अय्यार / बहुरूपी - तुम्हाला कोण व्हायला आवडेल ?

Submitted by ढंपस टंपू on 16 August, 2023 - 21:50

लहान असताना प्राणी खूप आवडायचे. त्यांचा इनोसन्स बघून "किती मस्त लाईफ आहे यार यांचं" असं वाटायचं.
शाळा नाही, होमवर्क नाही, अभ्यास नाही, कसलंच टेन्शन नाही. त्यावेळी पुन्हा जन्म घेता आला तर एखाद्या प्राण्याचाच असावा असं वाटायचं.
शाळेत एकदा मॅडमनी गोष्ट सांगितली कि ढगाला वाटत असतं पर्वत ताकदवान, मग पर्वत व्हावं. या गोष्टीत मग प्रत्येक प्राण्याला शक्तीवान प्राण्याची कशी भीती असते हे कळालं.
.
मग आख्खा जन्म घ्यायचं खूळ गेलं. पण त्या वेळी चंद्रकांता मालिकेचा दुसरा भाग सुरू झाला होता. त्यात रूप घेणारे अय्यार असायचे. ते हुबेहूब रूप घ्यायचे. ते वेषांतर नसायचं. तर मंत्रशक्तीने त्या माणसाचं रूप घ्यायचे. त्यात एक अय्यार राजाचं कि राणीचं रूप घेऊन दुसर्‍या अय्यारला सोडवतो. हा शॉर्टकट फार आवडायचा. तोपर्यंत प्राण्यांचं वेड कमी झालं.

मग सर्वशक्तीमान हिरोचं रूप घ्यावंसं वाटायचं. ते पण क्लार्क केंट कॅमेर्‍यात अडकतो, तसं न करता.
आता जर तशी शक्ती मिळाली तर फन म्हणून ट्रंपचं रूप घ्यायला आवडेल. ढंपस ट्रंपू असं मी ट्रंपला म्हणतो.
आयडी घेताना खालचा रफार काढला होता.

जुन्या जॅकी श्रॉफचं किंवा विनोद खन्नाचं रूप घ्यायला सुद्धा आवडेल. दोघे फारच हँडसम होते. त्यांच्या तरूण रूपात निर्मात्याकडे गेलो तर काय सांगावं एखादा पिक्चर पण मिळेल. जुना दिलीपकुमार पण आवडतो. देव आनंद फारच आवडतो. ग्रेगरी पेक सुद्धा आवडतो.
पीअर्स ब्रॉस्ननचं रूप घेता आलं तरी स्टारडम काय असतं ते अनुभवायला मिळेल. विचारवंतांचं रूप घ्यायला नाही आवडणार.

तुम्हाला कोण व्हायला आवडेल ? आणि थोडा वेळ ही शक्ती मिळाली तर काय काय कराल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users