'जगणं ' आम्ही विसरलोय

Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 September, 2023 - 05:46

रोजच्या जगण्यात 'जगणं ' आम्ही विसरलोय,

ठरलेल्याच धावपट्टीवरच 'पळणं ' आम्ही विसरलोय ,

सूर्य आपला उगवतोय , ठरल्यावेळी मावळतोय ,

आम्ही मात्र तसेच , रोज धडपडून सावरतोय ,

चंद्राचं आपलं बरं आहे ,

कलेकलेने वाढणं कितीकिती खरं आहे ,

पाखर आपली उठताहेत , वरवर भटकताहेत ,

रोजचा घास नव्यानंच शोधताहेत ,

आम्ही माणसं मात्र अडकलोय , घाण्याचा बैलासारखं ,

त्याच त्याच खांबाभोवती , "धावतोय" असं फक्त सांगण्यासारखं ..

सोडावं वाटतं हे चाकोरीतलं जगणं ,

सुरु करावं आता मुक्त भटकणं ,

अर्थाशिवाय हि जगात खूप काही अर्थ आहे,

किड्यामुंग्यांसारखं फक्त जगून मरणं निव्वळ व्यर्थ आहे ..!!

Group content visibility: 
Use group defaults