आभाळाच्या आरशात!

Submitted by sanjana25 on 15 June, 2023 - 14:42

आभाळाच्या आरशात
वेगळीच जादू असते
सुंदर दिसतात गोष्टी
स्वप्नवत सारे भासते

त्या आरशाची चमक
काही निराळीच आहे
अंतरंगाच्या मोरपिसांचे
गुज त्यात दडले आहे

स्वत:चे सौंदर्य दिसते
त्या आरशात बघता
भान हरपून जाते सारे
आरपार त्यात पाहता

रोज दिसतो हा आरसा
अन नकळत मन गुंतते
मृगजळाच्या सौंदर्यात
अनावधानाने हरवते

भ्रम असावा कदाचित
इतकं सुंदर सगळं नसतं
आभाळाचं छत्र तर
सर्वांसाठी खुलं असतं

त्या निष्पाप डोळ्यांसाठी
आरशाची उपमा खास
कारण सर्वात सुंदर आहे
हा जगावेगळा आभास!

Group content visibility: 
Use group defaults

छान....