मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

Submitted by हस्तर on 14 July, 2023 - 08:58

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फडणवीस आणि शिंदे दोघे बहुतेक केंद्रात जाणार >> राज्यात फडण२० च्या कुवतीचा एकही नेता भाजप मधे नाही. शिंदे गटाचही तसंच आहे

भरत चित्र छान आणि चपखल

शिंदेगुटाचा पार कुत्रा करून टाकलाय. ना घर का ना घाट का.

फडणवीस इतक्यात केंद्रात जातील असे वाटत नाही.
मुख्यमंत्रीपदाची एखादी टर्म पूर्ण करुनच जातील आणि केंद्रात जातील तेंव्हा एखाद्या तगड्या प्रोफाइलवरच जातील Happy
फडणवीसांनंतर महाराष्ट्र भाजपाचे नेतृत्व बहुतेक आशिष शेलारांकडे येईल

फ२० म्हणत असतील,
काठी न घोंगडे घेऊं द्या की रं, मला बी मंत्री बनवा की रं|

सर्व बायकांनी अजून निषेध कसा प्रकट केला नाही? एव्हढ्या मोठ्या मंत्रिमंडळात फक्त एक स्त्री?

फडणवीसांनंतर महाराष्ट्र भाजपाचे नेतृत्व बहुतेक आशिष शेलारांकडे येईल ## भाजपची अधोगती व्हायला वेळ नाही लागणार

भरत - चित्र बोलके आहे. गोवा राहिले...

त्या निमीत्ताने शिंदे गटाचे भारत दर्शन झाले. अजित पवार गटाला तसे काही नाही मिळाले म्हणून अर्थ/ कृषी अशी महत्वाची खाती दिली आणि बॅलन्स केले. खाती कमी आणि इच्छुक जास्त अशी सध्याची परिस्थिती आहे.

महाराष्ट्र राज्याबद्दल आणि जनतेबद्दल, who cares?