचा गोडवा अनुभवता यावा म्हणून या धाग्यावर तुम्ही तुमच्या घरातील बाप्पाचे फोटो तसेच बाप्पाला अर्पण करणाऱ्या प्रसादाचे आणि नैवैद्याचे फोटो द्यायचे आहेत. लवकरात लवकर फोटो टाका. आम्ही सर्वजण बाप्पाच्या मुखदर्शनाची आणि नैवैद्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार भारी आरास Dumboo. केवढे नैवेद्य. गावाचा मिळून एकच गौरीगणपती असतो का??

तुमच्या फोटोत गणपतीच्या मागे आहेत ती कसली फुले आहेत? मागच्या पानावर आमच्याकडचा फोटो आहे त्यात ती कागदी/फोमची आहेत. ती विकत मिळाली ऑनलाइन.>>फारएण्ड, गणपतीमागची फुले कागदाची आहेत. आम्ही पण रेडिमेड घेतली दुकानातून.

माझ्या भावाकडे यन्दा गौरी-गणपतीला केदारनाथचा देखावा साकारलाय..
440acf3e-8734-4a99-95bd-88f45c5f5290.jpg

Pages