नातं

Submitted by हेमंत नाईक. on 6 May, 2023 - 04:18

नातं

नातं सहवासाने ते असतं
सहवास नसलाकी आटत..
नातं जुन आपोआप विरत
नविन घट्ट विणल जातं..
अपेक्षा नकॊ नात्यापासून
ते फसवं बदलणार असत..
पाण्यातील वर्तुळासम नातं
दुरावणारे खरं सत्य असत..
सुख देणारही नातं असत
दुःख ही पण तेच देत..
मानलं तरच ते असत
नाही मानलं तर नसतं..
नाती नकळत ती तुटतात
तुटण्यासाठी नविन जुळतात..
नात्याच्या जाळ्यात मात्र
जीवनभर श्वास अडकतात..

✍️ हेमंत नाईक

Group content visibility: 
Use group defaults