हेअर स्ट्रेटनर ब्रश/आयर्न काय वापरावे?

Submitted by MazeMan on 21 July, 2023 - 04:51

केस नीट सरळ दिसावेत यासाठी स्ट्रेटनर वापरायचा इरादा आहे.
महिन्यातून एकदा/दोनदा वापरण्यासाठी चांगला ब्रँड सुचवा.

घरात स्ट्रेटनिंग आयर्न/ब्रश वापरता का? किती वेळा वापरता?
फिलिप्स, वेगा, हॅवेल्स वगैरे ब्रॅण्ड्स दिसताहेत अमेझॉनवर. त्यामुळे कन्फयुज झाले आहे.
हिट प्रोटेक्शन प्रोडक्ट्स वापरता का? कोणती वापरता?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शाळेत असताना मी कंगवा वापरायचो, त्यानंतर गेली कित्येक वर्षे कंगव्याच्या नावावर चार बोटे केसात खुपसतो आणि मोकळा होतो. हेअर सरळ करायला असले काही उपकरणं वापरणे यापासून मी कोसो दूर आहे. तरी केसासंबंधित प्रोडक्ट असल्याने जाणून घेण्यास उत्सुक देखील आहे. प्रतिसाद वाचतोय...

Brush kahi useful nahi ahe. Mi ghetla hota philips ch. Hair smoothning krun ghetl tr one and half year rahat effect. That is better.

Mr. RUNMESH THAT IS FOR LADIES. >>>> का बरं? पुरुष देखील looks बद्दल जागरूक असतात. आणि सगळ्या beauty treatments करून घेतात. हल्ली पुरुष ही केस वाढवतात आणि कित्येक जणांचे मस्त silky आणि straight केस असतात. त्यासाठी straighting करत असतील की. Happy

मीरा.. on 21 July, 2023 -
Aho tai, jyani question vicharla ahe na tya female ahet so I think like that
But tyani nahi kahi oppose kel, then why u?

5 मिनिटात सरळ वगैरे नाही होत. त्यासाठी स्मूथनिंग, केराटीन , सिस्टीन, नॅनो प्लास्ट वगैरे ट्रीटमेंट कराव्या लागतात.
आयर्न ने केस खूप डॅमेज होतात. रोज वापरु नये. हेअर द्रायर पण लांबून मारावा. तो ही रेग्युलर बेसिस वर नाहीच.
तरी आयर्न घ्यायची असेल तर फिलिप्स ची चांगली आहे. आणि ड्रायर माझ्याकडे हॅवेल्स चा आहे.
आयर्निंग करताना नेहमी केसांवर सिरम लावून च आयर्न करावी .

@ urmila mhatre

Hair straighting करणारे काही पुरुष ओळखीत आणि आजूबाजूला पाहण्यात आहेत.
माझे म्हणाल तर माझे केस त्या लायकीचे नाहीत. अन्यथा ट्राय करायला आवडले असते.
तरी माझा लांब केस असलेल्या पुरुषांचा धागा होता. तो चेक करू शकता. त्यावरून मला या विषयात रस का आहे हे समजून येईल Happy

लांब आणि दाट केसांचे पुरुष (विडिओसह)
https://www.maayboli.com/node/80232

@Runmesh,
Mazya pn mahitit ahet but sarvana suit nahi hot, but still tumhala aavdt asel tr try kru shkta tumhi pn.
Mi nehmich krte but hair smoothning ha option mla chan vatto.
Reference sathi photo
IMG-20230622-WA0020.jpg

Urmila Gr8 !
केस खूप छान आहेत तुमचे Happy

सर्वांना धन्यवाद

माझे केस सरळ आहेत. मला पर्मनंट स्ट्रेटनिंग/ स्मुदनिंग करायची गरज नाही.
नेहमी क्लचमधे बांधून ठेवते म्हणून कधीतरी स्लीक लूकसाठी हवाय ब्रश किंवा आयर्न. तसं पार्लरमधे जाऊन ब्लो ड्राय करणे हा ऑप्शन आहेच. पण दरवेळी जमतंच असं नाही म्हणून.

@अनिश्का >>> कोणते सिरम वापरता?

माझे केस कुरळे आहेत, फिलीप चा हेयर स्ट्रेटनर वापरते..अगदी क्वचित ३/४ महिन्या तून एखाद वेळेस पार्टी/पुजे ला.
हीट मुळे केस तुटतात, रफ होतात. अ‍ॅलोवेरा जेल लाऊन मग आयर्न फिरवू शकता पण रेग्युलर वापर करणे टाळा.

माझ्या मैत्रिणींचे केस हायलाईट, हेयर ब्लीच & कलर, पर्म, सरळ करणे याने पार वाट लागली आहे. शेपटी सारखे उरलेत.. Sad

एका दिवसासाठी पार्लर मधून आयर्न करून घेतले. तिने सिरम लावले होते आधी पण तरी केस खूप तुटले. त्यातून निघणाऱ्या वाफा बघून भीती वाटत होती. माझे केस कुरळे आहेत आणि दोन चार तासाने खालून केस परत आपल्या कुरळेपणाकडे वळायला लागले. परत करेन असे वाटत नाही.

चंपा सेम अनुभव. Sad
म्हणुन स्ट्रेटनर घरीच आणला, क्वचित वापरायला. घरी इतके ताणत नाही आपण तर कमी तुटतात केस.
३ दिवस केस धुवे पर्यंत ईफेक्ट राहतो.