माझिया जातीचे मज भेटो कोणी

Submitted by सामो on 30 May, 2023 - 17:55

काही विस्कळीत विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या पूर्वीच्या एका लेखातील काही भाग उतरवलेला आहे. कृपया सांभाळून घ्यावे.

कसे कळते की एखादी व्यक्ती आपल्या ट्राइबची आहे? एखादं शिंग फुंकून चेहऱ्यावरती, अंगावरती रंगाचे पट्टे माखूनआपल्या ट्राइबची व्यक्ती "हुला हो....हुला हु" क‌र‌त नाचत येते की पाहिल्यांदा सबकॉन्शस लेव्हलवर एका stirring (soul stirring ) जाणवते कि भूकंप होतो की फासे पडत जातात, karma unfolds in some mysterious ways? आपल्याला आपली ट्राईब कशी सापडते? समान शील व्यसनेषु = आपली टोळी, आपला गट, आपले मैत्र.

Unrequited Love - हा शब्द सापडायला बरीच बरीच वर्षे जावी लागली मात्र हा शब्द अनुभवायला कॉलेजची काही वर्षे पुरेसे होते.
Unrequited Love म्हणजे, आपण कोणावर तरी केलेले असे प्रेम, ज्याचा परतावा मिळत नाही. आपण झिडकारले जातो किंवा त्या व्यक्तीला, आपण असून नसल्यासारखे असतो. म्हणजे आपण अदॄष्यच असतो म्हणा ना. झिडकारले जाण्याकरता आधी प्रेमाची कबूली द्यावी लागते. तेवढी हिंमतच माझ्यात कधी नव्हती. कारण 'नाही' ऐकण्याची तयारी नव्हती. पण नाही फक्त शब्दाने बोलले जाते का? कित्येक पद्धती आहेत 'नाही' म्हणण्याच्या, दुसर्‍याला नकार देण्याच्या.
असे हे Unrequited Love पहील्यांदा अनुभवले ते कॉलेजात आणि नंतर वेगवेगळ्या पोशाखात ते भेटत राहीले. उदा - आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये सामिल करुन न घेणे. एखाद्या कम्युनिटीत आपला शिरकाव होणे अशक्य होउन बसणे. व्हरमाँटला माझ्या सहकार्‍यांचा एक ग्रूप होता ज्याच्यात ते सहकारी व त्यांच्या पत्नी असे लोक मिसळत, उत्सव साजरे कर. कधी कोणाचा बेबी शॉवर तर कोणाकडे जेवायला बोलावणे तर कधी पोंगल, संक्रांत अथवा नाताळ. पण हळूहळू माझ्या लक्षात आले की माझ्या कलिग्ज्चे पत्नी मंडळ एकमेकीत जितके मोकळेपणे बोले तितके ते माझ्याशी बोलत नसत. हळूहळू ते लक्षात येणे तीव्रतर होत गेले आणि एकदा मी जायचे बंद केले. इथे कोणी डायरेक्टाली मला येऊ नकोस सांगीतले नाही पण इन्डायरेक्टली मात्र तसे होत गेले. मग अनेक प्रश्न मनात उमटतात. मला झक मारायला कोणी सांगीतली होती? असे काय सोने लागलेले होते की मी प्रयत्न करत राहीले? की एखादी गोष्ट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिची असोशी रहाते, टोकदार होत जाते?
हे असे प्रसंग वारंवार येतात.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतं? आयुष्यात प्रायॉरिटीज देखील बदलत असतात. पहिला नंबर मिळवायचा असतो त्याची जागा नोकरी मिळवायची , जोडीदार मिळवायचायं, घर घ्यायचे, बेंक बॅलन्स फुगवायचा, मुलांना वाढवायचं, नाना प्रायॉरिटीज. पण हे सारे बदल, बदलावं बाह्य जगतात होत असतात, मित्र-मैत्रिणी येत जात असतात. एखादे नाते गहिरे होता असते तर एखादे नाते आयुष्यातून निघून जात असते. पण हे बदल पहाणारा हा जो "मी" आहे त्याच्यात काय बदल घडत असतात? लहानपणी सुद्धा ज्या उत्कटतेने मला सवंगड्यानी मला स्वीकारावे मला सामावून घ्यावे असे वाटतं असते तितक्याच उत्कटतेने आजही तेच वाटते. मी एकटा पडू नये, मला खेळात घ्या, मला सामावून घ्या. लहानपणी ज्या तीव्रतेने मला प्रेमाची आस जाणवे त्याच असोशीने आजही प्रेमाची ओढ जाणवत असते. कदाचित लहानपणी मी आत्मकेंद्री असेन‌ आज नसते? - खरंच असे होते का? का मी त्या स्वभावाविशेषावरती अलगद पांघरूण घालून ते दडवायला शिकते ? असे होते का की प्रत्येक वर्षासरशी आपण आपली खरी ओढ , आस लपवण्यात तरबेज होत जातो? हे अगदी १०० % खरे आहे कि आपण विविध क्षेत्रात श्रीमंत होत असतो. लहानपणी फक्त आई-बाबा, आज्जी -आजोबा हे जग असलेले आपण आता कितीतरी नव्या संबोधनांनी , नात्यांनी समृद्ध होत असतो - आपण आई-बाबा, काका,काकू, मामा, मामी अगदी आज्जी, आजोबा हि नाती भूषवू लागतो पण ..... कुठेतरी आपण तेच १८-२५ च्या मधले असतो. आरशात आपण पहातो टक्कल पडलेले असते, पोट सुटलेले असते, क्वचित (ऑर नॉट सो क्वचित) बेढबहि झालेलो असतो पण आपल्या मनात आपण तेच १८-२५ मधील असतो. नात्यात करकचून बांधलेलो आपण मुखवटे लावून वावरण्यात तरबेज तर होता नाही ना? पत्नी, सून, आई, वडील, नवरा, बॉस, सहकारी असे कितीतरी मुखवटे. सासूबाईपुढे अदबीने वागतो, नवर्याला क्रश सांगू धजत नाही, मुलींपुढे तर अगदी जपून आब राखून वागत असतो. अशा वेळी किती प्रकर्षाने वाटते, असे कोणीतरी हवे ज्या व्यक्तीपुढे काय वाट्टेल ते बोलता यावे, मनातले सांगता यावे, अगदी अग्ली, कुरूप होता यावे, आपली सारी ऑब्सेशन्स, कम्पल्शन्स, पूवर्वजन्माच्या संस्कारांचे रेसिड्यूज उघड करता यावे. असे मैत्र जे आपल्या ट्राइबचे असावे. आपल्यासारख्या idiosyncrasies (लकबी, वैशिष्ट्ये) असलेले, आपल्या कुरुपतेला न हसणारे असावे. बरं अशी इन्व्हेस्टड्सही नातीही नको जसा नवरा , मुलगी, आई, नणंद , भावजय व तत्सम अन्य नाती . कारण इन्व्हेस्टेड असल्याने आपल्या दोषाकडे हे लोक सहानुभूतीने पाहू शकत नाहीत. एका कम्फर्टेबल त्रयस्थ दृष्टीचा अभाव त्यांच्यात असतो. ते आपल्या ट्राईबचे नसतात ते आपल्या आयुष्याचा पाया असतात, फाउंडेशन असतात पण आपल्या ट्राईबचे नसतात. ते इंडिफरंट, अगदी त्रयस्थ मैत्र होउ शकत नाहीत. त्यात दोष कोणाचाच नसतो. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. जरा त्या मर्यादा सांभाळून घेतल्या नाहीत तर ते नातंही आपल्याला सांभाळून घेत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा कि असे मनाचे पापुद्रे अन पापुद्रे उसवुन, व्यक्त सर्वांपूढे होता येत नाही. असे नाते प्रत्येकाला सापडतेच असे नाही. इन फॅक्ट प्रत्येकाला कदाचित तशा नात्याची गरजही वाटतं नसेल. पण काहींना तशा मैत्राची, काउन्सिलरची,एका श्रोत्यांची , सर्वाहारी, सर्वसमावेशक perennial मैत्रीची आस असते. परत परत त्याचा प्रश्नापाशी मी अडखळत असे, मला कसे कळेल कि अमुक एक व्यक्ती माझया ट्राइबची आहे? पण जसजसे वय वाढत गेले मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळत गेले. आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होते?- या प्रश्नाचे एक उत्तर हे आहे कि आपली टोळी (ट्राइब) आपल्याला सापडत जाते. आणि नाही सापडली तर मात्र एकटेपणही येत जाते.
अल्झाइमर्स होउ नये याकरता काही पथ्ये आहेत - पैकी एक म्हणजे तुम्ही असे मैत्र जमवा ज्यांच्याशी संवाद साधू शकाल आणि त्यांच्या संपर्कात रहा. बी सोशली अ‍ॅक्टिव्ह. परंतु हे अचानक वॄद्धावस्थेत थोडी ना मिळेल? आपल्यालाच नाती जपत, तडजोडी करत तर खूपदा अनेक क्षण हे आनंदाने साजरे करत आपले मैत्र जोडायचे असते. त्याची तरतूद आधीपासून करायची असते. या वयात मला माझी मामी, काकू, आत्या, मावशी खूप आवडतात. पूर्वी मला त्यांच्यात व माझ्यात फार अंतर आहे असे वाटे. आता अजिबात वाटत नाही. जसजसे वय वाढते तसतसे मनातील , प्रगल्भतेतील अंतर कमी होत जाते. मी तर आता प्रत्येक नात्याकडे थेराप्युटिक दॄष्टीकोनातून पाहू लागले आहे. सोशल मिडीयाने एक नक्की केले - फक्त हवी असलेली नाती जपण्याची एक मस्त मुभा दिली. मला, हे असे आंबटगोड नातेसंबंध विलक्षण ओढाळ वाटतात. समटाइम्स यु क्लिक समटाइम्स नॉट. पण या रस्सीखेच खेळातच खूप मजा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख.

हवं तिथं पॉज करून हवं तिथं प्ले करता येणाऱ्या नात्यात प्रेम असतं.
>>> काही माणसे भेटल्यावर मला हे मैत्रीच्या बाबतीत वाटले आणि ते खरेही ठरले. पण असा पॉज करण्याची वेळ अशा माणसासोबत येऊच नये.

बरेचसे नशिबाचे >> मला तर वाटते अशी माणसे भेटणे हाच नशिबाचा भाग आहे. टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागू नये, संबंध ऑर्गॅनिकली वृद्धिंगत होत जावे अशी माझी भाबडी अपेक्षा असते, चूक आहे माहिती असूनही.

>>>>>> संबंध ऑर्गॅनिकली वृद्धिंगत होत जावे
होय आयडियली. पण परदेशी संधीचा अभाव अक्षरक्षः बरेचदा खडखडाट असतो. अशा वेळी आवर्जुन प्रयत्न करावे लागतात.
माझेमन प्रतिसादाकरता, धन्यवाद.

>>>पण परदेशी संधीचा अभाव अक्षरक्षः बरेचदा खडखडाट असतो. अशा वेळी आवर्जुन प्रयत्न करावे लागतात.>>>
मला वाटतं आपल्यालाच आपली सोबत असते कधीकधी... गर्दीतही आपण अंशत: एकटेच असतो.
हे जरा ऐका, पटतयका बघा...
https://youtu.be/7dv__LniEJA

>>>नाही पटलं.>>>>
नेहमी नाही कधीतरी अशी वेळ येतेच तेव्हा अत्त दीप भव..
सगळी दारे मिटतात तेव्हा
आपणच आपला मित्र व्हावे
हे कवितेतले बोल आहेत.... आणि मला ते पटतं.

अत्त दीप भव - हा संदेश मला अतिशय आवडतो. अतिशय.
अनेक पॉवरफुल मंत्रांपैकी हा एक मंत्र आहे.
https://www.youtube.com/watch?v=bW8I7i78KZo
दसा प्लीज हे गाणे जरुर ऐका. आत्ता माझ्या कॉम्पवरती रीपीट मोडवर!!!

चिंतन आवडलं..

सो मि च्या ह्या आभासी जगात मला असाच एक बंगाली मित्र मिळालाय. अगदी सुरुवातीला भाषा कॉमन नसल्यामुळे बोलताना समजून घेताना विचित्र विनोदही झाले.. उडालेल्या गोंधळामुळे भरपूर हसलो.. हा मित्र भारतातलाच असल्यामुळे कुठल्या सिच्युएशनमधे मला नक्की काय बोलायचं आहे हे समजून घेऊ शकला. आता इंटरॅक्ट होताना कधी कधी जाणवत, हा भाषेचा अडसर दूर झालाय. जे बोलायचं आहे ते जसंच्या तसं एकमेकांपर्यत पोहचतंय..
घरात ऑकवर्ड वाटणाऱ्या विषयाची अगदी चिरफाड होईपर्यंत चर्चा/ उहापोह केलाय तर कधी बोलायला काही टॉपिक नसतानाही एकमेकांच बोलणं तासनतास ऐकूही शकतोय..

अशा अनोळखी(?) व्यक्तीशी मैत्री करता आल्याचा मला झालेला फायदे तोटे म्हणजे
१)एक जाणता, वयाने आणि अनुभवाने मोठा असणारा व्यक्ती मला माझं मन रित करण्याचा कोपरा म्हणून लाभलाय..

२) माझे flaws मी कोणाशी तरी मनमोकळेपणाने शेअर करु शकतेय..

३)माझ्याकडुन त्या त्या वयात झालेल्या चुका ही जज न करता डिसकस मला करता येताहेत.

४)बोलताना हा मित्र कधी कधी मित्र कमी आणि आरसा म्हणून समोर उभा ठाकतो. आणि माझ्यातले बरे वाईट गुण मला तोंडावर सांगितले जातात. यामुळे कुठेतरी स्वतःला चारचौघात improve करायला मदत मिळतेय..

तोटे
१) मी आजवर जे काही शेअर केलेल आहे त्याच्यावर माझा शून्य कंट्रोल असणं कधी कधी मला धोक्याचं लक्षण वाटत.

२) उद्या जर लग्न झालं तर या मैत्रीचा परिणाम माझ्या खऱ्या आयुष्यावर कितपत होईल हे समजत नाहीय.

(आता प्रतिसाद परत वाचताना मला तोचतोचपणा जाणवतोय.. अन् प्रतिसाद धाग्याला अनुसरुन नसेल तर सांगा.. प्रतिसाद उडवता येईल..)

खूप मस्त लेख सामो !
बरेच ठिकाणी अगदी अगदी झाले..
मी मुळातच माणसांमध्ये मिसळत नसल्याने मला हा अनुभव फार आहे.
त्यामुळे मी माझा आनंद आत्मकेंद्रीत आयुष्य जगण्यात शोधतो. आपली स्पेस आपण स्वतः मिळवा आपल्याच जगात. दुसऱ्याच्या सर्कलचा भाग होता नाही आले, तर आपले एक सर्कल आखून त्यात खुश रहा Happy

सुंदरच चिंतन मांडलंय सामो. तुझ्या लिखाणात किती वैविध्य असतं. इतकं खोलवर विचार करून लिहिलं आहे, की बारीकसारीक मानसिक भावनिक आंदोलनं बरोब्बर हेरली आहेत.
प्रतिसादही छान, विचार करण्यासारखे आहेत.

सामो , प्रतिसाद तसा तुम्ही लिहिलेल्या विषयाला धरून नाही पण के वि बेलसरे यांची काही निरुपणं यूट्यूब वर आहेत . जर तुम्ही यापूर्वी ऐकली नसतील तर एक ट्राय देऊन पाहा , तुम्हाला आवडतील असं मला वाटतं .

https://youtu.be/moxGZu5qG8I

प्रत्येक ग्रुपने आपल्याला सामावुन घेतलेच पाहीजे, प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे - हा अट्टाहास पुरता मोडून निघणं आणि तो स्वीकारता येणे म्हणजे प्रौढ होणं. आपण कोणालाही बदलू शकत नाही. बदलाची सुरुवात स्वतःपासून करणे 'एवढेच' आपल्या हातात असते. मुद्दाम अवतरणात टाकला तो शब्द. कारण ते एवढेच नसते, त्या निर्णयात आपले, आयुष्य बदलून टाकण्याची ताकद असते.
गो विथ द फ्लो - अनुगच्छतु प्रवाहं! केट पेरीचा टॅटु.
.
आज लेख परत वाचला.

Pages