गॉसिप जास्त कोण करतं ? स्त्रिया कि पुरूष ?

Submitted by ढंपस टंपू on 18 July, 2023 - 23:17

बाईपण भारी चित्रपटातल्या एका अभिनेत्रीने बायका उगीच बदनाम असतात, पुरूषच जास्त गॉसिप करतात असे म्हटले आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिल्पा नवलकर हिने बाईपण भारी देवा या चित्रपटात केतकी हे पात्र साकारलं आहे. तिच्या पात्राचे सर्वत्र कौतुकही पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने बायकांपेक्षा पुरुष जास्त गॉसिप करतात, असे म्हटले आहे.

“बाई आणि गॉसिप्स यांचा घनिष्ट संबंध असतो, असं म्हटलं जातं. पण मला असं अजिबात वाटत नाही. चार पुरुष एकत्र आले तर त्यांच्यात जास्त गॉसिप्स होतात. आमच्या नवऱ्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असतं. बायका विनाकारण बदनाम झाल्या आहेत”, असे ती म्हणाली.

“आम्ही सहाजणी जेव्हा एकत्र असायचो, गप्पा मारायचो. तेव्हा आम्ही सहाजणी सातव्या माणसाबद्दल बोलायचो नाही. आम्ही आमच्याबद्दलच बोलायचो. एखाद्या घटनेवर विविध मत मांडायचो. तू ही भाजी कशी बनवते, फोडणी कशी देते, यावर गप्पा मारतो. त्यामुळे आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये गप्पा मारत असतो. गॉसिप्स खरंच होत नाही. पण तेच जेव्हा दोन पुरुष बसतात, तेव्हा ते तिसऱ्या माणसाबद्दलच बोलतात”, असेही शिल्पाने सांगितले.

https://www.loksatta.com/manoranjan/marathi-cinema/baipan-bhari-deva-mar...

हे खरे वाटते का ? दोघी बायका तिसरीबद्दल बोलत नाहीत हे खरे असेल का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरूषांना गप्पा मारता येत नाहीत. उगी बोजड विषय काढून एकमेकांचं डोकं बधिर करुन टाकतात. मनोरंजक गप्पा मारणारे पुरूष कमी असतात.
पुरूष जमले कि राजकारण, क्रिकेट वर बोलतात. गॉसिप सहसा बघितलेलं नाही. एखादा करत असेल तर त्याला टाळतात.
गावात चालायचं पण आता तिथेही खूप फरक पडलाय.
पुण्यातले एक मुस्लिम उद्योगपती, शिक्षणसम्राट आहेत. ते म्हणाले होते कि "जो आदमी तिसरे कि बुराई करता है. वो मेरे काम का नही है. तुम्हारा क्या प्रपोजल है उतना ही बोलो".

गॉसिप करणारे पुरूष असतील पण माझा संबंध जास्त आला नाही.

मला लंच टेबल वर सात आठ बायकात एकटा पुरुष असण्याचा बराच अनुभव आहे. नक्कीच बायका जास्त गॉसिप करतात. पण मजाही त्यातच जास्त येते.

काही पुरुष बायकी असतात ते जास्त गॉसिप करतात
काही बायका पुरुषी असतात ते कमी गॉसिप करतात
Inverse is true as well

हपिसात / ब्यांकेत / कॉलेजातल्या सर्वात सुंदर महिलेने त्याच संस्थेतल्या एखाद्या पुरूषासोबत गाडीवरून /गाडीतून जायला यायला सुरूवात केली तर मात्र इतरांचे कान ताठ होतात.
त्या वेळी मग जेंडर इक्विलिटीचा अनुभव येतो.

काही काही जण तर त्या दोन अबोध जिवाचा पिच्छाही करतात. त्या अश्राप जिवांना याची कल्पना नसते. कदाचित निखळ मैत्री सुद्धा असू शकते, किंवा थोडंसं जास्त असू शकत.

पण बेदर्द जमाना मात्र दोघांवर एकच शिक्का मारून त्यांच्या घरी सुद्धा कळवायची व्यवस्था करतो.

अशा वेळी कोण जास्त गॉसिप करतं हे सांगता येत नाही. दोघेही खतरनाकच.

__/\__

तुम्ही व त्या आपल्या एका सरांनी पाडलेल्या धाग्यांची संख्या पाहता एकतर तुम्ही पुरुष आयडीतल्या स्त्री आहात, किंवा मग पुरुष एकंदरीत जास्त गॉसिपी आहेत, हा निष्कर्ष निघतो.