नोट बन्दी पुन्हा

Submitted by हस्तर on 19 May, 2023 - 12:03

२००० च्या नोटा बन्द करन्यात आल्या आहेत
तसे पाह्ता ह्या चलनातुन गायब झाल्या होत्या , ये टी म. मशिन मधुन पण गायब झाल्या होत्याच
पण आता मागच्या चुका पुन्हा होतिल का ?

Group content visibility: 
Use group defaults

हल्ली नोटा, नाणी फारच कमी वापरली जातात. ऑलमोस्ट सर्व व्यवहार जि-पे नं होतात. सुटसुटीत. नोटा काढा रे, सुट्टे परत घ्या रे, जड नाणी वागवा रे इ लफडीच नाहीत. काही भाजीवाले वगैरे अजूनही कॅशमध्ये व्यवहार करतात. त्यामुळे ठेवावे लागतात.

बँकांनी २००० च्या नोटा ग्राहकांना देणे कधीच बंद केले आहे .
सामान्य लोकांनी कित्तेक वर्षापासून ती नोट पहिलीच नाही.
पण ज्यांनी स्टॉक करून ठेवला आहे त्यांची तारांबळ उडणार हे निश्चित !
बर झाले ३० सप्टेंबर पर्यंत वेळ दिला आहे , त्यामुळे ज्यांच्याकडे २००० च्या नोटांच्या स्वरूपात खूप काळा पैसा आहे ते सवलतीच्या दरात २००० च्या नोटा वितरित करतील .
म्हणजे ४५ हजार रु पाचशे च्या नोटात द्या आणि २००० च्या स्वरूपात ५० हजार घ्या !

<< हल्ली नोटा, नाणी फारच कमी वापरली जातात. ऑलमोस्ट सर्व व्यवहार जि-पे नं होतात. सुटसुटीत. नोटा काढा रे, सुट्टे परत घ्या रे, जड नाणी वागवा रे इ लफडीच नाहीत. काही भाजीवाले वगैरे अजूनही कॅशमध्ये व्यवहार करतात. त्यामुळे ठेवावे लागतात.
नवीन Submitted by मामी on 19 May, 2023 - 11:11 >>

------ नोटा कमी वापरल्या जातात किंवा डिजीटल वापर वाढला आहे असे अनेक वेळा एकतो. त्यात तथ्य किती आहे?
रिझर्व बँक आणि अर्थमंत्री यांचे लोकसभेतले निवेदन आणि आकडेवारी काही वेगळेच सांगते.

मार्च २०२२ मधे, दैनंदिन व्यावहारातल्या नोटा + नाणी ( currency in circulation CIC ), ३१.३३ लाख कोटी रुपये
मार्च २०१४ मधे हा आकडा १३.७ लाख कोटी रुपये एव्हढा होता.

नोटबंदीनंतर नोटांची मागणी वाढलेली आहे.

अर्थव्यावस्थेचे आकारमानासाठी CIC/GDP प्रमा णाची तुलना करतात. वरिल काळांत ते ११.६ % वरुन १३.७ % असे बदलले आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/currency-in-ci...

Currency supply is decided by monetary policy. Cash in circulation is soaring, and that usually means good things for the economy.
Big increases in demand for cash usually lead to booms.

काय म्हणता? पण नोटाबंदीचं उद्दिष्ट तर कॅशलेस लेसकॅश इकॉनॉमी कडे जाणे हे होतं.
--
दोन हजाराच्या नोटा काढल्या तेव्हाच पाचशे च्याही नव्या नोटा काढल्या. त्यांचंही आयुष्य संपलं असेल. मग त्याही परत करा म्हणून सांगितलं जाण्याची शक्यता आहे. मी हल्ली एटीम मधून पैसे काढले तेव्हा सगळ्या दोनशेच्याच आल्या. आधी असं होत नसेल. ५००० काढले तर ५०० च्या ९, २०० च्या २ +१०० ची एक किंवा १०० च्या पाच अशा मिळत.

जर २००० च्या नोटांचा वापर तसाही कमी झाला असेल तर या नोटांच्या होतच असलेल्या विनाशकाले मास्टरस्ट्रोक बुद्धी कशाला असा प्रश्न पडला.
नवीन नोटा छापणे बंद केले आहे असे जाहीर केले की त्या जीर्ण झाल्याकी संपणार हे लोकांना कळतेच, त्यांनी आपापल्या सोयीने बदलून घेतल्या असत्या.

परत तो काळा पैसा वगैरे विनोद करू नका. ज्यांना साठवायचा त्यांना २००० कधीही बंद होईल याची धाकधूक असेलच त्यांनी वेगळ्या नोटांत / रुपात साठवला असेल किंवा वरदहस्त असणाऱ्यांनी (आधीच बातमी कळते घ्या बदलून) २००० च्या नोटात साठवला असेल.

अबे मास्टर स्ट्रोक आहे तो, उगा चर्चा कशाला. आपापल्या नोटा पटापट बँकेत जमा करा. निवडणुका जवळ आल्यात लै पैसा लागणार आहे या वेळेस

२००० ची नोट ही स्टॉप गॅप अ‍ॅरँजमेंट होती. रिझर्व बँकेच्या आताच्या परिपत्रकात आणि तेव्हाही असं म्हटलं होतं की रिमॉनेटायझेशन जलद व्हावं यासाठी २००० च्या नोटा आणल्या.
२०१६ मध्ये नोटाबंदी करताना आणि आताही त्यांच्या मते ५०० , १००० आणि २००० च्या नोटांचा एकच function होता. store of value. या तिन्ही नोटा व्यवहारासाठी वापरल्या जातात medium of exhcange सुद्धा असतील हे महत्त्वाचं नाही. तेव्हाही नोटाबंदीचे समर्थक म्हणायचे गरिबांकडे कुठे असतील ५०० , १००० च्या नोटा? त्यांचं या नोटांशिवाय काही अडणार नाही.
म्हणजे लोक ५००,१००० च्या नोटा कशासाठी घ्यायचे? घरात पैसे साठवायला. त्या रद्द केल्या आणि त्याबद्दल २००० च्या नोटा आणल्या. आता या साठवा. नोटा बदलण्यात, काढण्यात लागणारा वेळ वाचला आणि साठवायला लागणारी जागाही वाचली. आहे की नाही मास्टरस्ट्रोक.

आताही ज्यांच्याकडे १० लाखापेक्षा जास्त रकमेच्या २००० च्या नोटा असतील त्यांना त्या बँकेत जमा करताना विचार करावा लागेल.

२०१६ मध्ये जसे रोज नवे नियम यायचे, तसे आताही होते का ते पाहू.

बँकांनी २००० च्या नोटा ग्राहकांना देणे कधीच बंद केले आहे .
सामान्य लोकांनी कित्तेक वर्षापासून ती नोट पहिलीच नाही. >>>> हो

पूर्वी काश्मिरी जनतेला आपल्या लष्करावर दगड फेक करण्यासाठी पाकिस्तान १००० रू नोटा देत होता हे खात्रीलायक गोटातून रिपोर्ट्स मिळाल्या नंतर भाजप सरकारने 1000 रुपयांच्या बंद करून २००० च्या नोटा काढल्या तेंव्हा पासून काश्मीर मध्ये आपल्या लष्करावरील दगड फेक बंद झाली , हे सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांना समजणारच नाही मुळी Happy
आता दगड फेक बंद झालीच आहे म्हणून भाजप २००० हजार च्या नोटा बंद करत आहे , सिंपल आहे Happy

नोटेत असणारी चीप service साठी पाठवायची आहे म्हणून 2000 च्या नोटा सरकार जमा करत आहे.
चीप सर्व्हिसिंग झाली की परत त्या नोटा परत करण्यात येतील.
काळजी नसावी.

मागच्या वेळी लहरी प्रधान चौकीदार ( मूळ शब्द उर्दू आहे) आले होते नोटाबंदी जाहिर करायला.
या वेळी जनतेच्या नजरेस नजर मिळविण्याचे धाडस झाले नाही, तर RBI ने पत्रक काढले.
मागच्या वेळी लोकांना त्रास झाल्याचा हा कबुली नामा आहे.

नोटा कमी वापरल्या जातात किंवा डिजीटल वापर वाढला आहे असे अनेक वेळा एकतो. त्यात तथ्य किती आहे?>>>>>>

आकडेवारी माहित नाही पण मी गावात सर्वत्र जीपे वापरते, भाजी, दुध, केमिस्ट, किराना सर्वत्र जीपे चालते. काही शेतमजुर जीपेवर मजुरि घेतात, काहीजणांना नाही चालत. वाडीला पण सर्वत्र जीपे. आपल्याला हिशोब ठेवायला सोपे पडते.

अहो सिंपल, मोदीने ५०० घ्या सुद्धा नोटा रद्द केल्या. आणि एका काश्मीरमधल्या प्रॉब्लेम सोडवायला अख्ख्या देशाला वेठीस धरलं, ?
संघ स्वयंसेवक, ब जरंग दल, श्रीरामसेने, अभाविपची कोमल शर्मा , तुम्ही स्वतः: एवढे सगळे निधड्या छातीचे लोक काश्मीरमध्ये गेले असते तर हा प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटला असता.
बरं नोटा बंदी केल्यावर तिथली विधानसभा भंग केली, ३७० काढलं, राज्याचा केंद्रशासित प्रदेश केला, काश्मीर फाइल्स पिक्चर काढला तरी तिथे अजून दहशतवाद्यांचं थैमान चालूच आहे. आणि तुम्ही म्हणताय प्रॉब्लेम सुटला?

मोदीने १६ नोव्हेंबरच्या भाषणात पहिली दोन कारणे कोणती सांगितली होती?

मोदीने पहिलं कारण काळा पैसा बाहेर आणणं हे सांगितलं होतं.
सरकारचं म्हणणं होतं की म अधिक मूल्यांच्या ५००-१००० घ्या नओटआंमउळए भ्रष्टाचार वाढतो. म्हणून त्या रद्द करून त्याही पेक्षा अधिक मूल्याच्या म्हणजे २००० घ्या नोटा आणल्या. आहे की नाही मास्टरस्ट्रोक.

२००० च्या नोटांमध्ये चिप आहे आणि त्या चिपमध्ये कॅमेरा आणि ऑडियो रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे. नोटा परत आल्या की ज्यांच्याकडे होत्या त्यांचे सगळे उद्योग सरकारला कळणार. सिंपल.

पूर्वी काश्मिरी जनतेला आपल्या लष्करावर दगड फेक करण्यासाठी पाकिस्तान १००० रू नोटा देत होता हे खात्रीलायक गोटातून रिपोर्ट्स मिळाल्या नंतर भाजप सरकारने 1000 रुपयांच्या बंद करून २००० च्या नोटा काढल्या तेंव्हा पासून काश्मीर मध्ये आपल्या लष्करावरील दगड फेक बंद झाली , हे सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांना समजणारच नाही मुळी >>> Rofl मोदीला पाठवा ही पोस्ट. तो सुद्धा गडाबडा लोळेल

मागच्या वेळी लहरी प्रधान चौकीदार ( मूळ शब्द उर्दू आहे) आले होते नोटाबंदी जाहिर करायला.
या वेळी जनतेच्या नजरेस नजर मिळविण्याचे धाडस झाले नाही, >>>>>त्यासाठी ते भारतात असायला हवेत ना ??? तिकडे हिरोशिमामध्ये मस्त फोटो सेशन चाललेय

मागच्या वेळी लहरी प्रधान चौकीदार ( मूळ शब्द उर्दू आहे) आले होते नोटाबंदी जाहिर करायला.
या वेळी जनतेच्या नजरेस नजर मिळविण्याचे धाडस झाले नाही, >>>>>त्यासाठी ते भारतात असायला हवेत ना ??? तिकडे हिरोशिमामध्ये मस्त फोटो सेशन चाललेय

आता दगड फेक बंद झालीच आहे म्हणून भाजप २००० हजार च्या नोटा बंद करत आहे <<< हे हे भयानक आहे.
बाकी कारणे कोण विचारतो
कारण एकच - मास्टर स्त्रोक

<< आता दगड फेक बंद झालीच आहे म्हणून भाजप २००० हजार च्या नोटा बंद करत आहे <<< हे हे भयानक आहे.
बाकी कारणे कोण विचारतो >>
------ २००० रु. च्या नोटे मुळे दोन दगडे फेकतील... म्हणजे दगडफेकीचे प्रमाण वाढायला हवे.

<<कारण एकच - मास्टर स्त्रोक >>
------ रिव्हर्स मास्टर स्ट्रोक

Pages