Submitted by दत्तात्रय साळुंके on 27 August, 2023 - 01:13
तुझं आवतणं दरवर्षी येतं तसं यंदाही आलं
चूलबंद आवतणं, पोरंटोरं सारं बिगीनं निघालं
बरोबर घेतल्या डोळं खोल गेलेल्या विहिरी
तापलेल्या जमीनीला भेगा पडलेल्या जिव्हारी
कणा मोडकी झोपडी अन् उपाशीतापाशी नरनारी
पोट खपाटी गेलेल्या गाई म्हशी, कुत्री, मांजरी
पंगती बसल्या, वाढपी आले, धुळवडलेलं पात्र पुसलं
पण कुठं वाढलं, कुठं नाही, तो पुंडलीक वरदा झालं
कुठं तुपाशी, कुठं उपाशी, कुठं कोरडं, कुठं ओलं
ज्यांचं भरलं ते ढेकरा देत गेलं, आमचं काय चुकलं
अरे पंक्तिप्रपंच तुही करावा, कसलं वैर साधलं
कुठं अजीर्ण झालं, तर कोणी भुकेनं व्याकुळलं
अजूनही भास, येतील तुझं वाढपी, पोटभर वाढतील
दिवसरात्र डोळ्यात, वेड्या आशा अशाच फुलतील
आता तरी ऐक, चुका माझ्या सुधारतो, राग धरू नकोस
पुढच्या खेपेला तरी असा पंक्तिप्रपंच करू नकोस
© दत्तात्रय साळुंके
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Class!!
Class!!
दसांंच्या आजवर वाचलेल्या कवितांतली उजवी कविता.
का डावी?
आवडली, मस्तच!
आवडली, मस्तच!
पंक्तिप्रपंच >> जबरी! चपखल
पंक्तिप्रपंच >> जबरी! चपखल उपमा.
अर्रे खूपच छान उपमा आहे.
अर्रे खूपच छान उपमा आहे.
सुंदर.
सुंदर.
कुणाला उद्देशून आहे याचा विचार करत होतो. बहुधा पाऊस (की राजकारणी?)
उपाशी बोका
उपाशी बोका
पाउस !
हे माझ्या लक्षातच आले नाही. हो हो पाऊसच!
उपाशी बोका अनेकानेक धन्यवाद..
उपाशी बोका अनेकानेक धन्यवाद....
हो ही कविता पावसासाठी आहे.
केशवजी खूप धन्यवाद...
डावी, उजवी कशीही घ्या. तुम्हाला आवडली, पावलो पंढरी.
हपा खूप धन्यवाद...
अभिषेक आभार...
सामो खूप धन्यवाद...
सुंदर!
सुंदर!
खूप सुंदर
खूप सुंदर
SharmilaR
SharmilaR
मनीमोहोर
खूप धन्यवाद....
आवडली, मस्तच!
आवडली, मस्तच!
सुंदर पण अंतर्मुख करणारी!
सुंदर पण अंतर्मुख करणारी!
परत वाचली... सगळं चित्र उभ केलत.
खुप छान कविता..!
खुप छान कविता..!
खूपच छान !
खूपच छान !
कुमार १
कुमार १
आबा
छन्दिफन्दि
साद
तुम्हा सर्वांचे आभार...