फेर

Submitted by अनन्त्_यात्री on 8 May, 2023 - 01:38

ऐकतोय: वर्तमानाच्या ताणलेल्या प्रत्यंचेचा मंद्र टणत्कार

बघतोय: जनुकजिन्याच्या सर्पिल वळणांचा शुभंकर चैतन्याकार

दुर्लक्षतोय: लालसेपोटी गुदमरणार्‍या पर्यावरणाचा हतबल चीत्कार

अनुभवतोय: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाळपावलांचा भयचकित करणारा आविष्कार

गिरवतायत : विद्वज्जड लेखण्या गहाण अक्षराचा लफ्फेदार आकार

घेरतायत: बकाल बाराखड्या फेर धरून गोलाकार

Group content visibility: 
Use group defaults

सगळेच अनुभवतात पण जाणवतं त्यांना जे अजून जिवंत आहेत बाकी काय बोलू....
जळतं वास्तव आहे हे...