ए आय टीम - आम्ही पाण्याचं मॉडेल टाकी मधे सोडलय. जरा पाणी येतय का चेक करा.
बॅकएंड टीम- माझ्या बाजुने चालतयं . फिटींग नीट आहे
वेबअॅप टीम - आमच्या बाजूने नळाची तोटी पण चेक केली आहे, काही लिकेज नाहीये
त्रासलेली टेस्टिंग टीम - मग नळाला पाणी का येत नाहीये?
<जरा वेळाने, परत हाक दिल्यावर >
वेबअॅप टीम- नळ सोडताना आम्ही 'खुलजा सिम सिम' असा आवाज दिला आहे पण बॅकेंडकडून 'सायमन चले जाव' असा मेसेज येतोय.
बॅकेंड टीम - पण नळाला पाणी हवं असेल तर 'खुलजा सिम सिम' असा कोडवर्ड नाहिच्चे मुळी. 'ढगाला लागली कळं' असा आहे.
वेबअॅप टीम - मग बदला तो म्हणजे नळाला पाणी येईल
बॅकेंड टीम- तुमच्या बाजूने बदल करा. आमचं प्लंबींग वापरायचं असेल तर, आम्ही सांगतोय तसाच कोडवर्ड पाठवा.
वेबअॅप टीम - ही अरेरावी झाली, आम्हाला खुलजा सिम सिम म्हटल्यावरच पाणी हवयं
तहानेने व्याकूळ प्रॉडक्ट टीम - गोंधळ पुरे झाला, चला हडल करुयात
ईतक्या वेळा सतत ते हडल करु ऐकून, एकदाचा 'हडळ' टीम असा ग्रुप तयार झाला. नळाला पाणी येईल तेव्हा येईल पण तोंडाला फेस येई पर्यंत वादासाठी मंडळी नवीन जोमाने तयार झाली.
सर्व घटना काल्पनीक तुमच्या मानण्यावर, प्रत्यक्षात काही साधर्म्य न आढळल्यास तो योगायोग समजावा!
#ऑफीसऑफीस
~भाग्यश्री
मस्तचः
मस्तचः
ह्यात अजून भरः इ आर पी टीमः पाण्याचे प्रॉडक्ट कोड तयार नाही. लवकर बॉम में टेन करून द्या.
मी: बॉम साठी पाण्याचे फॉर्मु लेशन लागेल ना. ते द्या. रि क्वेस्टर ला मेल करा.
आत दोन मटेरिअल आहेत त्यांचे पण प्रॉड्क्ट कोड आहे का ते बघुन घ्या.
कस्टमर सर्विसः पाण्याचे कोड व एस के यु कोड कधी तयार होईल? मला ऑर्डर एंट्री करायची आहे.
सेल्सः अरे न्यु विन आहे तीन दिवसात सप्ल्याय करायचा आहे. लवकर कोड द्या.
प्रॉडक्षनः टाकी साफ करायला घेतली आहे. मग गण पतीची सुट्टी चार दिवस आम्ही गावी जाणार.
सांपलिन्ग टीमः आम्हाला सांपलिन्ग साठी दोन किलो द्या.
कोणीतरी: रिक्वेस्ट टाका ना.
कस्टमरः पाणी पाणी ................
धमाल आहे हे. "हडळ" हे सुपरलोल
धमाल आहे हे. "हडळ" हे सुपरलोल आहे
टाकीत पाणी न येण्याचे उदाहरण दिले आहे. टाकी फुटून पाणी बाहेर पडण्याचे उदाहरण असते तर आपोआप स्क्रम/अजाइल ची काहींच्या नकळत, तर इतर काही तयार लोकांनी नवीन पद्धत पचवून तिला जुन्याच वाटेवर वळवल्याने वॉटरफॉल मेथड कशी होते याचे चपखल उदाहरण झाले असते
हाहा मस्त... गाडी कोड वर्ड वर
हाहा मस्त... गाडी कोड वर्ड वर आटकली आहे. अजुन ईतर बग्ज यायचे आहेत...
हडळ मस्त ...लोल