Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 September, 2023 - 05:51
अंधारल्या दिशा अन अंधार सावल्यांचा
कल्लोळ अंतरीचा , कल्लोळ भावनांचा ..
वाटा किती तुडवल्या , आयुष्य शोधताना ,
संधी बऱ्याच हुकल्या , स्वप्नात राहताना ..
आले किती एक क्षण हे , दुःखास घेऊनिया ,
क्षणैक सुखांनी , गोंजारले मनाला ...
ग्रीष्मातल्या चटक्यांची , वाटे आता न भीती ,
घनघोर जलधारांची ,जडलीच असे प्रीती
स्वीकारले आता हे , या सर्वांसवेच जगणे ,
मौनामध्येच हासणे , मौनामध्येच जगणे ..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा