मे त पहिल्या रविवारी ला
जागतिक हास्यदिन साजरा झाला,
त्या निमित्त हास्याचे मूल्य सांगणारी
ही शब्द रचना.
हास्य!!
हसणारे सुंदर चेहरे बघता,
हास्याची लागण होतसे..
हास्यांची देणगी अमूल्य,
देवाने मानवा दिली असे..
हास्य म्हणता, आहे औषधं,
विज्ञान सांगते आम्हाला..
दिलखुलास हसण्याने फक्त्त
मेंदूवरील होई ताण हलका..
निरागस हास्य खुलते बाळाचे
गालातल्या गालात ते प्रियेचे..
सातमजली खळखळून हसतो,
जेव्हा सखे भेटती जिवाभावाचे..
हसूनी छान मैत्री सुरु होते
हृदय ते जिंकी सर्वांचे..
हास्याची हो किमया भारी
शत्रूत्वाचा त्वरित अंत करे..
हसणे जिवंत मनाचे लक्षण,
हसण्याने सौंदर्य खुले विलक्षण..
येता जर काही दुःख जीवना,
हास्य विसरवी तो दुःखद क्षण..
रविवारी मेत असे हास्यदिन,
करा सदा हा दिन साजरा..
सर्वांनी हसावे अन हसवावे
हेमंताची हास्यदिनी ही शुभेच्छा..
✍️ हेमंत नाईक .
जागतिक हास्यदिन
७मे२३