Submitted by द्वैत on 14 June, 2023 - 05:54
ओसाड दुपारी
येना परतून
विसावेल ऊन, पदराशी...
जोडव्याचा जोड
अडवेल काय?
कमळाचे पाय, निघाले की...
कपाळीचे कुंकू
झाकेल का खूण?
प्राक्तनाचे व्रण, ओढलेले...
वळून बघता
तुटलेली मने
बिलोरी कंकणे, वाजतील...
पाण्यात दिसता
तुझे प्रतिबिंब
आसवांचे टिंब, पुसतील...
ओशाळल्या वडा
अवगत सारे
वासंतिक वारे, गेले कोठे...
दुःख सोसल्याने
टळेल का ब्याद?
अंतरीचा नाद, शमवून...
अशा आर्तवेळी
होऊन लाचार,
तुझा व्यभिचार, करी धन्य!!!
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त..!!
जबरदस्त..!!
शेवटचे कडवे खासच..
वा खासच !
वा खासच !
कमाल!
कमाल!
जबरी!
जबरी!
धन्यवाद
धन्यवाद
वा! सुंदर. अफलातून.
वा! सुंदर. अफलातून.
बाप रे अशक्य!!!
बाप रे
अशक्य!!!
सुंदर...!
सुंदर...!
तुमच्या कविता या पुन्हा पुन्हा वाचायला व ते क्षण पुन्हा पुन्हा जगायला लिहिलेल्या असतात.
धन्यवाद सामो, धन्यवाद अस्मिता
धन्यवाद सामो, धन्यवाद अस्मिता
अतिशय सुंदर शब्दांत लिहलीयं
अतिशय सुंदर शब्दांत लिहलीयं कविता...
सुरेख
सुरेख
शपथ! जबरदस्त
शपथ!
जबरदस्त