" "

Submitted by mi manasi on 18 May, 2023 - 00:04

" "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मला वरदान होतं चिरतारुण्याचं. वरदान होतं कौमार्यभंगानंतरही अधिष्ठान करुन पुनः तारुण्य प्राप्त करुन घेण्याचं.

एक प्र श्न. कौमार्यभंगानंतरही अधिष्ठान करुन पुनः तारुण्य प्राप्त करुन घेणे म्हणजे काय?

तारुण्य (youth) आणी कौमार्य (virginity) are two different things.

कौमार्यभंगानंतरही अधिष्ठान करुन पुनः तारुण्य प्राप्त करुन घेण्याचं. >> इथे कौमार्य पाहिजे. चिरतारुण्य असेल तर ते तारुण्य पुन्हा प्राप्त करायची गरज पडत नाही.

बाकी कथा रोचक.
कोणीतरी मंत्र टाकून शिळा होण्याचा शाप द्यावा आणि मनात असलं तरी जागचं हलताच येऊ नये, तशी जागच्याजागी खिळून >> ही कल्पना आवडली.
(इथे ' ताजा मंत्र टाकून शिळा होण्याचा शाप ' असा पाणचट विनोद करायचा मोह होतो आहे)

छान झालाय हा भाग..

तू माझ्यासारख्या कर्तव्यपरायण राजाची कर्तव्यदक्ष कन्या आहेस >>>>> असला नालायकपणा केला बापाने की कर्तव्यपरायण कर्तव्यदक्ष शब्दांवरचा विश्वास ऊडाला Happy

Sumedh..
इथे कौमर्यभंगानंतर गर्भधारणा, नंतर प्रसूती अपेक्षित आहे.. पुढे कथेत तसा उल्लेख येईल..
त्यामुळे वारंवार शरीरात बदल होतील. ते वार्धक्याकडे नेणारे असतील.
तसं होऊ नये म्हणून अनुष्ठान करून पुन्हा पूर्वस्थितीत येता येईल असं आहे..धन्यवाद!

हरचंद पालव..
पुत्रप्राप्तीनंतर असं करू का?

तसं होऊ नये म्हणून अनुष्ठान करून पुन्हा पूर्वस्थितीत येता येईल असं आहे.>> आता प्लास्टिक सरजरी करावी लागेल. हे वरदान पण पाहिले तर पॅट्रार्किलाच सपोर्ट करते. म्हणजे तिच्या बरोबर जो कोणी शरीर संबंध ठेवेल. त्याला कुमारी व तरुणच स्त्री मिळेल. ही प्रत्येकच पुरुषाची बेसिक रिक्वाय्रमेंट असते. बिचार्‍यांना सामाजिक बंधनांमुळे काँप्रमाइज करावे लागते. ( एक किळस वाणे सत्य)

पण आय अ‍ॅम हॅपी शी इज हॅविन्ग मल्टिपल पार्टनरस अँड होप शी इज एंजॉइन्ग हर जर्नी. अश्या संबंधात काही रोग झाले तर ते ही क्युअर होतील का अनुष्ठान करून?

खालील वाक्य माझे नाही आवाज नावाच्या चावट विनोदी दिवाळी अंकात वाचले होते.
" बायकांची अब्रू म्हणजे काचेचे भांडे हे आता जुने झाले. आता बायकांची अब्रू म्हणजे स्टीलचे भांडे, एकदा घासले की परत चकचकीत. "
त्याची आठवण झाली.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात क्रोमार्या मुळे क्रो + मारिया कावळ्यांना खायला देणारी मारिया ( ओमारिया ओमारिया गाण्यातली.) नाहीतर क्रो मॅग्नॉन एक मॅन आहे ना इवोल्युशन पक्षी उत्क्रांती च्या चेन मध्ये असेच शब्द डोक्यात फिरत राहिले रेंट फ्री. त्यामुळे प्रति साद द्यायला उशीर झाला.

तो राजा टोक्सिक पेरेंट आहे. शी विल नीड एक्स्टेंन्सिव थेरपी बीकॉज आय अ‍ॅम सर्टनली वर्थ मोअर दॅन अ हॉर्स असे तिला वाटत असेल पण पिताश्रींची आज्ञा.

पूर्वी कर्तव्याचे मापदंड वेगळे होते ना!
>>>>

तिच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे तेव्हाही ते चूकच होते ना..
ती सुद्धा हे बलिदान करून धन्य झाली असती तर मग एकवेळ ठिक आहे..

मला ही माधवी बिनडोक वाटली - " कोणी सामान्य कन्या नाही. हिला वरदान आहे चिरतारुण्याचं, अखंड कौमार्याचं. म्हणूनच, तुम्हाला तुमच्या गुरुदक्षिणेसाठी हवे असलेले आठशे अश्वमेधी घोडे मिळवून देण्यास माधवी सहाय्यकारी ठरेल," . अखंड कौमार्याचं वरदान, साहाय्यकारी हे शब्द वापरलेत , तुमचं काम झालं की मुलीला परत आणून द्या म्हणतोय तरी ती ह्योच माझा नवरा अशी स्वप्न बघते आहे.

अश्विनी मामी..
क्रोमुळे झालेल्या त्रासाची जबाबदारी स्वीकारून माफी मागते. आणि हो माधवीने ते सगळं भावनेच्या ओघातच स्वीकारलं होतं आणि त्या काळचा रिवाज पित्याची आज्ञा..

ऋन्मेष..
चुकीचं वाटलं तरी तिला ते स्वीकारावं लागलं. तो काळच तसा होता. पित्याच्या मर्जीविरुद्ध जायचा नव्हता. ययातीने वार्धक्य न स्वीकारलेल्या आपल्या मुलांना सुद्धा शाप दिले होते असं वाचलं होतं..

भरत..
त्याकाळी स्त्रिया किती परिस्थितीशरण होत्या हे पुढच्या भागात कळेलच.. पण इतर विलासी राजांपेक्षा गालव तीला योग्य वाटला असंही आहे.

तसंही हा वाचलेल्या माहितीवर आधारित कल्पनाविलास आहे..

ययातीने वार्धक्य न स्वीकारलेल्या आपल्या मुलांना सुद्धा शाप दिले होते >> ययातीने आपले वार्धक्य आपल्या मुलाला पुरु ला स्वीकारायला लावले आणि त्याचे तारुण्य स्वतः घेतले अशी ती कथा आहे.

Pops has aging issues. Pops is against daughter rights pops is Republican may be. Strictly personal opinion. Happy

Maitreya..
हो पुरुने ययातीचं वार्धक्य स्विकारलं पण इतर- देवयानीच्या मुलांनी नकार दिला. त्यांना ययातीने शाप दिले होते..

>>> तरी ती ह्योच माझा नवरा अशी स्वप्न बघते आहे.
स्टॉकहोम सिंड्रोमचा प्रकार दिसतो आहे.

बापच का, सगळेच पुरुष नालायकच आहेत या कथेतले! गुरुदक्षिणा गालवाची जबाबदारी होती, त्यासाठी एका अनोळखी मुलीला वेठीला धरायला तो कसा तयार झाला? अशा पद्धतीने मिळवलेली गुरुदक्षिणा विश्वामित्रांनी कशी स्वीकारली? आणि ती माधवी तरी गालवाच्या गालवांवर राजमुद्रा उमटवून निघून का गेली नाही! असो. एकूण 'आपण कसं वागायचं नाही आणि आपल्या बाबतीत काय होऊ द्यायचं नाही' हा बोध यातून घ्यायचा - त्याअर्थी ही बोधकथा म्हणायची.

अश्विनीमामी
पुराणातली वानगी- उदाहरणं- पाहिली तर आता कशाचंच आश्चर्य वाटायला नको..

स्वाती आंबोळे..
तो काळच तसा होता.. पितृसत्ताक समाजव्यवस्था आणि स्त्री परावलंबी होती. पित्याने नाकारलं., आधाराची गरज म्हणून माधवीने गालवला स्विकारलं. कायमस्वरूपी आधार आणि प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणता येईल

आताच्या मुलींसाठी खरंच ही बोधकथा आहे.

कथानक वेगळ्या धाटणीचे आहे आणि इतक्या साऱ्या प्रतिसादांवरुन कथा नक्कीच उत्कंठावर्धक वाटतेय तर पुढे जाऊन कधी तुम्हाला हे कादंबरी स्वरुपात प्रकाशित करायचा मानस असेल तर आधीच सर्व ©च्या पूर्तता करून ठेवून इकडचे लिखाण अप्रसिद्ध करण्याचा हक्क सुद्धा शाबित रहाण्यास वेमाना विनंती करून ठेवा अशी सुचवणी करून ठेवतो. पुढील लेखनास शुभेच्छा.

गालव आणि ययाती खोट्या प्रतिष्ठेचे बळी आहेत. जे आपल्याकडं नाही ते देण्याचं वचन कसलं दळभद्री वचन...
माणूस अटृहास आणि आपल्याच मोठेपणाचा बळी असेल तर काय होणार.
तसेच एखाद्याला भावनिक साद घालून वाटेल ते करायला लावणे आहे.
माणसानं कसं नसावं यांचा वस्तुपाठ आहे ही कथा...मग ते ययाती, गालव, माधवी, विश्वामित्र अथवा ते अन्य तीन राजे असोत.

अज्ञानी..

कथानक वेगळ्या शैलीचे आणि ते उत्कंठावर्धक वाटत असले तरी पुस्तक स्वरूपात करण्यासाठी योग्य आहे की नाही माहित नाही. कारण आणखी अनेक गोष्टी आहेत..
जसं की विषय नवा नाही. माहित असलेली गोष्ट आहे. यावर बऱ्याच लेखकांनी लिहिलं असेल. मी वाचलेली नाहीत पण माधवीवर नामवंत लेखकांची पुस्तकं बाजारात आहेत.

मुळात मी हे कादंबरी स्वरूपाचं लिहिलेलं नाहीये. फार तर ती दीर्घकथा होईल. कादंबरीत सगळा जीवनपट येतो. मी फक्त माधवी गालवला दान केली, त्यानंतर काय घडलं त्यावरच लिहिलंय.

असं आहे.. पण सुचनेसाठी खुप खुप आभार. इथली नवीन माहिती मिळाली.

दत्तात्रय साळुंके..
हो, सगळ्याच पुराणकथा दिशादर्शक आहेत..

पुराणातली कुठली कथा आजच्या काळाला सुसंगत आहे?
महाभारतात तरी काय होते. बायकोला जुगारात लावणे. तिचे वस्त्रहरण व्हायची वेळ आणणे. बर ती बायकोही पाचात एक तिच्या मर्जीविरुद्ध करणे. आवडली राजकन्या की पळवली रथात टाकून.. हे सारे उद्योग चालायचे ते सुद्धा महाभारताचे हिरो समजले जाणाऱ्या पांडवांकडून.

आवडली राजकन्या की पळवली रथात टाकून.. Lol ह्याचं रिफ्लेक्शन सिनेसृष्टिवर कायम राहिलं ना पण ... रथा ऐवजी मारुती ओमनीच्या स्वरुपात

माधवीवर नामवंत लेखकांची पुस्तकं बाजारात आहेत.>> मी हेच लिहिणार होतो
विजया जहागीरदार यांची याच विषयावर कादंबरी आहे
ययातीकन्या माधवी म्हणून

खेरीज सुधाकर शुक्ल यांचीही आहे

अजून एक दिवाळी अंकात पण दीर्घकथा म्हणून छापून आलेली

यात वेगळी धाटणी असेल असे धरून चालतोय

Pages