कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे 'इन्टरपर्सनल' ग्रह मानलेले आहेत. आपल्या वागणुकीवर प्रभाव करणारे असे हे ग्रह. पैकी चंद्र हा मनाचा कारक असल्याने, आपल्या भावना तसेच आपल्या उस्फूर्त प्रतिसादांवर, प्रतिक्रियांवर तो अधिराज्य गाजवतो. शुक्र हा सोशल ग्रह आहे. हा ग्रह आपल्याला काय आकर्षक वाटेल, आपल्याला कोणत्या पैलूंची भुरळ पडे, काय मोहवेल ते दर्शवितो. जर ग्रह म्हणजे ज्योत असे मानले तर ही ज्योत ज्या स्फटिकपात्रात तेवते आहे, ते स्फटीकपात्र म्हणजे राशी. उदाहरणार्थ - मेषेचा शुक्र हा मेष राशीचा रंग घेइल, तशा प्रकारे तो स्वत:ला व्यक्त करेल तर कर्केचा शुक्र स्वत:ला कर्क राशीच्या गुणावगुणांत अवगुंठीत करेल. म्हणजे काय तर - शुक्र हा पीपल प्लीझिंग ग्रह असल्याने, कर्क राशीचा शुक्र, अन्य लोकांना कसे प्रेम दाखवेल, कसे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल तर - खाऊ पीऊ घालून, त्यांच्यावर अनकंडिशनल मायेचा वर्षाव करुन. लग्न आणि चंद्ररास तसेच शुक्राची रास साऱ्याचे आपण एक संमिश्र रसायन असतो.
----------------------------------------------------------------
https://www.youtube.com/watch?v=450p7goxZqg
You're my end and my beginning
Even when I lose, I'm winning
हे गाणे सकाळपासून मनात रुंजी घालतय. उत्कट!
.
I want to devour you!
होय, मला तू फक्त हवीयेस असे नव्हे तर मला तुझ्या डोळ्यातून हे जग पहायचय मला तुझ्या डोळ्यातून मला स्वतःला न्याहाळायचय. मला तुझं शरीरच पुरेसे नाहीच नाही पण तुझे तुझे विचार, मूडस सग्गळ मला अनुभवायचय. यु आर माय अल्फा, माय ओमेगा. माझ्याकरता प्रेम सुरुही तुझ्यात होतं आणि संपतही तुझ्यात.
Give your all to me
I'll give my all to you
You're my end and my beginning
कसं सांगू नव्हे न सांगताच तुला कळेल फक्त माझ्या नजरेत. माझ्या डोळ्यातूनच तुला ही इन्टेन्सिटी माझ्या प्रेमाची उत्कटता, दाहकता कळू शकेल. बोलणार तर मी काहीच नाही, चकार शब्द नाही आणि तुला कळल्यावाचून तर रहाणार नाही. दॅट्स द मॅजिक .... अ स्कॉर्पिओ मॅजिक.
Cards on the table, we're both showing hearts
Risking it all, though it's hard
असं मन उकलून दाखवणं, प्रेम मागणं ही रिस्क तर आहेच. पण ती फक्त तू आहेस म्हणुन, ती रिस्क घ्यायची माझी तयारी आहे, आहेस तू ही तयार?
तूळेचं प्रेम मोहक असेल तर वॄषभेचं प्रचंड earthy, शारीरी असेल. सिंहेचं पॉम्पस आणि रॉयल असेल , मेषेचं संयम नसलेलं असेल. कन्येचा शुक्र रुक्ष असेल, कर्केचा हळवा आणि होमली पण वॄश्चिकेचा शुक्र आहे डीप वाईन रंगाचा हृदयाच्या आकाराचा लोलक. मोहक पण अप्राप्य आणि मिळाला तरी सांभाळण्यास कठीण. नॉट फॉर फेंट हार्टेड. जर वॄश्चिकेच्या हातात हात घालून, धोक्यातून वाट काढत काढत जाण्याची हिंमत असेल त्यानेच या प्रेमात पडावे. बी रेडी टू गेट स्टॉक्ड. एकदा तुला माझं म्हटलं की मग तू सर्वस्वाने माझी झालीस.बी रेडी तू गेट स्कॉर्चड विथ जेलसी. झेपेल असं ऑल कन्झ्युमिंग प्रेम? सतत परीक्षा घेतली जाईल, परीक्षेत उत्तीर्ण होशील? बघ आताच वेळ आहे, पळून जा. नाहीतर पस्तावशील पण जर कसोटीला उतरलीस तर मग असं प्रेम अजुन कुठलीच रास तुला देउ शकणार नाही. हां मिथुन शुक्र तुझ्याशी गंमतीजंमतीच्या गप्पा मारेल, धनु शुक्र तुझ्याशी पुस्तके, दूरदूरचे देश याबद्दल तासन तास बोलू शकेल, कुंभेचा शुक्र त्याच्यासम तोच. पण कोणालाही वृश्चिकेच्या एकाग्र एकनिष्ठतेची सर नाही. सूर्यप्रकाशात भिंग धरलयस कधी. काय होतं मुंगी, कागद, वाळकं पान जळून जातं. तितकं एकाग्र प्रेम आणि अटेन्शन मिळेल तुला. आर यु विलिंग टु बर्न?
'Cause all of me
Loves all of you
Love your curves and all your edges
All your perfect imperfections
Give your all to me
I'll give my all to you
.
अरे हे गाणं तर वॄश्चिकेच्या शुक्राचं. आणि आज मी जॉन लेजंडची पत्रिका खास आवर्जून पाहीली आणि - Lo!! He happens to be a Scorpio Moon. दॅट एक्स्प्लेन्स इट ऑल.
अरे वा ! डीटेल्ड पोस्ट साठी
अरे वा ! डीटेल्ड पोस्ट साठी आभार 🙏
… तूळ शुक्र स्त्रीस स्टिम्युलेटिंग, इन्टरेस्टिंग कॉन्व्हरसेशन आवडेल, वाईन आणि छान पदार्थ आवडतील. त्यातही ती पदार्थ सुंदर सजवत असेल.. कोणतीही कृती एकट्याऐवजी दुकट्याने, आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर करणे तिला आवडेल. सोशलाइझ करेल ती पण सगळं संतुलित असेल. ग्रेसफुल, कपडे, मेक अप भडक नाही. क्लासी ब्युटी असेलडिसहार्मनी करणारी नसेल. येस शी विल एन्जॉय अ हेल्दी डिबेट. नक्कीच. आणि ती वेगवेगळ्या अंगानी विचार करणारी असेल….
९० % जुळते आहे.
Disharmony चा तिटकारा, चांगली चॉइस, जीवनात सुखलोलुपता हे तंतोतंत.
फक्त gender वेगळे, व्यक्ती पुरुष आहे.
सॉरी प्रियपात्र शब्दाने माझा
.
@ प्रियपात्र
@ प्रियपात्र
My bad. I meant likeable, a loved one, not in romantic way. Ha ha.
ओके.
.
किती सुरेख वर्णन केले आहेस
किती सुरेख वर्णन केले आहेस सामो. रास कोणतीही असो, पण तुझ्याकडून बारकाईने केलेलं असं वर्णन वाचायला आवडेल.
धन्यवाद प्राचि.
धन्यवाद प्राचि.
@सामो यात काय वेगळं आहे??
@सामो यात काय वेगळं आहे??

प्राचीनला मम.
प्राचीनला मम.
फाविडि वेगळं म्हणजे? मला नाही
फाविडि वेगळं म्हणजे? मला नाही कळत कुंडली. मला ज्योतिषातील, आर्केटाइप्स वापरुन ललित लिहायला आवडतं बस.
फार्स विथ द डिफरंस ,
फार्स विथ द डिफरंस ,
१.कामाची जागा चांगली आहे का?
२.बँक किंवा आर्थिक संबंधित काम?,खाजगी वित्तसंस्था?
८ व्या घरात गुरु प्लूटो युती
(१) ८ व्या घरात गुरु प्लूटो युती आहे, प्लीज होल्ड ऑन मी सांगते. हेच मला वैशिष्ट्यपूर्ण वाटते, ऑकल्ट्मधे आहे का ही व्यक्ती? म्हणजे इन्टेन्सली ऑकल्ट मधे. दाट वृश्चिक इन्फ्लुअन्स आहे पण मला वाटतं विधायक इन्फ्लुएन्स आहे.
----------------
(२) गुगल केले असता कळले फार मोठी लीडर आहे ही व्यक्ती. A Jupiter-Pluto conjunction in astrology signifies power, vision, and transformation. A notable example of this conjunction in a leader is Mahatma Gandhi.
---------------
(३) सहाव्यातला मंगळ दर्शवितो की काम करत रहाणार मरेपर्यंत म्हणजे कोणी म्हणेल राबणार तर कोणी म्हणेल रिटायर नाही होणार. पण हे सगळे दुय्यम आहे.
(४) मीनेचा मंगळ व चं+ने युती मला वाटतं करुणा व माणुसकी दाखवते. लग्नही मीन च आहे.
(५) १० व्या घरातील मेष रास , उत्तम ड्राइव्ह्/अपॉर्च्युनिटी फॉर पब्लिक रेकगनिशन दाखवते. नक्की आपल्या वर्तुळात, प्रसिद्ध आहे.
कोणी रजनिश वगैरेंसारखी करिझ्मॅटिक, गुरु व्यक्ती आहे का ......................... (१) + (२)
८ व्या घरात गुरु प्लूटो युती
८ व्या घरात गुरु प्लूटो युती आहे>>> हे सातव्या घरात आहे ना?? गुरु प्लूटो जिथे आहेत त्या रकान्यामधे ७ क्रं आहे....मी काही चुकीचं समजतोय का??
बेसिक पत्रिकेतील घरं. ग्रह
बेसिक पत्रिकेतील घरं. ग्रह कुठल्या घरात आहेत ते बघतात.
फाविदडि युती तूळेत आहे पण घर
फाविदडि युती तूळेत आहे पण घर ८ वे आहे.
करेक्ट माझेमन
बेसिक पत्रिकेतील घरं. ग्रह
बेसिक पत्रिकेतील घरं. ग्रह कुठल्या घरात आहेत ते बघतात. >>> हे जे ऑनलाईन पत्रिका काढतात ते घरं उलट-पुलट करतात का??
बेसिक पत्रिकेतील घरं. ग्रह
बेसिक पत्रिकेतील घरं. ग्रह कुठल्या घरात आहेत ते बघतात. >>> हे जे ऑनलाईन पत्रिका काढतात ते घरं उलट-पुलट करतात का??
नाही फाविदडि या जात काचे लग्न
नाही फाविदडि या जात काचे लग्न मीन असल्याने पहील्या घरात १२ आकडा आहे. दुसर्यात १, तीसर्यात २ असे करत करत ८ व्या घरात ७ आकडा आहे.
कोणाची पत्रिका आहे?
हे “वृश्चिकेचा शुक्र” लिहिलेत
हे “वृश्चिकेचा शुक्र” लिहिलेत तशी एखादी सिरीज लिहायचे मनावर घ्या- एक एक ग्रह, जसे वेगवेगळ्या राशीतला शनी, सूर्य, चंद्र किंवा इतर कुठला ग्रह. Whichever intrigues your mind.
वाचनीय मालिका होईल हे नक्की.
जरुर अनिंद्य. अजुन एक धागा
जरुर अनिंद्य. अजुन एक धागा आहे माझा. धनु राशीच्या शुक्रास पत्र.
अजुन एक धागा -कन्या रास
अजुन एक धागा -
कन्या रास-सहाव्या घरातील शुक्र
फार पूर्वी लिहीलेला हा क्रिन्जी लेख आपल्या जबाबदा रीवर वाचावा.
@सामो अब अपने मुंह से अपनी
@सामो अब अपने मुंह से अपनी तारीफ क्या करु??... ही माझीच पत्रीका आहे.
अरे मस्त. मग जुळतय का?
अरे मस्त. मग जुळतय का?
अरे मस्त. मग जुळतय का?>>>>
अरे मस्त. मग जुळतय का?>>>> १ला व ३रा पॉईंट पुर्ण, इतरांतील थोडं थोडं....
गुगल केले असता कळले फार मोठी लीडर आहे ही व्यक्ती. >>> हे पुर्णपणे बरोबर नाही ....means the trait is there but it only surfaced when situation demand, or no one other to lead ( & I believe this case is true with everyone) with a very high success rate....but the trait is not permanent, May be innetly I never wanted to take centre stage.
(४) मीनेचा मंगळ व चं+ने युती मला वाटतं करुणा व माणुसकी दाखवते. लग्नही मीन च आहे. >>>या स्वभावाचा विरुद्ध ध्रूव ही आहे....very ruthless.
१० व्या घरातील मेष रास , उत्तम ड्राइव्ह्/अपॉर्च्युनिटी फॉर पब्लिक रेकगनिशन दाखवते. नक्की आपल्या वर्तुळात, प्रसिद्ध आहे. >>> हे चुकलंय, म्हणजे आजवरच्या आयुष्यात तरी. infact so far preferred a low-key or below the radar life.
कदाचीत इतर कशाचा तरी इन्फ्लूएन्स असेल.
मीही पहील्या व तीसर्या
मीही पहील्या व तीसर्या बद्दलच कॉन्फिडंट आहे.
२ रे तर फक्त गुगल केलेले. अतिकृत्रिम निष्कर्ष आहे.
(४) आणि (५) पाणि वाढवुन पातळ केलेली आहे कढी.
Pages