भारताच्या चंद्रयानाला मुंहतोड जवाब

Submitted by ढंपस टंपू on 16 July, 2023 - 22:07

भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेमुळे पाकिस्तानात नैराश्याचे वातावरण आहे. पाकिस्तान सरकारला जनता दूषणे देताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून काही बुद्धीमान पाकिस्तान्यांनी स्वतःचे चांद्रयान बनवून त्याचे प्रक्षेपण केले. हे भारताला सडेतोड उत्तर असल्याचे म्हटले जात आहे.
व्हिडीओत पाकिस्तानचे यान दिसत आहे.
https://www.youtube.com/watch?v=LOiSVTpU5vk

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कीव करावी शी वाटते ज्यांनी ही पोस्ट केली आहे.
पाकिस्तान च लोकसंख्या भारताच्या फक्त यूपी राज्य इतकी आहे.
त्याचा आकार भारतातील मोठ्या दोन राज्य न इतकाच आहे..
त्या देशाशी भारताची तुलना करून स्वतःचे हसू करून घेतले जात आहे.
तुलना करायची असेल तर दुसरे शत्रू राष्ट्र आणि सम बल अशा चीन शी करा.
आपण चीन च्या माना नी पाकिस्तान पेक्षा पण मागास आहोत हे सिद्ध होईल
खोटी प्रतिष्ठा काही कामाची नाही.

हे सर्व अमेरिका नी खूप पूर्वीच केले आहे.
8, दिवस तीन तासात माणसाला चंद्र वर नेवून परत पृथ्वी वर आणले आहे.
खोटी प्रतिष्ठा आणि खोटा अभिमान खूप धोकादायक .
आपले पूर्वज महान संशोधक होते ब्रह्मास्त्र होती त्यांच्या कडे .
पण आज आपली स्थिती काय आहे.
साधे रेल्वे ॲप धड रेल्वे कुठे आहे हे अचूक दाखवू शकत नाही.

त्यांच्या पेक्षा पाकिस्तानी हुशार होते आणि आहेत .
ते झाडावर चढून चंद्राचा जन्म बघतात त्या नंतरच बकरी ईद जाहीर करतात.
जोक नाही , त्यांच्या एक्स मिनिस्टर ने interview देताना सांगितलय .....

लै रटाळ आयुष्य जगता राव तुम्ही !
त्या पुलंच्या कॅरेक्टर चे नावच विसरलो , आठवल्यावर बघू Happy

हे सर्व अमेरिका नी खूप पूर्वीच केले आहे.
8, दिवस तीन तासात माणसाला चंद्र वर नेवून परत पृथ्वी वर आणले आहे.

नवीन Submitted by Hemant 333 on 17 July, 2023 - 14:10

मग अमेरिकेने त्यानंतर इतक्या वर्षात एकही चंद्र मोहीम का नाही केली? ना यान ना माणूस, अमेरिकेची आधीची चांद्रमोहीम संशयास्पद वाटते

मग अमेरिकेने त्यानंतर इतक्या वर्षात एकही चंद्र मोहीम का नाही केली? >>> त्यांनी फ्युचर मधे जाऊन पाहिले तर मोदीजींनी गुजरात ते चंद्रमा अशी बुलेट ट्रेन सुरू केलेली. मग नादच सोडला.

एक एक देश का चंद्र, मंगळ ह्यांच्या यात्रा करत आहेत.

नासा , इस्रो,चीन,जपान,रशिया ह्यांनी अवकाश मोहिमा केल्या .
जे काही माहीत पडले असेल त्या मधील टाकावू जगाला सांगितले.
महत्वाचे कडी कुलापात बंद करून ठेवले .
हे कारण असावे का?
की त्या मुळे सर्व देश मिळून एकच अवकाश मोहीम करत नाहीत .
त्या मागे.

अमेरिका चंद्रावर गेली तेव्हा तिथे एक एलियन होता. त्याला पकडून यांनी पृथ्वीवर आणलाय. आता त्या एलियनचे सहकारी अमेरिकेला धमकी देत आहेत. लवकरच त्या एलियनला सोडला नाही तर ते पृथ्वीवर हल्ला करणार आहेत. म्हणून अमेरिका परत चंद्रावर जायला घाबरते

चांद्रयान मध्य दुपारच्या सुमारास सोडले. तेव्हा सूर्य वर असतो. आणि यानही वर झेपावते. इतके मोठे बल वापरुन पृथ्वीवरून रॉकेट सोडले जाते तेव्हा न्यूटनच्या नियमानुसार पृथ्वीवर सुद्धा विरुद्ध दिशेने बल निर्माण होते, त्याचा परिणाम म्हणुन पृथ्वी सूर्यापासून थोडी दूर ढकलली जाते.
त्यामुळे पृथ्वीवरील ग्लोबल वार्मिंग कमी होण्यास मदत होईल.

जर पृथ्वी जास्तच दूर ढकलल्या गेली आणि चेन्नई मध्ये बर्फ पडू लागला की मध्य रात्री यान सोडण्यात येईल. तेव्हा सूर्य विरुद्ध बाजूला असल्याने पृथ्वी परत सूर्याच्या दिशेने थोडी सरकेलं आणि तपमान थोडे वाढेल.