मदत

Submitted by स्वप्ना_राज on 9 May, 2023 - 10:52

कोणीतरी पुलाच्या कठड्यावर उभं होतं.
अंधार होता पण हे दृश्य पाहायची सवय असल्यामुळे त्याला सहज दिसलं. अर्थात बाई होती का पुरुष हे कळत नव्हतं.
तो कसलाही आवाज न करता बसून राहिला.
अचानक आवाज झाला तर आत्महत्येचा विचार करत असलेले लोकही दचकतात. ह्या गोष्टीची त्याला नेहमीच गम्मत वाटत आली होती.
जे कोणी उभं होतं त्या व्यक्तीचं लक्ष नव्हतं. तिचा संवाद स्वतःच्याच मनाशी.
तो लक्ष ठेवून होता. जगण्याचा निश्चय होणार का मरण्याचा?
सेकंद गेले. मागून मिनिटंही. आणि मग...

तो क्षणार्धात उठला आणि काहीही कळायच्या आत त्या व्यक्तीला त्याने कठड्यावरून लोटून दिलं.
'काही लोकांना मरायचा निर्णयही स्वतःचा स्वतः घेता येत नाही. मदत लागते.'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धक्का!!
शशक आहे का? (मला मोजण्याचा कंटाळा)
छान आहे.

मस्त जमली आहे.
आधीच माफी मागतो. हे थोडं फार त्या गझलेत आपल्या पदरचे शेर घातल्यासारखं आहे. सॉरी. पण आवडली म्हणून लिहितोच.
एखादा शब्द बदलून तो बघणारा आधी दानव वाटून मग तोच आपण समजतो तो देव आहे. आणि सो कॉल्ड देव त्याच्या भक्तांच्या जिवावर उठला आहे असं करता येऊ शकलं तर आणखी धक्का बसेल का? का त्याने डायल्युट होईल?

बापरे.. आवडलीच.‌‌..!

अवांतर..
मला अशीच सवय आहे. वाहतं पाणी बघत पुलावर एक दहा मिनिटे थांबयची..
आता आजुबाजुला पण नजर जाणार कोणी धप्पा द्यायला टपून नाही ना याकडे.. Lol

सर्वांचे मनापासून आभार Happy

एस, हो शशकच लिहायची होती. बहुतेक १०० शब्दच आहेत. मीही वरवरच मोजले Happy
अमितव, सॉरी काय त्यात? आजकाल लोकांनी असले ट्विस्टस असलेल्या कथा इतक्या वाचलेल्या असतात की सो-कॉल्ड ट्विस्टस त्यांना आधीच कळतात. तेव्हा रिव्हर्स ट्विस्टची आयडिया छान आहे.

मानव पृथ्वीकर, थॅक्यू....माझ्या दोन लेखनात एव्हढी गॅप येते की दर वेळेला सगळे वेलकम बॅक म्हणतात Proud
मन्या ऽ , सध्या नेहमीच्या आयुश्यातल्या घटनांना ट्विस्टस देऊन अश्या शशक लिहिता येतील का असाच विचार करत असते मी.
भरत, क्लिप मस्तच.

आवडली.
तुझे पन्ने बरेच दिवसात आले नाहीयेत ते वाचायला उत्सुक आहे मी

ऐसे नव्हे मृत्यूस् आम्ही, केव्हाच् नाही पाहीले
खुप आहे पाहीले त्या, प्र्यत्येक् जन्मी पाहीले
मारीले आहे आम्हीही, मृत्यूस या प्रत्येकदा
नुसतेच ना मेलो आम्ही, जन्मलो प्रत्येकदा

मृत्यो अरे येतास जरका, होऊनी साकार् तू
सांगितले असते तुलाही, कोण् मी अन् कोण् तू
तुजसवे लढण्यात काही, शान् असती वाटली
घरच्या घरी मरण्यात् ऐसी, लाज नसती वाटली

हे खरे की तुच असते, अंती आम्हाला मारिले
काय मोठे त्यात् आहे, देवधीका तु मारिले
नसता जराही खेद मेलो, असतो जरी ऐसे तरी
लाभता बहूमान् स्वर्गी, वीरचक्राचा तरी

मृत्यो अरे तु का कुणाला, येऊ नयेसा वाटतो?
येतो असाही काळ् जेव्हा, तुच यावा वाटतो
असते जरी काळी अशा, तूही कुणा सन्मानिले
देवहूनीही जास्त असते, आम्ही तुला सन्मानिले

कंठतो आयुष्य नूसत्या, आशेत ह्या आता तुझ्या
येतो मनाला धीर नूसत्या, कल्पनेनेही तुझ्या
आहे जसा की ध्यास मृत्यू आन जीवाला लागला
हाय्! पण दारी तुझ्याही केवढा क्यू लागला

– भाऊसाहेब पाटणकर