यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबरला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २४ वे वर्ष.
या गणेशोत्सवात माययबोलीला २७ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २७ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
मागचीच टीम उतरवा..
मागचीच टीम उतरवा..
कोणी गळला असेल तर बदली खेळाडू खेळवा
शुभेच्छा !
परत एकदा सुलेखन ठेवा.
परत एकदा सुलेखन ठेवा. यावेळेला ढब्बाडं न काढता, अक्षर, सुवाच्य काढेन. मस्त वाटतं हस्ताक्षरे पाहून.
वर्णिता यावेळेस भाग घेतेयस का
वर्णिता यावेळेस भाग घेतेयस का गं. गेल्या वेळेला तुला खेळांच्या स्पर्धांच्या शेकड्याने अक्षरक्षः कल्पना सुचलेल्या. आपल्याला गाळता गाळता नाकी नऊ नालेले. सगळ्याच एकसे बढकर एक होत्या.
आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे
आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २७ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
>>> ज्जे बात... पुढच्या 73 वर्षांसाठीही शुभेच्छा .. 100 व्या गणेशोत्सवात नक्की स्वयंसेवक म्हणून माझे नाव पक्के समजा...
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा !
शुभेच्छा !
शुभेच्छा.
शुभेच्छा.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
संयोजक मंडळात सहभागी होऊ इच्छीणार्या मायबोलीकरांनी प्रतिसादात आपलं नाव नोंदवावं.
माझी संयोजनात भाग घ्यायची
माझी संयोजनात भाग घ्यायची इच्छा आहे. माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन आणि लॅपटॉप आहे, कृपया माझ्या नावाचा संयोजनाच्या कामासाठी विचार व्हावा ही विनंती आहे.
शुभेच्छा
शुभेच्छा
पूर्ण वेळ सहभाग घेता येणार नाही ह्यावेळी.
काही मदत लागली तर जरूर कळवा मोरया
गोल्डफिश आणि किल्ली धन्यवाद
गोल्डफिश आणि किल्ली धन्यवाद
अजून काही स्वयंसेवक लागतील संयोजनासाठी. लवकर नाव नोंदवलं तर संयोजनाच्या कामाला सुरुवात करता येईल.
मला संधी दिल्यास मी सुद्धा
मला संधी दिल्यास मी सुद्धा ईच्छूक आहे. गणपती बाप्पा मोरया.
सर्वांना शुभेच्छा.
सर्वांना शुभेच्छा.
किशोर मुंढे, गोल्डफिश आणि किल्ली यांच्या सातत्याचं खूपच कौतुक वाटतं.
पूर्ण वेळ संयोजन करु शकणार नाही पण काही लागलं तर जरूर कळवा.
मला पण आवडेल यावेळेस संयोजक
मला पण आवडेल यावेळेस संयोजक म्हणून काम करायला...पण ऑफिस मुळे पूर्ण वेळ देऊ शकत नाही...माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे.
धन्यवाद गोल्डफिश, किल्ली,
धन्यवाद गोल्डफिश, किल्ली, किशोर मुंढे, अस्मिता, Ashwini_९९९.
संयोजन ग्रूप तयार करून त्यात तुम्हाला सहभागी केले आहे.
Sorry Admin , मला यावेळी शक्य
Sorry Admin , मला यावेळी शक्य नाही म्हणून मी त्या ग्रूपमधून बाहेर पडले आहे.
सर्व संयोजकांना शुभेच्छा.
अस्मिता. , माझ्याकडूनच गैरसमज
अस्मिता. , माझ्याकडूनच गैरसमज झाल्याने तुमचं नाव ग्रूपात घेतलं गेलं. क्षमस्व.
हरकत नाही.
हरकत नाही, धन्यवाद.
मायबोली गणेशोत्सव २०२३ साठी
मायबोली गणेशोत्सव २०२३ साठी स्वयंसेवक हवे आहेत
--
हे असले धागे काढण्यापाठी नक्की काय लॉजिक आहे, हेच कळत नाही ?
शेवटी स्वंयसेवक ठरलेल्या कंपुतूनच निवडणार, मग हि नौटंकी दरवर्षी करण्याला काय अर्थ आहे?
शेवटी स्वंयसेवक ठरलेल्या
शेवटी स्वंयसेवक ठरलेल्या कंपुतूनच निवडणार, मग हि नौटंकी दरवर्षी करण्याला काय अर्थ आहे?>>
ज्जे बात
काहीही. स्वयंसेवक मिळायची
काहीही. स्वयंसेवक मिळायची मारामार. निवड करायला स्कोपच कुठे आहे? आताही ज्यांनी इच्छा दर्शवली आहे, त्या सगळ्यांना घेतलंय.
मी संयोजनात भाग घ्यायलाइच्छुक
मी संयोजनात भाग घ्यायलाइच्छुक आहे. कृपया. माझ्या नावाचा समावेश करावा ही विनंती.
धन्यवाद बोकिमाउ . तुम्हाला
धन्यवाद बोकिमाउ . तुम्हाला सहभागी करून घेतले आहे.
वेताळ_२५ , झम्पू दामलू -
वेताळ_२५ , झम्पू दामलू - तुम्हालाही सहभागी करून घेऊ की. फक्त स्वतःची पूर्ण खरी ओळख आणि काही उपयोगी काम करण्याची तयारी हवी, चालेल का?
All are equal, but some are
All are equal, but some are more equal than others
झाली नाही अजून घोषणा
झाली नाही अजून घोषणा गणेशोत्सवाची ?