छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते कुणाल शुक्ला यांनी नरेंद्र मोदींच्या 9 वर्षांच्या शासनाबद्दल एक खुले पत्र लिहिले आहे---

Submitted by हस्तर on 28 May, 2023 - 08:48

छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते कुणाल शुक्ला यांनी नरेंद्र मोदींच्या 9 वर्षांच्या शासनाबद्दल एक खुले पत्र लिहिले आहे---

पत्रात त्यांनी 50 प्रश्न विचारले आहेत, ज्यांचे उत्तर व्हॉट्सॲप विद्यापीठाकडेही नाही .

त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांकडून उत्तर मागितले आहे . ही एक अशक्य गोष्ट आहे !

तरीही प्रश्न पहा , तपासून पहा आणि विनाशाच्या दरम्यान प्रचार समजून घ्या :

1- स्मार्ट सिटी बनलेल्या 9 शहरांची नावे सांगा ?

2- आदर्श गाव बनण्यासाठी खासदारांनी दत्तक घेतलेल्या 9 गावांची नावे सांगा ?

3- 9 जिल्ह्यांची नावे सांगा जिथे प्रत्येक घरात शौचालय आहे ?

4- नवीन रुग्णालय सुरू असलेल्या 9 जिल्ह्यांची नावे सांगा ?

5- त्या 9 राज्यांची नावे सांगा जिथे 100 किमीचा रस्ता बांधला गेला ?

6. 9 बँक शाखांची नावे सांगा जिथे सर्व जन धन खाती जिवंत (चालू )आहेत ?

7- अशा 9 देशांची नावे सांगा जिथून भारतात गुंतवणूक येत आहे ?

8- अशी 9 क्षेत्रे सांगा जिथे 1 लाख नोकऱ्या दिल्या आहेत ?

9- 9 राज्ये सांगा जिथे नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारले आहेत ?

10- तुमच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांची नावे सांगा ज्यांची मुले सरकारी शाळेत शिकतात ?

11- अशा 9 शहरांची नावे सांगा जी पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ झाली आहेत ?

12- अशी 9 राज्ये सांगा जिथे शेतकरी आधी आत्महत्या करायचे , आता ते करत नाहीत ?

13- मला सांगा फक्त 9 किमी एवढा परिसर दाखवा जिथे गंगा स्वच्छ झाली ?

14- अशा 9 भाजप लोकांची नावे सांगा ज्यांच्या घरावर ईडी ,आयटीने छापे टाकले आणि त्यांच्याकडून काळा पैसा जप्त करण्यात आला ?

15- तुरुंगात पाठवलेल्या भाजपच्या 9 बलात्काऱ्यांची नावे सांगा ?

16. 9 राज्यांची नावे सांगा ज्यांच्या गावांमध्ये पूर्ण विद्युतीकरण झाले आहे ?

17- अशा 9 जिल्ह्यांची नावे सांगा ज्यामध्ये नवीन सिंचन योजनांचे बांधकाम सुरू झाले ?

18-.अशा 9 रुग्णालयांची नावे सांगा जिथे 100 नवीन डॉक्टर्स देण्यात आले आहेत ?

19- मला असे 9 विभाग सांगा जिथे भ्रष्टाचार समाप्त झाला आहे ?

20- ज्यांच्यावर कोणताही डाग नाही अशा भाजपच्या 9 खासदार किंवा आमदारांची नावे सांगा ?

21-अशा 9 शहरांची नावे सांगा जिथे महिला सुरक्षित आहेत ?

22- या 9 वर्षातील कोणतेही 9 आठवडे मोजा जेव्हा दहशतीची कोणतीही घटना घडली नाही ?

23. मला सांगा की या 9 वर्षातील कोणतेही 9 महिने जेव्हा बलात्काराची एकही घटना घडली नाही ?

24- मला अशी 9 राज्ये सांगा जिथे या 9 वर्षांत अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले नाहीत ?

25- अशा 9 महिलांची नावे सांगा ज्यांना शून्य रुपयात स्वयंपाकाचा गॅस देण्यात आला आहे ?

26- अशा 9 खाद्यपदार्थांची नावे सांगा ज्यांच्या किंमती वाढल्या नाहीत ?

27- अशा 9 राज्यांची नावे सांगा जिथे नवीन हवाई पट्टी बांधली गेली आहे ?

28- देशाचा पैसा घेऊन परदेशात पळून गेलेल्या 9 थकबाकीदारांची नावे सांगा , की ज्यांना पकडून देशात परत आणले आहे ?

29-देशातील सरकारी संपत्ती लूटत आहेत कोट्यधीश . अशी 9 नावे सांगा ज्यांच्याशी तुमचे संबंध नाहीत ?

३०- मला सांगा भाजपचे 9 खासदार आणि आमदार ज्यांना नोटाबंदीच्या काळात तासन्तास रांगेत उभे राहावे लागले ?

31- असे 9 एटीएम सांगा कुठे महिनाभर पैसे राहतात ?

32- मला सांगा असे 9 महिने ज्यावेळी सीमेवर गोळीबार झाला नाही ?

३३- भाजपच्या अशा ९ प्रवक्त्यांची नावे सांगा जे खोट्या अफवा पसरवत नाहीत ?

३४- ९ वर्षांत संसदेची अशी ९ अधिवेशने कोणती कामे झाली ते सांगा ?

35- 9 केंद्रीय मंत्र्यांची नावे सांगा जे त्यांच्या मंत्रालयाचे निर्णय स्वतः घेतात ?

36- अशा 9 उत्पादन क्षेत्रांची नावे सांगा ज्यात निर्यात वाढली आहे ?

37- देशातील 9 विधानसभेची नावे सांगा जिथे केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारासाठी पाठवले गेले नाहीत ?

३८- ९ दिवस सांगा जेव्हा तुम्ही (पंतप्रधान) ९ पेक्षा कमी वेळा कपडे बदलले नाहीत ?

३९- तुमची (पंतप्रधान) अशी ९ भाषणे सांगा ज्यात १० पेक्षा कमी खोटे बोलले गेले ?

40- पंतप्रधानांच्या अशा 9 परदेश दौरे सांगा ज्यात देशाचा एक कोटीपेक्षा कमी खर्च झाला आहे ?

41- तुम्ही (पंतप्रधान) अशा 9 निवडणूक रॅली सांगू शकाल का ज्यात करोडो रुपये खर्च झाले नाहीत ?

42- 9 महिने सांगा ज्यावेळी पेट्रोल डिझेलचे दर कधी वाढले नाहीत ते सांगा !

43- भाजपच्या अशा 9 खासदार आणि आमदारांची नावे सांगा जे हिंसा , द्वेष आणि जातीयवाद पसरवण्याचे काम करत नाहीत .

44- तुमच्या जाहीरनाम्यात 9 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतीही 9 कामे पूर्ण झाली आहेत याची मोजणी करा .

45- कोणाची जबाबदारी निश्चित आहे अशा 9 केंद्रीय मंत्र्यांची नावे सांगा?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काही प्रश्न पटले, अगदी समर्पक, अचूक विचारले आहेत.

काही मात्र अगदी काहीही आहेत.

उदा.

9 वर्षातील कोणतेही 9 महिने जेव्हा बलात्काराची एकही घटना घडली नाही ?

या सारख्या घटना अगदी प्रगत म्हणवल्या देशात सुद्धा घडतात. त्यासाठी मोदींना जाब विचारणे चूक आहे.

असे 9 एटीएम सांगा कुठे महिनाभर पैसे राहतात ?

हा प्रश्नही कळला नाही, म्हणजे नक्की काय विचारायचं आहे

मशीनमधले पैसे भराभर संपतात. cashless चा दावा पोकळ आहे. नोट बंदी ज्यासाठी केली त्यातलं एक मोठं उद्दिष्ट गाठलं गेलं नाही. नोट बंदी हे आचरटपणें अंमलात आणलं गेलेलं एक तुघलकी कृत्य होतं.

<< मशीनमधले पैसे भराभर संपतात. cashless चा दावा पोकळ आहे. >>

------ नोटा काढण्यासाठी २०२३मधे पण ATM च्या बाहेर मोठी रांग असते . पैसे काढायला, एका व्यक्तीला २ - ते- १० मिनीटे सहज लागतात, मग मधेच नोटा संपलेल्या असतात.

हा वेळ का लागतो ? रक्कम १०००० रु. पेक्षा जास्त असेल तर OTP येतो , तो पर्यंत थांबायचे . OTP येत नाही, आला असेल तरी पैसे काढणार्‍याला समजत नाही, मग पुन्हा त्याच प्रक्रियेतून पुन्हा जायचे . मशीन मधून पैसे बाहेर नाही आल्यास, माझे पैसे कुठे गेले ? अशी एक भिती पण असते. प्रत्येक जण तेव्हढा शिकलेला नाही आहे.

मागची रांगेतली व्यक्ती वैतागून पैसे काढणार्‍याला विचारणार , " पैसे संपले का ? " त्याचीही काही चूक नसते कारण हे त्या दिवसातले त्याचे तिसरे ATM असते.

आय टी सेलचे, प्रतिसादाला ४० पैसे कमावणारे, अनुभवी लोक विचारतात " असे ATM कुठे आहे "? Happy

भारताची दोन भिन्न टोके आहे, आणि अंतर झपाट्याने वाढत चालले आहे.

जिथे तिथे OTP हा भारतातील विनोदी प्रकार आहे.

<< रक्कम १०००० रु. पेक्षा जास्त असेल तर OTP येतो >> कधी, कुठे? २०,००० रुपये काढले तरी माझा अनुभव तसा नाही.

<< 21-अशा 9 शहरांची नावे सांगा जिथे महिला सुरक्षित आहेत ?
22- या 9 वर्षातील कोणतेही 9 आठवडे मोजा जेव्हा दहशतीची कोणतीही घटना घडली नाही ?
23. मला सांगा की या 9 वर्षातील कोणतेही 9 महिने जेव्हा बलात्काराची एकही घटना घडली नाही ? >>

------ २१, २३ जरा अती झाले.

काँग्रेसकाळांतही महिलांवर अत्याचार होत होते, भाजपकाळांतही अत्याचार होत आहेत. भाजपा गेल्यावर दुसरा पक्ष आला तरी महिला सुरक्षेसंबंधांत परिस्थिती मधे फार फरक पडेल अशी शक्यता नाही.

फरक कुठे आहे ? काँग्रेसकाळांत पीडित महिला पोलीस ठाण्यात गेली तर किमान अत्याचाराच्या घटनांची नोंद व्हायची शक्यता होती भाजपा काळांत सरकार प्रशासनच पुरावे नष्ट करायला सांगते (हाथरस , उनाव ) किंवा FIR पण नोंदवत नाही ( दिल्ली बृजभूषण सिंह). कथुआ, उनाव, हाथरस, आता दिल्ली अशा विविध घटनांत भाजपा गुन्हेगारांना संरक्षण दिले आहे.

अत्याचाराच्या घटनांत महिला पुढे येत नाही. ज्या ४ -१० % मुली तक्रार करण्यासाठी पुढे येत आहे त्यांनाही तक्रार करतांना विचार करावा लागेल किंवा एखाद्या खासदाराला/ आमदाराला आपल्याला काही विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत असे वाटेल. मी बृजभूषण सिंह, खासदार, कायदा आपल्यासाठी नाहीच्चे. असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

मला तर वाटतं हा पन्नास प्रश्न विचारणारा Rto कार्कर्त्यां च अभ्यास कच्चा आहे.
खूप प्रश्न असे आहेत की कोणत्या ही पक्षाचे सरकार आले तरी ते प्रश्न 100% सुटणारे नाहीत.
140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात,साधन संपत्ती ची कमतरता असलेल्या देशा त .
हे प्रश्न राहणार च.

खूप प्रश्न असे आहेत की कोणत्या ही पक्षाचे सरकार आले तरी ते प्रश्न 100% सुटणारे नाहीत.### ह्या सरकारला आणि त्यांच्या भक्तांना ते मान्य आहे का विचारा

<< खूप प्रश्न असे आहेत की कोणत्या ही पक्षाचे सरकार आले तरी ते प्रश्न 100% सुटणारे नाहीत.
140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात,साधन संपत्ती ची कमतरता असलेल्या देशा त . >>

----- सहमत.
प्रश्न १०० % सुटणार नाही पण प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न १०० % व्हायला हवेत.

पैसे काढण्याचा अन otp चा संबंध काही कशाला नाही.. ATMमधंन पन्नास हजार परेंत आरामात पैसे काढले आहेत. मी.. OTp कधीच आला नाही.
दुसरे म्हणजे ATM machine ची RBI Storage guideline max 12 l आहे. आपण गेला बाजार पाचच लाख भरलेत मशीन मध्ये अस समजत तरी पैसे झटक्यात संपलेत अशी सिच्युएशन येणार नाही.

अगदी मनापासून ,निःपक्ष लिहायचे झाले तर.
शेतकरी आंदोलन पासून ,,:;;;;;;खूप आंदोलन झाली .
ती आज पर्यंत चालू च आहेत..
तालिबान शासित अफगाणिस्तान मध्ये होत असणारा अपराध भारतात घडला.
महील पैलवान वर लैंगिक अत्याचार झाले
तरी
विरोधी पक्ष खूप मोठ्या प्रमाणात विरोध पण करत नाही..हे राष्ट्र मेल्याचे लक्षण आहे.
त्या पेक्षा पाकिस्तान जिवंत आहे.
इम्रान खान च्या अटके वर तिथे लोक रस्त्यावर आली
भारतात
१) राजकारण हा व्यवसाय आहे.
पैसे प्रॉपर्टी कमावणे हा समान हेतू सर्व पक्षीय नेत्यांचा आहे
२)भ्रष्ट कारभार ,सत्ताधारी ना हवा तसा नियम आणि कायदा हे फक्त भारतात च चालते.
राज्य घटने नुसार सरकारी कारभार भारतात अगोदर थोडा तरी होता पण आज बिलकुल नाही.
त्या मुळे राज्य घटना फक्त नावा साठी आहे.
राज्य घटना नुसार देश कधीच चालला नाही .
पण आंबेडकर वादी खुश राहावेत म्हणून अधून मधून राज्य घटनेचा उल्लेख करावा लागतो.
३)भारतात जनता मूर्ख आहे
सर्व महान नेत्यांचे m
गांधी जी पासून आंबेडकर.
आणि
शिवाजी महाराज पासून राणा प्रताप
पर्यंत नाव घेण्याची पण लायकी आज भारतात
कोणत्याच राजकीय पक्षाची नाही ना जनतेची
जगात सर्वात मूर्ख जनता कोणती असा सर्व्हे केला तर भारत पहिल्या दहा मध्ये नक्की येईल आणि त्या मध्ये पाकिस्तान पण नसेल.
राम भरोसे हा देश चालला आहे

Bjp समर्थक आणि विरोधी सर्व मूर्ख लोक आहेत .
.
Bjp समर्थक महामूर्ख स्व स्वार्थ बघत नाहीत नशेत आहेत आणि मूर्ख आणि आंधळे होवून मोदी सारख्या बकवास व्यक्ती चे समर्थन करतात.

Bjp विरोधक पण तितकेच मूर्ख आहे हे ज्यांना bjp विरोधक समजत आहेत ते विरोधक च नाहीत .
लोकांना मूर्ख बनवण्याचा ते खेळ खेळत आहेत.
सर्व पक्ष विसरा आणि लायक लोकांना निवडून ध्या.
पक्ष कोणता ही असू ध्या
संसदेत लायक लोक च हवीत
बलात्कारी,चोर ,लबाड, लांडगे,कोल्हे पाठवू नका.
व्यक्ती स्वतंत्र वर बोलता ना ..
मग फक्त व्यक्ती लाच महत्व ध्या पक्ष गेले चुलीत

प्रश्न विचारणे खूप सोपे आहे परंतु यातील कितीतरी प्रश्न हे केवळ समाजव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात उदा "मला असे 9 विभाग सांगा जिथे भ्रष्टाचार समाप्त झाला आहे ?" इथे तुमची आमची मानसिकता आड येते कुठलाही पंतप्रधान हे बदलू शकत नाही

<< प्रश्न विचारणे खूप सोपे आहे परंतु यातील कितीतरी प्रश्न हे केवळ समाजव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात उदा "मला असे 9 विभाग सांगा जिथे भ्रष्टाचार समाप्त झाला आहे ?" इथे तुमची आमची मानसिकता आड येते कुठलाही पंतप्रधान हे बदलू शकत नाही
नवीन Submitted by हरितात्या on 31 May, 2023 - 13:10 >>

------ पंतप्रधान किंवा कुणी एक व्यक्ती भ्रष्टाचार समाप्त करु शकत नाही, किंवा परिस्थिती बदलू शकत नाही हे मान्य.

भ्रष्टाचारी कृत्यात आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग रहाणार नाही हे छोटेसे काम पंतप्रधान नक्कीच करु शकतात.

(१) कुणी दहा - बारा लाख रुपयांचा सुट भेट वस्तू म्हणून देतो, तो स्विकारणे हा भ्रष्टाचार आहे. एका मर्यादेपर्यंत भेट ठिक आहे, पण काही ठराविक रक्कमे नंतर त्याला भेट म्हणता येत नाही. लोकांनी टिंगल केल्यावर नाईलाजाने मग त्या सुटाला लिलावांत काढला आणि कुणाच्या तरी माथी चार कोटीला मारला. परतीमधे काय व्हेंटिलेटर्स बनविण्याचा कोट्यावधी रुपयांचा कंत्राट मिळाला का?
(२) विमान बनवण्याचा कुठलाही पुर्वानुभव नसलेल्या रिलायन्सला राफेल व्यावहारांत (सर्वार्थाने लायक असलेल्या HAL डावलू ) कसा हिस्सा मिळाल.
( ३) असा कुठला दबाव होता म्हणून भ्रष्टाचारी लोकांना मंत्रीपदा मधे सामाविष्ट करणे गरचे वाटले. ( नारायण राणे , हेमंत बिसवा सरमा, राणे पुत्र) आता राणे स्वच्छ तांदूळा सारखे आहेत, भ्रष्टाचारी नाही हे पटवून द्या म्हणजे झाले.
(४) अजंता कंपनीला मोरबीच्या पूलाचे कंत्राट मिळाले, किती पूल बांधले होते अगोदर ?
(५) कर्नाटकांत निवडणूकीच्या आधी भाजपा आमदाराच्या घरांत सहा कोटी रोकड म्ळाले , त्याचा मुलगा ४० लाखाची लाच घेतांना घडला. काय कारवाई केली?

भ्रष्टाचाराबद्दल मोदी आणि भाजपा गंभिर नाहीत.

भ्रष्टाचार संपला नाही असे म्हणणारे देशद्रोही आहेत.
45 काय पण एकही प्रश्न विचारणारे जगात देशाची बदनामी करत आहेत. ते पैसे धुवून त्याला इस्त्री करतात. ed पकड त्यांना. छु.

The latest NCRB report further reveals how a woman is raped every 16 minutes in India, while a dowry death occurs every hour. The 2019 report also says that a woman becomes a victim of acid attack almost every two days, while a woman is gang-raped and murdered every 30 hours in India. A woman faces a rape attempt every two hours. The case of assault with intent to outrage a woman’s modesty is reported every six minutes.

पेट्रोल ,डिझेल दर.
आयात, निर्यात धोरण.

इतकेच विषय केंद्र सरकार शी संबंधित आहे.
बाकी सर्व प्रश्न हे .
प्रादेशिक राज्य सरकार.
प्रादेशिक स्वराज्य संस्था.
प्रादेशिक राजकीय संस्कृती .
प्रादेशिक लोकांची वृत्ती ह्याच्या शी संबंधित आहेत.
त्याच्या शी मोदी सरकार च काही संबंध नाही.