" "

Submitted by mi manasi on 15 May, 2023 - 23:57

" "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रौमार्य का ? क +र कुठून आला ? तो शब्द कौमार्य असा आहे.

तुम्ही क्रौर्य आणि कौमार्य जुळवून क्रौमार्य असा शब्द घडवलात असंही वाटलं.

तुम्ही भारी आहात असं लिखाणावरून दिसलं तर तुम्हाला भार्या म्हणू आपण. Proud Light 1

स्वाती, भरत..
पटलं मी शीर्षक बदलून कौमार्या असं करतेय.
धन्यवाद!

पण कौमार्य हाच योग्य शब्द आहे. क्रौमार्य मध्ये कोणता धातू आहे?
कल्पना विलास कथाबीजाचा होउ शकतो. नवे शब्द , कल्पनाविलासातून तयार होत नाहीत.

>>>>>>ती सौंदर्यवती, रुपवती हेच कर्तुत्व म्हणूनस मिरवत असेल, तर मग पुढच्या वाक्यात तिच्याशी जे झाले त्यात तितके नवल नसावे.
अच्छा म्हणजे सर्वसामान्य स्त्री आहे, कर्तूत्वशून्य आहे म्हणजे तिची ओळख फक्त शय्यासोबतिण आणि संतानप्राप्तीचे 'साधन' एवढीच असेल तर नवल नाही बरोबर? ती माणूसच नाही की ती कन्या, पत्नी, भगिनी, मैत्रिण, माता, सखी यापैकी तिची काहीही ओळख नसेल तर त्यात नवल ते काय बरोबर?
ऋन्मेष तुम्हीच विचार करा हे बरोबर गृहीतक आहे का?

सामो, सौंदर्य हेच जर बलस्थान असेल आणि सोबत ईतर काही गुण नसेल तर ते जिथे वापरले जाणार त्याच क्षेत्रात नाव होणार. हे स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही लागू.
आणि हो, उत्तम शय्यासोबत देणे हा देखील एक गुणच आहे. आणि हे देखील स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही लागू. या गुणाला अडरएस्टीमेट करू नका. साधारणपणे केले जाते ते सोडा...

ती कन्या, पत्नी, भगिनी, मैत्रिण, माता, सखी यापैकी तिची काहीही ओळख नसेल >>>> ही ओळख मिळवायला कुठलेही कर्तुत्व अंगी लागत नाही
पुन्हा हेच पुरुषांनाही पुत्र पती बंधू मित्र पिता या अनुषंगाने लागू

सौंदर्य हेच जर बलस्थान असेल आणि सोबत ईतर काही गुण नसेल तर ते जिथे वापरले जाणार त्याच क्षेत्रात नाव होणार. हे स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही लागू. >> सामो ला फुल टॉस दिला आहे. Happy

वा! बदल केलात हे चांगले केलेत. शिवाय गोष्टीतला सस्पेन्स फुटला असूनही तुम्ही ते एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे; पुढची गोष्ट लिहिणे सोडून दिलेले नाही. ही खिलाडू वृत्ती खूपच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आता पुढे तुमच्या शैलीत ही गोष्ट वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. पुढील लेखनाबद्दल शुभेच्छा.

वाचतोय. माधवीची गोष्ट माहित नाही. तुमचा कल्पनाविलास/ इंटरप्रिटेशन वाचायला आवडेल. मूळ गोष्ट तुमची संपली की वाचेन.

ही खिलाडू वृत्ती खूपच कौतुकास्पद आहे. >>> +१ हपाशी सहमत. प्रतिक्रिया सकारात्मकरीत्या घेउन केलेले बदल वगैरे अ‍ॅप्रोच आवडला.

नाहीतर इथे लेखकपब्लिक अशा प्रतिक्रिया आल्या की एकतर डिफेन्सिव्ह होऊन काहीतरी पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह शेरे मारतात, लेखच उडवतात, किंवा थेट अ‍ॅडमिन गाठून "माझे सर्व लेखन डिलिट करावे" पर्यंत पोहोचतात. Happy

पुलेशु!

अरे अरे, विकांत, बाई दवे इ चालतं आणि क्रौमार्यचे थेट धातू विचारताय ... खिलाडू वृत्ती वगैरे माहिती नाही पण लेखिका "पीपल प्लीजर" वाटल्या. लेखन करण्या आधीच निव्वळ प्रतिक्रियांवरून पॅसिव्ह अग्रेसिव्ह, डिफेन्सिव्ह, पीपल प्लीजर इ हवी ती लेबलं इथे मिळतील.

ययातीकन्या माधवीची गोष्ट मुळ महाभारतात आहे की नाही ह्या बद्दल माझा अभ्यास नाही पण इथे जी गोष्ट अभिप्रेत आहे ती मला माहिती आहे. आजच्या काळाच्या मापदंडानुसार ही गोष्ट आपल्याला तिच्या इच्छेविरुद्ध आणि म्हणून अन्यायाची वाटते. पण रामायण आणि महाभारतात असे उल्लेख बर्याच जणींच्या बाबतीत येतात. उदा हनुमानाची आई अंजनी ही एक अप्सरा होती आणि हनुमानाच्या जन्मानंतर त्याला त्याच्या पित्याकडे सोपवुन ती निघुन गेली. तसेच मेनका ही अप्सरा शकुंतलेच्या जन्मानंतर विश्वामित्र ऋषींना सोडून निघून गेली. शकुंतलेची जबाबदारी विश्वामित्र ऋषींना घ्यायची नव्हती म्हणा अथवा घेणे शक्य नव्हते म्हणा पण तिच्या जन्मानंतर ते ही तपश्चर्येसाठी निघुन गेले म्हणून शकुंतलेचे पालनपोषण कण्व ऋषींच्या आश्रमात झाले. खुद्द महाभारताचे लेखक व्यासमुनी हे सत्यवती आणि पराशर ऋषींचे अपत्य. त्यांचं लग्न झालेलं नव्हतं आणि व्यासांच्या जन्मानंतर सत्यवती पित्याकडे परत आली आणि व्यासांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी म्हणजे पराशर ऋषींनी केला.

वरील उदाहरणे मला 'लो टेक सरोगसी' ची वाटतात. शकुंतलेच्या बाबतीत दुमत असू शकते पण एकंदरच तपश्चर्या निष्फळ करण्यासाठी अप्सरा पाठवणे हे मला एकप्रकारचे युफेमिझम वाटते. तपश्चर्या करताना, प्रेमात पडले पण सांसारिक पाश दोघांनाही नको होते त्यामुळे काही काळानंतर वेगळे झाले हे जास्त तर्कशुद्ध वाटते.

माधवीच्या बाबतीत वेगळेपणा इतकाच की ययाती राजाने गालव मुनींना मदत करण्यासाठी इतर कुठल्याही मुलींची निवड करण्याऐवजी स्वतः च्या मुलीची निवड केली. त्यासाठी तिची संमती होती का हे कळायला मार्ग नाही. पण एकुणच राजकन्या ना स्वतः च्या स्वयंवरात ही हे असायचाच असं नाही. जो अट पूर्ण करेल/ पण जिंकेल त्याच्या गळ्यात राजकन्या माळ घालेल हे अध्याहृत असायचे. मग तो वयाने दुप्पट असेल, आधीच विवाहित असेल किंवा तिला स्वत: बरोबर आपल्या भावांशी लग्न करायला भाग पाडेल, राजकन्येला तो निर्णय नाकारण्याचे स्वातंत्र्य नव्हतेच.

तात्पर्य काय माधवीची कहाणी त्या काळाच्या पार्श्वभूमीवर वेगळी असेल पण तिच्या एकटिच्याच बाबतीत काही पराकोटीचे अन्याय झाले असे मला वाटत नाही. तिचा रितसर विवाह झाला असता तर तो ही तिच्या संमतीने झाला असता असं किंवा ती फार सुखी झाली असती असंही नाही. जशी द्रौपदी ची कहाणी इतरांपेक्षा वेगळी तशीच माधवीची पण.

पर्णीका..
मी आजपर्यंत पुनर्जन्माचा अँगल असलेली कोणतीही कथा लिहिलेली नाही आणि या कथेतही पुनर्जन्माचा अँगल अजिबात नाहीय.

हे एक आणि दुसरं असं की मला वाटतं की जशा आपण इतर पुराणकथा वाचतो आणि त्या तशा असतील असं समजतो. तशीच ही एक कथा आहे.
मीच नाही तर बऱ्याच लेखकांनी त्यावर लिहिलेलं आहे. फरक इतकाच की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो.
मी माझ्या दृष्टीकोनातून ती लिहितेय. आपण त्याकडे एक कथा म्हणूनच पाहुयात असं मला वाटतं. प्रतिक्रियेसाठी आभार!

मी उल्लेख केला होता त्या लेखिकेत आणि तुमच्या मधे माझा जरा गोंधळ झाला क्षमस्व. तो उल्लेख मी प्रतिक्रियेतुन काढून टाकलाय.

तुम्ही तुमच्या भुमिकेतुन ही गोष्ट मांडताय हे उघडच आहे. तुम्ही प्रस्तावनानेत जी भुमिका मांडली ती मला पटली नाही. इथे त्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे असं वाटल म्हणून मी माझं मत जरा तपशीलात मांडलं. तुम्हाला चर्चा नको असेल तर मी इथे च थांबते. तुम्हाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.

भीष्म सहानींचे 'माधवी' नाटक (हिंदी) आणि अनुपमा निरंजन (कन्नड + इंग्रजी) यांनी याविषयी वेगवेगळे लिहिलेले वाचले आहे.

आता तुमची माधवी वाचणार !

वाचतोय. माधवीची गोष्ट माहित नाही. तुमचा कल्पनाविलास/ इंटरप्रिटेशन वाचायला आवडेल. मूळ गोष्ट तुमची संपली की वाचेन.

नवीन Submitted by अमितव on 17 May, 2023 - 03:35 >>> हे चांगलं केललं तुम्ही. मी पण हल्ली क्रमःश कथा वाचत नाही कारण कथा अपुर्ण ठेवणे, एक-दोन विरुद्ध मते आली तर कथाच काढून टाकणे हे प्रकार हल्ली सर्रास होतात माबोवर. पण तरिही या धाटणीच्या कथा आवडतात म्हणून ही वाचत होते पण इथेही तेच Sad

Pages