कोलाहलाच्या काठाशी

Submitted by अनन्त्_यात्री on 3 June, 2023 - 11:06

कोलाहलाच्या काठाशी
जरी झालो सैरभैर
अनाहताची नि:शब्द
साद देते मला धीर

क्षणोक्षणी लाट येते
विकराळ वास्तवाची
पण भुलवी गंभीर
गाज कालप्रवाहाची

डोळे दिपले कधीचे
झगझगत्या दिव्यांनी
खुणविते त्यातूनही
एक दूरची चांदणी

Group content visibility: 
Use group defaults

>>>>डोळे दिपले कधीचे
झगझगत्या दिव्यांनी
खुणविते त्यातूनही
एक दूरची चांदणी

खालची कमेन्ट कविस उद्देश्युन नाही -
होय!!! वयानुसार स्लो डाउन होतो मनुष्य. झगमगाट नकोसा वाटतो. स्वानुभवाचे बोल.

छान